नवीन किल्ल्याचा शोध!! - मायबोलीकर "हेम" यांचे अभिनंदन!!!!!

Submitted by जिप्सी on 27 May, 2012 - 03:33

प्रसिद्ध गिर्यारोहक राजन महाजन (ठाणे) आणि हेमंत पोखरणकर (नाशिक) यांनी आजवर अज्ञात असलेला लोंझा हा औरंगाबादजवळील किल्ला प्रकाशात आणला आहे.

गुगल सॅटेलाईट नकाशाचे वाचन करीत असताना महाजन, लागवणकर यांना अजिंठा-सातमाळ डोंगरांच्याजवळ सुटावलेल्या भागात गोलाकार डोंगरावर आयाताकृती टाक्या आढळल्या. हा नवीन भाग नजरेत पडल्यावर या दोघांची शोधक नजर जागृत झाली. २० मे रोजी त्यांनी चाळीसगाव- सिल्लोड दरम्यानच्या नागदच्या दिशेने प्रयाण केले. महादेव टाका डोंगररांगांच्या पायथ्याशी चौकशी केल्यानंतर त्यांना पायथ्याशी आश्रम असल्याचे व डोंगरावर महादेवाचे टाक(पाणी साठा) असल्याचे सांगण्यात आले. समुद्रसपाटीपासून सुमारे ४८५ मीटर व पायथ्यापासून सुमारे ८५ मीटर उंचीवर हे टाक आहेत. अजिंठा-सातमाळा डोंगररांगांमधील या सुटावलेल्या डोंगरावर खोदीव पायऱ्या, जोत्याचे दगड, नक्षीकाम, कोरीव काम न केलेली लेणी आढळून आली. प्रशस्त गुहा, तेथे शिवलिंग, गुहा टोके, कोरीव खांब, एवढय़ा उंचीवर पाण्याची सुविधा, नागद बाजूस खोदीव पायऱ्या, देवीची मूर्ती, जोत्यांचे अवशेष, पीराचे स्थान, टाक्यांचा समूह, कोसळलेली तटबंदी हे ऐतिहासिक अवशेष पाहून गिर्यारोहक आनंदित झाले.
(लोकसत्ता)

आजच्या "लोकसत्ता" वृत्तपत्रातील हि बातमी:
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=229...

हार्दिक अभिनंदन हेम

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन Happy Happy Happy

आता मा.बो भटक्यांची स्वारी होऊन जाऊ द्यात आणि मग आम्ही वॄत्तांत वाचायला मोकळे Happy Happy Happy

अरे वा अभिनंदन हेम. उत्तम कामगिरी. फोटोही टाका इथे लवकरच.
जिप्स्या धन्स बातमी दिल्याबद्दल.

अभिनंदन !!!

आता मा.बो भटक्यांची स्वारी होऊन जाऊ द्यात आणि मग आम्ही वॄत्तांत वाचायला मोकळे >>>>

फ़क्त वाचायला ?

सामील पण होऊ की

अभिनंदन !!!
जिप्स्या, प्रचिरहीत लेख टाकून तू तुझ्या आजवरच्या कारकिर्दीला काळीमा फासलास. कुफेहेपा ! Proud

अरे वा! दोघांचेही अभिनंदन!
जिप्स्या, ही बातमी इथे शेअर केल्या बद्दल धन्यवाद!

भन्नाटच! Happy जिओ मेरे लाल....
[कै कै लोकं पण काय अर्क अस्तात ना? काय उद्योग करतील अन कसे शेवटास नेतिल काही सान्गता येत नाही, म्हणून तर ते असामान्य ठरतात, आमच्यासारखे विझलेले पोटार्थी दोनपायान्चे पशू नाही]

जिप्स्या, प्रचिरहीत लेख टाकून तू तुझ्या आजवरच्या कारकिर्दीला काळीमा फासलास. कुफेहेपा ! Happy
हे पाप मी माझ्या डोक्यावर घेतो.. Happy
..पुन्हा एकदा आभार सगळ्यांचे

Pages