आठ्वण.....एक झिंग!

Submitted by सुप्रिया जाधव. on 27 May, 2012 - 09:24

आठवणींचाही का कुणी
पेग बनवत बसतं ???
हे एक असं रसायन....
जे सोड्यावाचूनही फ़सफ़सत

ना लागतं खास कंपनी,
ना वेळेची हमी.
एका मागून एक रिचवायची...
नवा कैफ़... आठ्वण नवी!

जितकी जुनी...तितकी चढेल ...
ब्रँडही तोच...फुक्कटात पडेल!
डोळ्यातलं पाणी...मेंदूचा चखणा..

पण, थिजलेल्या ह्रदयाचाचं बर्फ़ हवा!

-सुप्रिया.

गुलमोहर: 

रामदासस्वामींनी खडकातला बेडूक दाखवून शिवरायाचं गर्वहरण केलं होतं. या कवयित्रीनं खडकासारख्याच प्रतिमा व शब्दांतून जे भावपूर्ण शिल्प उभारले आहे त्याने मोठमोठ्या कवींचेही गर्वहरण होईल.
त्रिवार अभिवादन.

डोळ्यातलं पाणी...मेंदूचा चखणा..

पण, थिजलेल्या ह्रदयाचाचं बर्फ़ हवा!>>>

व्वा,

सुप्रिया , उपमा फार आवडल्या

धन्यवाद

कविता खूपच अप्रतीम आहे नेहमीप्रमाणे .
पण...........................................

(अधिक काही बोललो तर रागवाल म्हणून इतकेच म्हण्तो आणि थाम्बतो )

वा वैभवराव वा!

आपल्याला थांबताही येते हे ऐकुन बरेच बरे वाटले! Happy

मनःपुर्वक आभार सगळ्यांचे.

-सुप्रिया.

सुप्रिया जाधव. | 28 May, 2012 - 21:10 नवीन
वा वैभवराव वा!

आपल्याला थांबताही येते हे ऐकुन बरेच बरे वाटले>>>

Rofl