Submitted by प्राजु on 29 May, 2012 - 13:50
आहे बरेच काही पण बोलणार नाही
पेचात मी कधीही तुज टाकणार नाही
जातेच भरकटूनी, तरिही पुन्हा ठरवते
पेटी तुझ्या सयींची मी खोलणार नाही
कवटाळुनी उराशी दु:खास घेतलेले
ते पापण्यात आता बघ दाटणार नाही
विझलाय जो निखारा, शिंपून काळ ओला
फ़ुंकर नकोस घालू, तो पेटणार नाही
काळोख वाटतो मज आता हवाहवासा
सुर्या प्रकाश आता, मी मागणार नाही
हे स्पंद चांदण्यांचे, खुपले असे जणू की
कुठलेच शब्द-काटे, मज बोचणार नाही
झोळीस छिद्र असता, तू सौख्य घातलेले
गेले गळून कितीसे, मी मोजणार नाही
'प्राजू' तु लष्कराच्या, भाजू नकोस पोळ्या
धडपड तुझी कुणीही बघ जाणणार नाही
- प्राजु
गुलमोहर:
शेअर करा
बरी आहे पण नेहमीप्रमाणे झकास
बरी आहे पण नेहमीप्रमाणे झकास नाही वाटली
आवडली ..
आवडली ..
शिंपून काळ ओला >> वा!!
शिंपून काळ ओला
>> वा!!
आहे बरेच काही पण बोलणार
आहे बरेच काही पण बोलणार नाही
पेचात मी कधीही तुज टाकणार नाही>> सुंदर!
कवटाळुनी उराशी दु:खास घेतलेले
ते पापण्यात आता बघ दाटणार नाही>> व्वाह्ह!
विझलाय जो निखारा, शिंपून काळ ओला>> हा मिसरा सुंदर, प्राजु
हे स्पंद चांदण्यांचे, खुपले असे जणू की
कुठलेच शब्द-काटे, मज बोचणार नाही>> अहाहा प्राजु, खयालास मनोहर गुंफलेस.
झोळीस छिद्र असता, तू सौख्य घातलेले>> किती सुंदर, पण ह्याचा पुढीचा मिसरा फार इफेक्टीव वाटला नाही, क्षमस्व.
गेले गळून कितीसे, मी मोजणार
गेले गळून कितीसे, मी मोजणार नाही - कितिसे असे करा
'प्राजू' तु लष्कराच्या, भाजू नकोस पोळ्या
धडपड तुझी कुणीही बघ जाणणार नाही>>> छान
बाकी गझल ठीकठाक, अजून स्कोप होता असे वाटले
-'बेफिकीर'!
आवडली
आवडली
आवडली... नेहमीपेक्षा वाईच कमी
आवडली... नेहमीपेक्षा वाईच कमी आवडली, पण आवडली..
खास बात ही आहे की ह्यातील शब्दप्रयोग अगदी तरल आहेत, त्यामुळे ही गझल गायला खूप मजा येईल असं वाटतं. कदाचित गायल्यावर खूपच 'अपील'ही होईल..
सुरेख गझल. खरेच ही
सुरेख गझल.
खरेच ही गायनायोग्य गजल आहे, रसपशी सहमत.
गझलेचा मुड छान सांभाळलाय. मला तर ही एका विशिष्ट मुडमध्ये लिहिलेली गझल वाटली.