Submitted by पुरंदरे शशांक on 28 May, 2012 - 02:15
थेंब वेडे पावसाचे....
जलदाच्या पालखीत
दिमाखात मिरवले
थेंब वेडे पावसाचे
मातीमधे मिसळले ?
असे कसे हे घडले
पायउतार का झाले ?
ओढ मायधरतीची
अंकावर आरुढले
मातीमधे मिसळता
मातीमोल नाही झाले
नाना रुपांनी सजूनी
अनमोल किती झाले
थेंब मातीशी मिळता
कसे नवल वर्तले
साज हिरवा लेउन
तरारुन वर आले
पावसाचे थेंब काही
कसे मातीत रुजले
जाईतून उमलून
शुभ्र, गंधमय झाले
थेंब मोती थेंब दाणे
चैतन्याने मूर्त होणे
मनातही उतरती
शब्द थेंबांचेच देणे.....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अप्रतिम कविता जाईतून उमलून
अप्रतिम कविता
जाईतून उमलून शुभ्र, गंधमय झाले ही प्रतिमा/कल्पना रुचली नाही. सबंध कवितेत थेंब पडण्याची व मातीत रुजून कोंब फुटण्याची कल्पना आहे. काळाचे भान राखलेले आहे. अगदी कणसात मोतीदाणे भरण्यापर्यंत छान वाटते. मात्र जाईचे फूल यायला खूप वेळ लागेल. वेलीला आता थेंब थेंब पाण्याची अपूर्वाई असणार नाही. म्हणून तेथे काळाचे भान सुटल्यासारखे वाटले.
शेवटच्या दोन ओळी अतिशय आवडल्या.
प्रद्युम्न - सर्व प्रकारच्या
प्रद्युम्न - सर्व प्रकारच्या कविता वाचून तुम्ही जे अभ्यासपूर्वक मत मांडता हे मला विशेष कौतुकास्पद वाटते.
या कवितेला जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनापासून आभार.
जाईतून उमलून शुभ्र, गंधमय झाले ही प्रतिमा/कल्पना रुचली नाही.>>>> हा मला तरी प्रत्येकाच्या (रसिकाच्या) रुचि भिन्नतेचा प्रकार वाटतो. कारण "मनोगत" या दुसर्या साईटवर याच कवितेतील याच दोन ओळी खूप आवडल्या असा प्रतिसाद आताच पाहिला. त्यामुळे एखाद्याला जे आवडते तेच दुसर्याला आवडणारही नाही हे मला जाणवले.
पाण्याचे थेंब जमिनीत पडल्यानंतर वेगवेगळी रुपे धारण करतो अशी कल्पना या कवितेत मी मांडायचा प्रयत्न केलाय. त्यामुळे हिरवेगार कोंब असोत वा फूल वा फळ - ही सर्व त्याचीच रुपे आहेत असे मला या कवितेतून सांगायचे आहे. रंगाबरोबर गंध हे ही त्याचेच एक रुप, इतकेच काय आपल्याला स्फुरणारे विचार, शब्द हे ही त्याचेच एक आगळे रुप........असे मला सांगायचे आहे. कविता नावाजल्याबद्दल पुनःश्च धन्यवाद. इति लेखनसीमा ||
सुरेल कविता
सुरेल कविता
छान कल्पना आणि आशय.
छान कल्पना आणि आशय.
सुरेख.
सुरेख.
कविता छानच.
कविता छानच.
सर्व जाणकार रसिकांचे मनापासून
सर्व जाणकार रसिकांचे मनापासून आभार.....
पावसाळा तोंडावर आलाय.... अशी
पावसाळा तोंडावर आलाय.... अशी छान कविता लिहून तुम्ही उत्कंठा वाढविलीत.
"मातीमधे मिसळता
मातीमोल नाही झाले
नाना रुपांनी सजूनी
अनमोल किती झाले " >>> हे अधिक आवडलं.
खूप धन्यवाद काका.....
खूप धन्यवाद काका.....