Submitted by अज्ञात on 12 September, 2008 - 07:46
ओघळू पहतेय का ती
डोळ्यांमधून आसवांद्वारे ?
अं हं, तसं होणार नाही.......
त्याच्या रत्नजडित काळजात
तृप्त आहे म्हणाली ती
तिच्या माणिक शब्दांसहित !!
मग ?
हा श्वास असावा त्या अदृष्य दरवळाचा
दृष्य उभं करतांना पापणीवर साकळणारा..
दंवाइतकाच निर्मळ, पारदर्शी, संजीवक
आणि रक्ताच्या नात्याची घनिष्ट ओळख म्हणून
त्याच चवीचा.....!!
हा उचंबळ आहे तिच्या सयींचा
स्वयंभू ............. !!!!!
.......................अज्ञात
१३४२,नाशिक
गुलमोहर:
शेअर करा
साष्टांग
साष्टांग तुम्हाला.
रक्ताच्या नात्याची घनिष्ट ओळख म्हणून
त्याच चवीचा.....!!
सही एकदम.
त्याच्या
त्याच्या रत्नजडित काळजात
तृप्त आहे म्हणाली ती
तिच्या माणिक शब्दांसहित !!>>>>मला कविता इथेच संपली असं वाटलं......आणि आवडली
श्यामली, तू
श्यामली,
तुझं म्हणणं बरोबर आहे. ही कविता तशी दोन भागांची झाली आहे. एक भाग, "ती" काय म्हणाली तो आणि दुसरा, "त्याला" काय वाटलं तो !! तुझा प्रतिसाद भावला
थँक्स.
तू जिनीयस आहेस !
...................अज्ञात