साद देतात मनातील उन्हाळे राणी
रोज येतात नभातून उमाळे राणी
ही रुबाई करते लाख विनवण्या .. ये ना
ती तरी काय विनवणार निराळे राणी
कालही चंद्र उदासीन उगवला होता
कालही शेर तुझ्यावीण जुळवला होता
कालही खूप प्रतीक्षा करून थकलो मी
कालही धीर स्वतःलाच पुरवला होता
एवढा दीर्घ अबोला जगात असतो का
एवढा झाकुनी दु:खास कुणी हसतो का
घे शपथ घट्ट मिठीतील जुन्या भेटींची
आपला विषयही स्मरणात तुझ्या नसतो का
आज दिसशील असे सांगत होते कोणी
ऐकले चोरुन मी, ऐकत होते कोणी
काय सांगू कसला जीव हुरळला होता
की जणू ग्रीष्म उभा भिजवत होते कोणी
मात्र आता तुला दिसायचोच नाही मी
तोंड फिरवेन जणू पाहिले न काही मी
राज्य माझे असेल हो गुलाम प्रेमाची
चांगला खेळवेन खेळ बादशाही मी
पाप नसतेच जगी तर कबीर असते का
प्रेम नसतेच... कवी दाग, मीर असते का
हे तखल्लूस न शोभेल असा हळवा मी
बघ तुझ्याहून कुणी 'बेफिकीर' असते का
-'बेफिकीर'!
व्वा! अप्रतिम आहे, मला आवडली
व्वा! अप्रतिम आहे, मला आवडली ..
अप्रतिम. सुपर्ब.
अप्रतिम. सुपर्ब.
व्वाह !!
व्वाह !!
सहज पण तितकीच
सहज पण तितकीच सुंदर...........
सगळ्या रुबाया (रुबाईचे
सगळ्या रुबाया (रुबाईचे अनेकवचन रुबायाच नं!) मस्त! शेवटची खास!
"हे तखल्लूस न शोभेल असा हळवा
"हे तखल्लूस न शोभेल असा हळवा मी
बघ तुझ्याहून कुणी 'बेफिकीर' असते का" >>> क्या बात है !!!
... छानच.
छान आहेत, आवडल्या!
छान आहेत, आवडल्या!
प्रयत्न चांगला आहे... फार खास
प्रयत्न चांगला आहे...

फार खास जमल्यात असे वाटले नाही
क्षमस्व
वृत्त कोणते/ती आहेत
रुबाया वगैरे कळत नाही पण
रुबाया वगैरे कळत नाही पण काव्य म्हणून अतिशय आवडले.
रुबाया वगैरे कळत नाही पण
रुबाया वगैरे कळत नाही पण काव्य म्हणून अतिशय आवडले. >>>
+१
मस्त!
एवढा दीर्घ अबोला जगात असतो
एवढा दीर्घ अबोला जगात असतो का
एवढा झाकुनी दु:खास कुणी हसतो का
घे शपथ घट्ट मिठीतील जुन्या भेटींची
आपला विषयही स्मरणात तुझ्या नसतो का
ही फार आवडली.
निंबुडा - रुबाईचे अनेकवचन रुबाईआत्/रुबाईयात असे आहे खरे तर पण मराठीत बरेच लोक रुबायाच म्हणतात.
आभारी आहे
आभारी आहे
छान आहे. आवडली.
छान आहे. आवडली.
वाह! साद देतात मनातील उन्हाळे
वाह!
साद देतात मनातील उन्हाळे राणी
रोज येतात नभातून उमाळे राणी
ही रुबाई करते लाख विनवण्या .. ये ना
ती तरी काय विनवणार निराळे राणी............हे आवडले...:)