... उंबर्‍याबाहेरचा!

Submitted by आनंदयात्री on 5 June, 2012 - 05:07

मी भले आहे कितीही जवळचा
शेवटी मी उंबर्‍याबाहेरचा!

चालताना वाट मागे सोडतो
सोबतीला गंध नेतो कालचा

शेत माझे! कष्ट माझे! पीक पण -
चोरुनी उपभोगतो शेजारचा

रडत असतो मामुली गोष्टीतही!
छंद हा तर पाळण्यापासूनचा!

नेमका गाफील होतो क्षणभरी
डाव मग निसटून गेला हातचा

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/06/blog-post.html)

गुलमोहर: 

खूप वेगळी आहे तुमच्या इतर गझलांहून

गझल आवडली

अलामतीमागची / अलामतीची ध्वनीयोजना अशा गझलांमध्ये खास जाणवते

रडत असतो मामुली गोष्टीतही!
छंद हा तर पाळण्यापासूनचा!>> हा शेर मस्त

छान Happy

सहीच नचि. आवडली.

नेमका गाफील होतो क्षणभरी
डाव मग निसटून गेला हातचा >>> फार आवडलं.

<<<रडत असतो मामुली गोष्टीतही!
छंद हा तर पाळण्यापासूनचा!>>>

एकच नंबर Happy आवडली Happy

सर्वांचे आभार!

कविता, पेशल थांक्स!
पण खरं सांगायचं तर काही thoughts असे आहेत, जे मांडायचा जीवापाड, सातत्याने प्रयत्न करतोय... जमत नाहीये... प्रयत्न करत राहायचे.. अभी तो पढाई शुरू की है... Happy

रडत असतो मामुली गोष्टीतही!
छंद हा तर पाळण्यापासूनचा!.....सही!

नेमका गाफील होतो क्षणभरी
डाव मग निसटून गेला हातचा.....वा!

सुटसुटीत गझल...आवडली

अरे क्या बात है नचिकेत........
अगदी म्हणजे अगदीच जमलेली.......