Submitted by सत्यजित on 12 September, 2008 - 08:14
जगुन घे रे गड्या.. राहुन जाईल जगायचं
मारुन घे रे उड्या.. राहुन जाईल उडायचं
बघता बघता कुपीतलं
अत्तर उडुन जाईल
लावू लावू म्हणता म्हणता
कुपी नाहीशी होइल
आज आहे.. उद्या येईल
असेलही परवा
नाही पाहिला उद्या कोणी?
मग कशा फुका पर्वा
जगुन घे रे गड्या एकदाच असत जगायचं
जगताना जगण्यावर ओझ नसत व्हायचं
जगुन घे रे गड्या.. राहुन जाईल जगायचं
मारुन घे रे उड्या.. राहुन जाईल उडायचं....
-सत्यजित.
गुलमोहर:
शेअर करा
जगुन घे रे
जगुन घे रे गड्या एकदाच असत जगायचं
जगताना जगण्यावर ओझ नसत व्हायचं
छान सत्यजित.
राहून जाईल
राहून जाईल जगायचं.. राहून जाईल उडायचं..
क्या बात है!
सत्या,
सत्या, सुंदर जमलाय रे.. विशेषकरून 'जगताना जगण्यावर ओझं'.. खुपच भावलं..
-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे
फारच छान..
फारच छान..
गड्या
गड्या सत्या, लय खास.
सत्यजित..
सत्यजित.. कविता छान आहे..:)
एकदम हरिहरनची एक गझल आठवली..
'झुम ले हस बोल ले प्यारी अगर हैं जींदगी
सांस के बस एक झौके का सफर हैं जींदगी'
सत्यजित, अत
सत्यजित,
अत्तर उडुन जाईल
लाउ लाउ म्हणजे रे काय?
"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.
लाउ लाउ
लाउ लाउ म्हणजे अत्तर लाउ लाउ म्हणता म्हणता कुपीच नाहिशी होईल तेव्हा अत्तर (जगण्यातली गंमत) उडून जायच्या आत व ज्यात अत्तराचा साठा असतो ती कुपी म्हणजे आयुष्य संपायच्या आत त्याचा उपभोग घे. हो ना रे सत्या, असंच म्हणायचं आहे ना तुला?
छान
छान सत्यजित!
पण अत्तर उडुन जाईल
लाउ लाउ म्हणता म्हणता लाउ लाउ म्हणजे रे काय?
"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.
कुलदीप
आपण जसं करु करु (म्हणजे आता करु मग करु), सांगू सांगू (आत्ता सांगू मग सांगू) म्हणतो तसे लाउ लाउ किंवा लावू लावू.
आहा,
आहा, सत्यजीत! ते लावू लावू म्हणता आवडलं आणि जगण्यावरचं ओझही.
सुरेखच
कुलदीप
कुलदीप भा.पो.. बदल केला आहे...
अश्विनी, तुला अनुमोदन, अत्तर म्हणजे उमेद आणि कुपी म्हणजे हे शरीर.
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार..
अरे नाही
अरे नाही रे चुकून मी दोनदा पोस्टल होतं!! चष्मा नव्हता दुसरं काय?
बादवे का. कों ची गो ष्ट नाही माहित मला
"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.
खुपच छान.
खुपच छान. जगायच आजच असत्.आजचा जन्म भोगायचा असतो.जगण्यातला आनंद आजच लुटायचा असतो. खुपच छान.
मस्त आहे
मस्त आहे कविता सत्यजीत.....अशा रचना येऊ द्या अजुन...:)
कविता
कविता प्रेरणादायी आहे. छान.
जगुन घे रे गड्या एकदाच असत जगायचं
जगताना जगण्यावर ओझ नसत व्हायचं
येथे जगताना जगण्यावर ओझ नसत व्हायचं, ऍवजी
जगताना जगण्याचे ओझे नसते घ्यायचे,
म्हटले तर पहिल्या ओळीला किंवा एकंदरितच पूर्ण कवितेला सांभाळून घेईल असे वाटते; मार्गदर्शन करावे.
चू.भू.द्या.घ्या.