वगैरे

Submitted by देवा on 12 September, 2008 - 07:47

वैभवची अप्रतिम गझल 'वगैरे' चं विडंबन
वैभवची माफी मागून..
मूळ गझल वगैरे

पुन्हा घेतली मी उधारी वगैरे
पुन्हा लोक झाले 'भ'कारी वगैरे

खरी आज मी टाकलेलीच नाही
तुझी मात्र चर्या बिचारी वगैरे

बिचारा खरोखर कचेरीस गेला
अरे छान व्हावे भिकारी वगैरे

कशाचीच आता नशा येत नाही
तशी पाव होते दुपारी वगैरे

खिशा ती बडीशेप घ्यावी भरोनी
कुठे रोज मिळते सुपारी वगैरे

कसे सांगु सांगा नव्हतेच पैसे
दुकानात होती भुसारी वगैरे

कसे नेमके दार हे बंद झाले
कपाटात होत्या विजारी वगैरे

असे ऐकले शेवटी न्याय होतो
विकाव्या कशाला वखारी वगैरे

किती 'जीवना' रोज देतोस धमक्या
सिनेमात कसली हुशारी वगैरे

गुलमोहर: 

कसे नेमके दार हे बंद झाले
कपाटात होत्या विजारी वगैरे

खी खी खी... :)) मस्त...

असे ऐकले शेवटी न्याय होतो
विकाव्या कशाला वखारी वगैरे>>> देवा हा शेर विडंबनात कशाला रे!! खूपच मस्त आहे हा शेर.

नखशिखान्त सुंदर. 'भ'कारी, भिकारी, दुपारी, सुपारी..... सगळेच बेदम आहेत.

कशाचीच आता नशा येत नाही
तशी पाव होते दुपारी वगैरे

खिशा ती बडीशेप घ्यावी भरोनी
कुठे रोज मिळते सुपारी वगैरे

कसे नेमके दार हे बंद झाले
कपाटात होत्या विजारी वगैरे
Lol

देवा, हॅप्पी बड्डे!

धन्यवाद सत्यजित, श्यामलि, दाद, चिन्नु..:)