अ‍ॅप्रेझल / अप्राईझल

Submitted by Sanjeev.B on 28 May, 2012 - 05:32

मित्रांनो आणि मैत्रिणिंनो,
एप्रिल / मे महिना उजाडलं कि सर्वच नोकरदार वर्गाला वेध लागतात एका गोष्टीचे ते म्हणजे अॅप्रेझल.

जेव्हा मी नवीन नवीन नोकरी ला लगलो होतो, तेव्हा मला असे वाटले होते कि वर्षारंभी अॅप्रिल महिन्यात होणारे पगार म्हणुन अॅप्रेझल म्हणत असावे.

नंतर जस जसे मॅनेजमेंट पॉलिटिक्स कळायला लागले तेव्हा पक्के समजुत झाले कि अप्रेझल म्हणजे मॅनेजमेंट सर्वांच्या नावाची चिठोरे बनवुन वर (अप) फेकत असतील आणि ज्यांचे चिठोरे टेबलाच्या अप (वरती) असतील त्यांना अप्रेझल मिळत असावे आणि टेबलाच्या डाऊन वे चिठोरे असतील त्यांना डाऊन जाण्याचे मार्ग म्हणजेच पहिल्या मजल्या वरुन खाली जाण्याचे मार्ग अणि तेथुन सरळ गेट च्या बाहेर चे मार्ग.

आणखी एक पक्की समजुत झाली, ते म्हणजे जसे क्रिकेट चे मॅचेस फिक्स असतात, मॅच खेळणे हे एक दिखावा असतं, तसेच पगारवाढ सुध्दा मॅनेजमेंट ने फिक्स केलं असतं, अप्रेझल चे मॅच हे फक्त दिखावा असतं.

जेव्हा रिव्ह्यु मिटिंग चे बोलावणे येते तेव्हा मनात अश्या काही भावना उचंबळुन आलेले असतात कि असं वाटतं यमुना जळी खेळु खेळ कन्हैया का लाजता आणि मिटिंग मध्ये बसल्या क्षणी आपल्या मनात हे गाणं रुंजी घालायला लागतं, सांग कधी कळणार तुला "भाव" (आकडा) माझ्या मनातला.

रिव्ह्यु मिटिंग सुरु होताच पुर्ण चित्रच पालटतं, आपल्या मना सारखे काहीच घडत नाही, बॉस, अस्मादिक कसे दिवस भर मायबोली वर उनाडक्या करत फिरत होते ह्याचे तपशिलवार, तारिख, दिवस वेळेसकट माझ्या श्रीमुखात भिरकावतो, त्याक्षणी असे वाटु लागते वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण ग, करील जो हरण संकाटाचे.

पण, मी पण पुर्ण तयारीनीशी गेलेला असतो, मागच्या वर्षातले सगळे अचिवमेंट्स मी पण टिपुन ठेवलेलो होतो, ते मी त्यांच्या समोर ठेवतो. मग बर्‍याच बोलाचाली नंतर मॅनेजमेंट ने जे फिक्स केलेले असते ते त्यांच्या मनातले भाव आपल्याला कळतं आणि मग मनाची अशी अवस्था होते, दु:खी मन मरे, सुन मेरा कहना, यहा नही रहना, यहा नही रहना........

Proud

- संजीव बुलबुले / २८.०५.२०१२

गुलमोहर: 

लिंबु तुमच्या आणि माझ्या विचारसरणीत खुप फरक आहे हे तुमच्या वरच्या पोस्ट वरुन मला तरी जाणवल.
मी तुम्हाला कीती जरी सांगितल तरी ते तुम्हाला पटणार नाही कारण तुम्ही तुमची मत तुमच्या अनुभव अन अनुभूती पण.....

