उटीची ब्यूटी

Submitted by मानुषी on 23 May, 2012 - 02:18

आम्ही फ्रेब्रुवारीत उटीला गेलो होतो. फेब्रुवारीतही मस्त थंडी होती. तिथले काही फोटो.
मॉर्निंग वॉक...

DSCN1322_0.JPG

जागोजागी दिसणारे हिरवे गार चहाचे मळे

DSCN1324_0.JPG

हॉटेल रूम मधून दिसणारे दृश्य.

DSCN1325_0.JPG

कोडाइकॅनॉलचे निसर्गरम्य तळे. या तळ्याजवळ सायकली भाड्याने मिळतात. हा जवळजवळ ६ कि.मि.चा ट्रॅक असावा. अप्रतीम सुंदर. हा मी पूर्ण केला. काही सायकली पिक्चरमधे असतात तश्या एकापुढे एक अश्या २ सीट्सवाल्या. ज्यांना जरा रोमॅन्टिक सायकल सफर हवीये त्यांच्या साठी. पण मी सिंगलसीट सायकलच घेतली. कारण याला स्पीड जास्ती पडतो आणि कंफर्टेबल.

DSCN1333_0.JPG

उटीहून कोडाइला जाताना वाटेत हे उंचावरचे कार्तिकस्वामींचे(मुरुगन) मंदिर. इथे रोपवेने जायला लागते.
पण आत प्रचंड गर्दी आणि खूपच कमर्शियलाइझ ठिकाण वाटले.

DSCN1357.JPG

कोडाइमधे एक उंचावरचे ठकाण होते. तिथून तुम्हाला खालचा कोडाईचा सुंदर नजारा दिसतो. तिथे पर्यटकांसाठी रानमेवा, चहा, इतर काही लोकल वस्तूंचे स्टॉल्स होते.

DSCN1388.JPG

चायवाली इन अ‍ॅक्शन.

DSCN1389.JPG

नजर जाईल तिकडे हिरवी गार भातशेती

DSCN1365.JPG

कोडाईला पाइन वृक्षांच्या राईत आणि इतरत्रही आपले बरेच पूर्वज विहार करत होते...त्यातलेच एक माता बालक.

DSCN1395.JPG

उदकमंडलम हे नाव सार्थ करणारे दृश्य.....

DSCN1399.JPGDSCN1430.JPG

वाटेतला छोटासा धबधबा

DSCN1435.JPGDSCN1436.JPG

या ठिकाणी चहा घेतला. बर्‍याच दुकानातून असे बंब दिसत होते.

DSCN1359.JPG

त्या त्या गावच्या मेन रोडवरून, बाजारातून पायी फेरफटका मारला की त्या त्या गावचा मस्त फील येतो. उटीहून कोडाईला जाताना वाटेतल्या छोट्या गावातली ही दृश्ये. बरेच लोक बरोबर असल्याने फेरफटका बसमधूनच मारला. फोटोही बसमधूनच घेतले.

DSCN1351.JPGDSCN1352.JPGDSCN1353.JPGDSCN1355.JPG

गुलमोहर: 

हं..........किरण ...आम्हालाही!
जागू .........पूर्वजच ना आपले!

गेल्या वेळी ट्रेनने गेलो.>> ती मेटूपालयम ते उदकमंडलम ( उटी च स्थानिक नाव ) रेल्वे का? फार मस्त प्रवास असतो. मी मिस केला होता. आता पुन्हा जायला हव.

दिनेशदा मी पहिल्यांदाच गेले होते. पण बरोबरचे काही बर्‍याच वर्षांनी पुन्हा उटीला येत होते. त्यांना उटी फार बकाल/घाण झालेली वाटली आणि कॉन्क्रीटचं अतिक्रमणही प्रचंड प्रमाणात वाटलं.
सर्वांना धन्यवाद.

मी फक्त उटीच मिसलय तमिळनाडु मधलं Sad
कोडाई मस्तच!
मी उन्हाळ्यात गेलेले (बरोबर एका वर्षापुर्वी) आणि तेंव्हा पाऊस पडतं होता
धमाल
अतिशय सुंदर दिसलेलं

मी नोव्हेंबर मधे जाऊन आलो. रूम हीटर घ्यावा लागला होता>>>
किरण - मागच्या आठवड्यात ऊटीला जाऊन आलो. इतकी प्रचंड थंडी की
extra blankets मागवावी लागली.

मानुषी बाकी फोटो मस्त!

रिया, इनमिन्तीन, मार्को, वत्सला, अनघा मीरा, नताशा, जो एस, दक्स, चिमुरी, रैना, शोभा, जिप्सी
धन्यवाद!

मानुषी मस्त आहेत फोटो. पण पिकासामध्ये लार्ज साईजवर टिक करुन मग टाक इथे म्हणजे मोथ्ठे दिसतील.

मी आठेक वर्षांपुर्वी उटीला गेले होते. कोईंबतुर ते उटी बसने प्रवास केलेला. वाटेतले जंगल फणसांनी भरलेले आणि जागोजागी रानमेवा म्हणुन फणसाचे गरे मिळत होते. आपल्या तळहाताएवढे लांब आणि खुप गोड गरे मी तेव्हा भरपुर खाल्लेले.

उटीतल्या उडूपी हॉटेलांमध्ये खाण्यासोबत गरम पाणी मिळते हे बघुन नवल वाटलेले. Happy

बाकी उटी तेव्हा खुप आवडलेली. डबल सायकलबद्दलचे वाचुन परत जावेसे वाटायला लागले.

आहाहा.. मस्तच आहेत फोटो..
खूप वर्ष झाली मी ऊटी पाहिल होत.
चहाचे मळे काय छान दिसतात..
आणी सगळीकडे सगळ्या दुकानाची नाव निलगिरी हे नि निलगीरी ते.. अशी होती..

Pages