’व्हॅल्यू’

Submitted by सुप्रिया जाधव. on 23 May, 2012 - 09:55

लहानपणी....

शाळेत जाता - येता....
एक चाळा चालायचा.....
स्वत:चीच सावली पकडण्याचा !
कधी पुढची, कधी मागची ,
कधी लांबडीशी, कधी ठेंगणी- ठुसकीशी....

तारुण्यात....

सावलीचा विसर पडत गेला
स्वत:च अस्तित्व शोधण्यात !
कधी स्पर्धा वा-याशी ,
कधी स्वप्नात रमायची ,
कधी चाले अखंड बडबड , कधी संवाद स्वत:शी....

आजकाल....

स्वत:चाही विसर पडत चाललाय...
कमावलं - गमावल्याची गोळाबेरीज ,
कोणत्याही ’मेथडने’ शून्यचं येतेय...
शून्य!...स्वत:ची ’ व्हॅल्यू’ नसणारं

पण...पण...
ज्या आकड्यापुढे जितकी शून्य...
तितकीच त्याची किंमत वाढ्वणारं !!!

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैयक्तिक मतः तुमची कविता एक तृतियांश आवडली. मात्र ते एक तृतियांशपण अख्ख्या कवितेला व आशयाला व्यापून गेलं. मला फक्त तिसरं कडवं आवडलं. अतिशय!! मला वाटलं की हे कडवं म्हणजे एक सुंदर, भावव्याकूळ व आशयपूर्ण अशी एक संपूर्ण कविताच आहे. एका आकड्याकरीता आसुसलेल्या व त्याच्याविना न्यून्यत्व सहन करत असलेल्या शून्य व्यक्तिमत्वाचं आक्रंदन आहे.
मात्र या जबरदस्त प्रतिमेशी पहिल्या दोन कडव्यातील सावलीचा संबंध खूपच दूरचा वाटतो. ती कडवीही एक स्वतंत्र कविताच वाटते, पण स्वतंत्र. ती कडवी व तिसरे यांचा आशय एक मात्र व्यक्तित्वं वेगवेगळी वाटली.
अर्थात एरवीही आपली कविता अप्रतिम आहे यात संशय नाही.

मनःपुर्वक आभार मंडळी!

@ pradyumnasantu ,

<<<एका आकड्याकरीता आसुसलेल्या व त्याच्याविना न्यून्यत्व सहन करत असलेल्या शून्य व्यक्तिमत्वाचं आक्रंदन आहे.>>>>

आणि हे आक्रंदन प्रभावी व्हावे म्हणूनच बाल्य व तारुण्य या जीवनाच्या दोन अवस्थांचा उहापोह करणे तेवढेच आवश्यक वाटले मला.

विशेष आभार,

-सुप्रिया.

सुप्रियाताई बरोबर आहे तुमचं ............

प्रद्युम्नजी म्हणतायत तसं............प्रत्येक कडवं एक स्वतंत्र कविता वाटते आहे हेही पटतंय .................

(टीपः’ व्हॅल्यू’ नसणार= ’ व्हॅल्यू’ नसणारं असे करावे............)

सुप्रियाजी,
आपली कविता नि:संशय छान आहे. मात्र मी "प्रद्युम्नसंतु" च्या मताशी संपूर्ण सहमत आहे, की तिसर्‍या कडव्यातील जबरदस्त प्रतिमेशी पहिल्या दोन कडव्यातील सावलीचा संबंध खूपच दूरचा वाटतो. ती कडवीही एक स्वतंत्र कविताच वाटते, पण स्वतंत्र.
"प्रद्युम्नसंतु" चे रसग्रहण "मला वाटलं की हे कडवं म्हणजे एक सुंदर, भावव्याकूळ व आशयपूर्ण अशी एक संपूर्ण कविताच आहे. एका आकड्याकरीता आसुसलेल्या व त्याच्याविना न्यून्यत्व सहन करत असलेल्या शून्य व्यक्तिमत्वाचं आक्रंदन आहे." तितकेच सुंदर!
असे अ‍ॅप्रीशिएशन मिळणे, हे देखील कलावंताचं भाग्यच असतं, बरं! हार्दिक शुभेच्छा!