डिअर सुशान्त, अर्थात, फरक आहेच आहे. Happy मी पण मान्य करतो.
मी असे कुठेच म्हणत नाही की
= सबऑर्डिनेट्स्/ज्युनिअर्स निव्वळ कारकुनी मनोवृत्तीने काम करित नाहीत
= ते काम टाळत नाहीत,
= ते बॉसबद्दल शिन्दाळक्या (गॉसिप, बरोबर ना?) करत नाहीत
= नविन शिकत नाहीत, नविन जबाबदार्‍या घेत नाहीत
= सान्गितलेली सुधारणा पटवुन/समजुन घेणे दूरच, उलट धुडकावुन लावत नाहीत.
= बॉसला मिळणार्‍या प्रतिष्ठेला/पैशाला नावे ठेवत नाहीत
= ऐनवेळेस दान्ड्या मारुन वा अन्य सबबी सान्गून महत्वाचे कामाचे वेळेस बॉस कसा अडकेल हे बघत नाहीत
वगैरे वगैरे....
पण राजेहो, माझे मत असे कि, वर ऊल्लेखिलेली सर्व वैगुण्ये घेऊन वावरणार्या उपद्रवी सबऑर्डिनेट्सने माझे हापिस भरलेले आहे असे रडतकुथत सान्गणारा कुणी "म्यानेजर" भेटला तर पहिले मी त्याला "म्यानेजर" म्हणून मानणेच नाकारीन अन कुणा कारकुनाला म्यानिजर म्हणून कुणी कोणत्या राजकारणाने बशिवल आहे त्याचा शोध घेईन. कारण या सगळ्या गुणावगुणान्सहितच्या अचाट माणसान्ना घेऊनच सामदामदन्डभेद निती अवलम्बुन कामे घडवुन/करवुन घेणे यालाच यशस्वी म्यानेजरकी म्हणतात असेही माझे अनुभव/अनुभूतीसिद्ध मत आहे.

एक लक्षात घ्या, की म्यानेजर म्हणून जगताना (कुणी पोस्ट/पोझिशन दिलीये म्हणून व्हिजिटिन्ग कार्डवर वागवताना नव्हे, मी म्हणतोय की "जगताना") जर तुम्ही
१. माणसे तुमच्या आदर्शाला भुलून वा भारावुन किन्वा दहशतीला/अधिकाराला वगैरे घाबरुन, पण तुमच्या मागे येतिल असे धरुन म्यानेजरकी करीत असाल, तर फसाल, लक्षात घ्या, की जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा तुमच्या मागे कोणीच नसेल.
२. या उलट, माणसे तुमच्या आदर्शाला भुलून वा भारावुन किन्वा दहशतीला/अधिकाराला वगैरे घाबरुन, पण तुमच्या पुढे पुढे करीत कामे करतील अन तुम्ही त्यान्च्या मागे उभारुन बैलगाडी हाकल्याप्रमाणे म्यानेजरकी करीत असाल, तरीही फसाल, लक्षात घ्या, की जेव्हाकेव्हाही तुमच्या हातुन लगाम थोडासा जरी ढिल्ला पडला तरी बैल उधळतात त्याप्रमाणे पुढील लोक कुठल्या कुठे उधळून निघुन जातील, अन तुम्ही एकटेच शिल्लक रहाल.
३. मात्र, जर तुम्ही माणसे, त्यान्च्यातल्या सर्व भावभावन्नान्चा/स्वभावदोषान्चा विचार करुन पण तो स्वतःचे अन्गास न डकवता, त्यान्चेतील उपयुक्त ते ते सर्व वापरुन घेण्याचे कसब वापरीत स्वतः बरोबर घेऊन कामे केलीत, तर अन तरच तुम्ही यशस्वी म्यानेजर म्हणून सिद्ध व्हाल, अन तेव्हा माझ्या खाली असे असे नालायक कनिष्ठ आहेत, वा माझ्या वर असे असे माझे खडूस वरिष्ठ आहेत ही तक्रार करायची वेळच येणार नाही.
थोडक्यात काय? तर आपल्या मागे वा पुढे कोणाला घेऊन जाण्यापेक्षा बरोबर/सोबत घेऊन जावे तरच यशस्वी म्यानेजर होता येते.
होऽ, अगदी प्रेयसी वा बायकोला देखिल बरोबरच हातात हात घालून घेऊन जावे, मागे वा पुढे ठेऊन नाही. Proud आता कळ्ळ?
तर ही माझी सर्व मते देखिल अनुभव/अनुभूती सिद्धच आहेत बर्का!
अन मी आधीच्या पोस्टित ज्या ज्या बॉस/म्यानिजर्स बद्दल बोललोय, ते ते सर्व असे बैलगाडीहाक्याप्रमाणे वा ओझ्याची हातगाडी ओढणार्‍याप्रमाणे बाकि सबऑर्डीनेट्स्ना मागे वा पुढे ठेऊन एकेकटे चालणारेच होत.

