धरण

Submitted by कौतुक शिरोडकर on 28 May, 2012 - 03:35

रिमझिम जगणं असतं
सर्वाभिलाषी..

पण एकदा तरी
आभाळ फाटल्यागत
कोसळून पहायला हवं..

तेव्हाच तर कळेल..
आपल्या प्रदेशात
सर्व सोसून, तग धरून,
तहान भागवण्यास
नात्याचं एखाद तरी
धरण सिद्ध आहे की नाही ते !!!

गुलमोहर: 

सर्व सोसून, तग धरून,
तहान भागवण्यास
नात्याचं एखाद तरी
धरण सिद्ध आहे की नाही ते !!!>>>>>>>>> __/\__ भन्नाट.. आवडलं Happy

कौतुक, तुफान आवडली कविता. तुला थोडक्या शब्दात इतकं अर्थपुर्ण लिहिता येतं, म्हणुन मला तुझ्या कविता जास्तच आवडतात. थेट मनापर्यंत जातो आहे आशय.

मनिमाऊ + १०००००००००००००००००००००००००००००००००००००००००० Happy

(पण सगळ्याच कविता नाही आवडत तुझ्या बरं का :फिदी:)

कौतुक, तुफान आवडली कविता. तुला थोडक्या शब्दात इतकं अर्थपुर्ण लिहिता येतं, म्हणुन मला तुझ्या कविता जास्तच आवडतात. थेट मनापर्यंत जातो आहे आशय.
>>
+१०००

आम्ही इथं पानं पानं खरडतो आणि हा चार वाक्यात सगळं सांगुन भाव खाऊन जातो...
फार आवडली...

तुझ्या त्या 'शब्द न पाळणा-या' कवितेनंतर तर तुझ्या कवितांची वाट पाहतो... Happy

कौत्या, मला तो 'सर्वाभिलाषी' शब्द तू ज्या अर्थाने वापरला आहेस ते आवडलं... Happy
फक्त त्याचे दोन अर्थ निघत असल्याने लोगा कन्फुजवा गये है लग रैला है Wink

मला तो 'सर्वाभिलाषी' शब्द तू ज्या अर्थाने वापरला आहेस ते आवडलं...
फक्त त्याचे दोन अर्थ निघत असल्याने लोगा कन्फुजवा गये है लग रैला है >>>
हम तो सच मुच मे हि कन्फुजवा गया हु. जरा विस्कटके बतावेंगे क्या!

पण एकदा तरी
आभाळ फाटल्यागत
कोसळून पहायला हवं..

खरंय .......................त्रिवार सत्य .........................! त्याशिवाय उत्तर सापडतच नाही Happy

तुझ्या त्या 'शब्द न पाळणा-या' कवितेनंतर तर तुझ्या कवितांची वाट पाहतो... >>. +१००

फार कमी शब्दात फार जास्त सांगता राव तुम्ही! मस्तच! Happy

कौत्या, मला तो 'सर्वाभिलाषी' शब्द तू ज्या अर्थाने वापरला आहेस ते आवडलं... >> बरोबर आहे, तुम्हाला आवडणारच, तुम्ही उच्च अभिरूची वाले ना Proud
आम्ही अतिसामान्य.. Biggrin

तेव्हाच तर कळेल..
आपल्या प्रदेशात
सर्व सोसून, तग धरून,
तहान भागवण्यास
नात्याचं एखाद तरी
धरण सिद्ध आहे की नाही ते >> वाह....!!!