हा माफीनामा एम सी ए ने मान्य करावा का?

Submitted by mansmi18 on 28 May, 2012 - 10:24

आज सगळीकडे बातमी आहे की शाहरुख खान ने माफी मागितली आहे आणि त्यामुळे एम सी ए त्याच्यावरील बंदीविषयी पुनर्विचार करीत आहे.
त्याच्या माफीचे स्टेटमेंट पुढीलप्रमाणे आहे:
I want to apologise to all my children that I misbehaved at the MCA. I am sorry. And I am sorry to all my viewers that I subjected you to a side of me which is not nice. So please forgive me. Forgive me because, you know, we have not won for a long time. Come on! You can give this much to me. I am sorry for misbehaving. If you make me win every year, I will not misbehave. So please allow me to win.

यात कुठेही एम सी ए किंवा त्यातील जे सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल एक शब्दही नाही. त्याच्या पुर्ण तथाकथित माफीनाम्यात प्रामाणिकपणा तसुभरही दिसत नाही. एम सी ए इतकी उतावीळ झाली आहे त्याला माफ करायला?

जाता जाता, काल सामन्यात आपल्या देशमुखांचा रितेश आलेला दिसला. आता बालहट्ट विलासरावाना मान्य करायला लागला तर त्यांचा तरी काय दोष म्हणा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते आयपीएल वाले आणि शाहरूख खान..

गेले उडत >>> + १०० + गेले तेल लावत .
एमसीए वाले पण शेळपट दिसताहेत , चांगला ठोकुन काढला पाहीजे होता शारक्याला .

एक नंबर भंपक साला!!

>>ते आयपीएल वाले आणि शाहरूख खान..
गेले उडत
>>+ गेले तेल लावत .
>>> एमसीए वाले पण शेळपट दिसताहेत , चांगला ठोकुन काढला पाहीजे होता शारक्याला .

+ १००

काही वर्षांपूर्वी जेव्हा आपण शारजाह मधे सामने खेळायचो तेव्हा एका सामन्यादरम्यान पाकिस्तानी क्रिकेट प्रेक्षकांबरोबर हिरवे कपडे घालून "पाकिस्तान जीतेगा" ओरडत टीव्हीवर दिसला होता. दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात फोटोही छापून आला होता. त्या क्षणी तो देशद्रोही मनातून उतरला तो उतरलाच. मग परत हल्ली हल्ली "पाकिस्तान इज अ गुड नेबर" असे तारे तोडले साल्याने!

एमसीए मधे तरी कोण लोक आहेत ?

आदर्श घोटाळे वाले. वरच्या संस्थेत कोण आहेत ? धरणात बेकायदेशीर शहर वसवून पुण्याचं पाणी पळवणारे. जलसंधारणाचा खर्च ७८००० कोटी दाखवून एकही काम पूर्ण नाही. हाच पैसा क्रिकेट मधे काळा पैसा म्हणून येतोय. ज्या महाभागाचं नाव स्टेडीयमला दिलंय त्याचं नाव काळ्या पैशाच्या व्यवहारात टॉपला आहे.

एक नंबर भंपक साला!! + १०००००००

श्श्शश्श्श शाहरुख ला IPL काय हिंदी चित्रपट श्रुष्टी मधून कायमचा BAN केला पाहिजे.
मस्ती आणी पैशाचा माज आला आहे.

आयपीएल बीबीवर यावर लिहीले होते ते टाकतोय

....
मग मुंबईत शाह रूख चे भांडण. त्याची चर्चा गेले दोन तीन दिवस राष्ट्रीय प्रश्न असल्यासारखी चालू आहे. पण लोकांना त्यात फारसा रस नाही असेच दिसते. त्याच्या बरोबरच्या मुलांना खरोखरच जर सुरक्षारक्षकांनी नीट वागणूक दिली नसेल तरच त्याची शिवीगाळ समजू शकतो. त्यातही मुलांशी एकूणच (पीटीचे शिक्षक किंवा कोचेस वागतात तसे) "रफ" वागणे आणि गैरप्रकारे वागणे यात फरक आहे. येथे नक्की काय करत होते ते स्पष्ट नाही. नुसते रफ वागले असतील तरी एवढी शिवीगाळ करण्याची गरज नाही. तेथे जरा माज असू शकतो. मात्र एक आश्चर्य वाटते - अशा वेळेस "सगळे बडे लोक" एकत्र येउन प्रकरण दाबले जाते व त्यातील सामान्यांची बाजू घेतली जात नाही. येथे एमसीए चे लोक ठामपणे एकत्र आहेत, अजूनही. पण एकूण नक्की प्रकार काय आहे कळत नाही. अपेक्षेप्रमाणे फिल्मी लोकांनी शाहरूख ची बाजू घेतली आहे.

मला यात एक आश्चर्य वाटले की मैदानावर हजार कॅमेरे असतात, त्यातील कोणत्याच कॅमेर्‍यात याचे काही पुरावे कसे नाहीत? शाहरूख मैदानावर आलेला असताना एकही कॅमेरा त्याच्यावर नव्हता? त्याचा भाव फारच उतरला म्हणजे मग Happy

शाहरुखला एवढे (धागा त्याच्या नावावर टाकून) का मोठे करताय राव? (हलके घ्यावेत)

डर

बाझीगर

कभी हा कभी ना

दिवाना

हे चार चित्रपट आणि फौजी ही मालिका एवढेच त्याने कलाकार म्हणून चांगले केले आहे

बाकी सगळा आनंद

हे मारहाण करणार, सिगारेटी ओढणार, बालिश कोलांट्या घेणार

पब्लिक बघतही नाहीये आता त्याच्याकडे

=================================

अवांतर - फार एन्ड साठी हा एक प्रश्न जो काही दिवस मनात होता

चित्रपट अभिनेते क्रिकेट संघ विकत घेऊन तिथे मैदानात येऊन बसतात

क्रिकेट खेळाडू एखादा चित्रपट प्रायोजीत का करत नसतील ? याचा अर्थ क्रिकेटचे वेड पब्लिकला सिनेमाहून जास्त आहे असा घ्यावा का?

(बाकी गावसकर वगैरेंनी एखाद्या चित्रपटात केलेली महान कामे वरील प्रश्नात मोडत नाहीतच)

Happy

हे हे हे! मंदार जोशींना लाख काय करोडो अनुमोदनं. ह्या देशद्रोह्याचा तो हिरवा फोटो आम्ही चित्रलेखा ह्या मराठी आवृत्तीत पाहिला होता, तेव्हापासुन त्याच्याविषयी जी काही सणक भरली ती कधीच जाऊ शकली नाही, आणी जाणार नाहीच. अर्थात, अशा भिकार्‍यांनाच आपल्या देशात खूपच महत्व दिले जाते हे तितकेच खरे.

काही वर्षापूर्वी मात्र सहारा एअरपोर्टवर वेगळा नजारा होता. शारुख बाहेर देशात जायला वेटिंग लाउंजमध्ये होता आणी त्याच वेळी बाहेरुन आलेल्या विमानातुन अमिताभ उतरला. सांगायची तशी गरज नाही, पण या माकडाकडे ( याला माकड म्हणणे म्हणजे समस्त माकड जातीचा अपमान तरीही म्हणते ) त्यावेळी कुणीही लक्ष दिले नाही, गर्दी सगळी अमिताभकडे.

पेपरवाल्यांनी फुल्ल फायदा घेतला या बातमीचा.

गौतम गंभीरने बरीच मेहेनत घेतली पण केवळ याच्यासाठी कोलकता जिंकु नये असेच वाटत होते.