घे उत्तुंग भरारी,

Submitted by अनिल तापकीर on 26 May, 2012 - 02:18

घे उत्तुंग भरारी,

(सध्या परिक्षांच्या निकालांचे दिवस आहेत. काहींना यश मिळते तर काहीजणांना अपयश अपयशी विध्यार्थ्यांसाठी
ही कविता नक्कीच प्रेरक ठरेल )

घे उत्तुंग भरारी,दाही दिशा मोकळ्या आहेत
भिऊ नकोस डगमगू नकोस,अनंत वाट खुल्या आहेत

रस्ते बंद आहेत म्हणून, चालायचे तू थांबू नकोस
नवीन रस्ता शोधण्याचा, प्रयन्त मात्र सोडू नकोस

एका जागी थांबून, तुला कोणी काही देणार नाही
हात हलवल्याशिवाय, घास तोंडात जात नाही

सुरुवातीच्या अपयशानंतर हि, पुढे उज्वल यश आहे
दाट अंधारानंतरही, पुढे तेजस्वी प्रकाश आहे

चढ उतार,सुख दुख: तर जीवनात येतच असतात
इथे समर्थपणे लढनारेच, यशस्वी होत असतात

गुलमोहर: