तेरी आंखो कि चाहत में..

Submitted by Kiran.. on 2 June, 2012 - 10:24

खूपच दिवसांनी हौस म्हणून प्रयत्न केला. (सरळ आहे सफाईदार नसणार. बघून काढलंय ते )
साहीत्य : पेन्सिल्स - एच, टू एच. ( एच बी, २ बी चा वापर अजून जमत नाही. पूर्वीही केला नव्हता )
स्कॅन केल्यावर पेंटमधे टच अप करायचा प्रयत्न केला पण जमलं नाही. कसं काय माऊस चालवतात लोक ! सा. दंडवत. स्केच पूर्ण करायला मुहूर्त लागेना म्हणून आज इतकंच.. Sad

eyes.JPG

ओळखा बघू कुणाचे डोळे आहेत हे ?

गुलमोहर: 

अमेलिया Happy

थँक्स.. ! (ओळखल्याबद्दल ))

(थेट डिजीटल स्केच कसं करतात कुणी सांगेल का ? )

सुंदर आलेत कि. अपलोड करताना साईझ कमी झाल्याने, थोडे अस्पष्ट दिसताहेत.

मी पेंटब्रशमधे काही चित्रे काढली होती. माउस चांगला हवा आणि त्यावर हातही नीट बसलेला हवा. भाऊ नमसकरांची अशी उत्तम चित्रे आहेत इथे.

सुरेख! ऐश्वर्याचे डोळे आहे हे कळतं लगेच. माधुरीचे ओठ जमतील का काढायला? प्लीजच Happy (विशेषतः ज्यात तिच्या दंतपंक्ती दिसताहेत असे चित्र)

थँक्स मित्र / मैत्रिणींनो

निंबे
ऐश्वर्या म्हणजे पहला प्यार है.. माधुरी मोठी बहीण आहे Wink पण नक्कीच तिचे ओठ काढायला आवडतील. तिची ती ओळखच आहे ना ..

बच्चनबाईंचे डोळे सुरेख आहेतच. आणि रेखाटलेत पण हुबेहूब. खरोखर छान!

रच्याकने : डोळे हा एकमेव अवयव उर्वरित शरीर न दाखवता स्वतंत्रपणे रेखाटलेला चालतो. (हात किंवा पाय यांच्या स्वतंत्र रेखाटनातून तितकीशी भावव्यक्ती होत नाही.)

-गा.पै.

धन्यवाद सर्वांचे

गापै, दक्षिणा

ऐश्वर्याच्या डोळ्यांचे असंख्य स्केचेस काढलेत. का कोण जाणे पण तिचं चित्रच पूर्ण होत नाही. एकच पूर्ण झालेलं ते मित्राला भेट दिलं Happy

किरण एकदम मस्तच काढलेत डोळे....... ते ऐशचे डोळे आहेत हे कळते त्यावरुन तुमचे स्केच एकदम अचुक आहे