काय करता रे तुम्ही?
स सर कविता
कविता?
कसली रे कविता तुझी?
सर, माझी ऐच्छिक
माझी काल्पनिक
माझी अकाव्यमय...
अस्सं
चला हात पुढं करा..
फटाक !!
तू रे?
सर मला आहे प्रसिद्धीची हौस....
माझा आहे छोटासा कंपू सर
चल हात पुढं कर..
फटाक !!
अरे तू, भलताच नम्र दिसतोयस
आणि तुझी कविता.. मी पाहिलीय कुठंतरी आज सकाळीच
होय सर, मी रिक्षा फिरवत होतो
..आणि मी सर.. त्याच्या रिक्षामागे धावत होतो
कागद पेन्सिल घेऊन कविता करत
वेळ कसाबसा घालवत....
असुदे असुदे नको पुढं करु हात
या पट्टीनं केलाय माझा घात
तुटली बिचारी अर्ध्यात
दोन मात्रा आणि अर्ध्याच वृत्तात
*
हं, तर अशाच कविता केल्यात तुम्ही
पाण्यात न पडता, न पोहताच
पावसात न भिजताच
उर्मी नाही पेटलीच तर कशी विझणार?
मग कचरा तरी कोण कसा जाळणार?
बोला, अरे बोला... गप्प बसू नका
काय आहे खुलासा तुमचा
*
सर मी पावसाची ऐच्छीक कविता केली
पाऊस लौकर यावा म्हणून
आणि म्या दुस्काळाची अकाव्यमय
त्यो बाबा लौकर जावा,
शेतक-यांच्या पोराबाळांच्या तोंडी चार दाणं पडावत म्हणून
खरं सांगतु, म्या न्हाई जगलो दुस्काळ
पर मन झालंय रक्तबंबाळ
*
माझ्या मागं हितगुजवाला कंपू आहे सर
पण त्यांचा आधार वाटतो....
.....माझ्यामागे कुणीच नाही
म्हणून मी रिक्षा फिरवत होतो
.....सॊरी सर परत (कविता)करणार नाही
मी घालवत होतो वेळ
आता मात्र फक्त घालवत बसेन तुटक्या पट्टीचे वळ
*
सर आम्ही कविता जगलो नाही हे खरं आहे
पण खोल आमच्याही हृदयी
सदिच्छांचे निर्मळ पाणी वाहत आहे
*
बरं बरं आणखी काही बोलायची नाही जरुर
मुलांनो तुम्हाला वाटतो तितका नाही मी बेफिकीर
चला हात पुढं करा
अगं ए, ते मलम तर आण जरा
मुलं भुकेजलीत
जेऊनखाऊनच पाठव घरा
*
(No subject)
सर आम्ही कविता जगलो नाही हे
सर आम्ही कविता जगलो नाही हे खरं आहे
पण खोल आमच्याही हृदयी
सदिच्छांचे निर्मळ पाणी वाहत आहे>>>>>आमच्याही.
आवडली.
आज बेफीन्चा थेट नावानिशी
आज बेफीन्चा थेट नावानिशी उल्लेख आहे कवितेत..(उर्मी विझली कचरा जाळू हे ही आहे ) ........कुणाचा असा थेट उल्लेख करताना आपणास पूर्वी पाहिले नसल्याचे स्मरते
असो कविता अप्रतिमच आहे ..................
आज्काल आपल्यातला कवी अत्यन्त जबरदस्त ताकदीचा होवू लागलाय हे नक्की (की मी आजच त्याला पाहतो आहे न कळे .......... )
........................छान!!