खंड कपारी

Submitted by अज्ञात on 5 June, 2012 - 01:14

अभिषेकाचे ओढे नाले
वाहुन गेले माघारी
शिरी बोडके उरले कातळ
हिरवळ सुकली संसारी

तळी साचले मुके सरोवर
किमया प्रतिबिंबित सारी
अगणित लेणी खंड कपारी
दिसल्या मजला गाभारी

काठ किनारे भिजलेले
आकाश पृष्ठ्भर निजलेले
रंगात निळ्या लहरींवरती
पवनाचे स्पर्श पहुडलेले

जड एक कोपरा माझाही
काळजात काहुर दडलेले
काजळरात्री अंधार नभी
चांदणे भ्रमात विखुरलेले

.........................अज्ञात

गुलमोहर: 

जड एक कोपरा माझाही
काळजात काहुर दडलेले
कजळरात्री अंधार नभी
चांदणे भ्रमात विखुरलेले>>>>मस्तच!

कजळरात्री अंधार नभी>>>काजळरात्री आहे का?

आवडली..... शेवटच्या कडव्याचा शेवटच्या दोन ओळी सोडता लय सुटली असे वाटले नाही......
कवितेचा गाभा उत्तमच........ Happy