माझी पुर्ण पोस्ट दिसलीच नाही काय कारण असाव...
< लिंबु तुमच्या आणि माझ्या विचारसरणीत खुप फरक आहे हे तुमच्या वरच्या पोस्ट वरुन मला तरी जाणवल.
मी तुम्हाला कीती जरी सांगितल तरी ते तुम्हाला पटणार नाही कारण तुम्ही तुमची मत तुमच्या अनुभव अन अनुभूती तुन बनवलेले आहेत.
... मॅनेजमेंट सतत माघे लागलेले असते कामासाठी आणि टीममधले १००% वेळेस हक्कासाठी खुप जागरुक असतात पण कर्तव्याबाबत १००% निष्काळजी / अन्भिद्न / जबाबदारी टाळणे करत असतात.
... माझ हे विधान manufacturing industry ला १००% लागु होणार नाही पण IT , Engineering Service Industries व ईतर कंपन्यांसाठी होत. माझ्या विधानात मी तस म्हणालो नाही त्याबद्द्ल क्षमस्व.

लिंबु येव्हड सांगतो की तुमच्या प्रत्येक मुद्द्याला माझ्याकड स्पष्टीकरण आहे पण या वादातुन हाती काहीच लागत नाही.म्हनुन थांबतो. >

लिंबु तुम्ही मॅनेजर (व्यवस्थापक)आणि लिडर (नेता) यात गफलत करता आहात अस नाही वाटत तुम्हाला. ह्या दोन्हीत पुसटशी रेष आहे. वर वर पहाता दोन्ही सारखच पण तरी दोन्हीत फरक हा आहेच.

>>>> लिंबु तुम्ही मॅनेजर (व्यवस्थापक)आणि लिडर (नेता) यात गफलत करता आहात अस नाही वाटत तुम्हाला. <<<<<
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र, पुन्हा एक डिफ्रन्स ऑफ ओपिनिअन
अहो वरील भेद एखाद्या "प्रशिक्षण वर्गात" तात्विक शब्दच्छल करीत शिकवणे वेगळे, अन प्रत्यक्षात जगताना म्यानेजर म्हणून वा नेता म्हणून वेगवेगळे जगणे वेगळे.
प्रत्यक्षातील जगणे हे केवळ याच दोन गुणवैशिष्ट्यान्वर / सहाय्याने जगायचे नसुन अन्यही अनेक बाबी आत्मसात कराव्या लागतात, असे माझे मत! Happy
पण असो, तुमच्याशी बोलुन मात्र बरे वाटले.

प्रत्यक्षातील जगणे हे केवळ याच दोन गुणवैशिष्ट्यान्वर / सहाय्याने जगायचे नसुन अन्यही अनेक बाबी आत्मसात कराव्या लागतात, असे माझे मत!... १००% मान्य (१००% पेक्षा जास्त कधी काही असुच शकत नाही हे माझ मत....)

मायबोली वरच्या बर्याच चर्चांमध्ये विरोधासाठी विरोध आणि समोरच्याचे बोलणे किती चूक हे पटविण्यासाठी मोठे मोठे फंडे दिलेले आढळतात.
>> एक लक्षात घ्या, की म्यानेजर म्हणून जगताना (कुणी पोस्ट/पोझिशन दिलीये म्हणून ..........................
थोडक्यात काय? तर आपल्या मागे वा पुढे कोणाला घेऊन जाण्यापेक्षा बरोबर/सोबत घेऊन जावे तरच यशस्वी म्यानेजर होता येते. >>
limbutimbu , तुमची विधाने प्रत्येक managament च्या पुस्तकात आढळतील. यशस्वी म्यानेजर कसे होता येते हे गुगल केल्यावर हजार आर्टिकल्स सापडतील. पण थेअरी आणि practical मध्ये फरक असतो तो पण industry प्रमाणे.
प्रत्येक industry मध्ये appraisal प्रोसेस वेगळी असते . आणि IT Industry मध्ये तर खूप वेगळी परिस्थिती असते. ( तुम्ही IT professional आहात कि नाही मला माहित नाही )
वेळ मिळाल्यावर सविस्तर लिहीन.

मॅनेजमेंट सतत माघे लागलेले असते कामासाठी आणि टीममधले १००% वेळेस हक्कासाठी खुप जागरुक असतात पण कर्तव्याबाबत १००% निष्काळजी / अन्भिद्न / जबाबदारी टाळणे करत असतात.
माझ हे विधान manufacturing industry ला १००% लागु होणार नाही पण IT , Engineering Service Industries व ईतर कंपन्यांसाठी होत>>>> IT मध्ये १००% ???????????? आँ???? निषेध!!!!

Pages