Submitted by निशिकांत on 23 May, 2012 - 01:59
खरे सांगतो माझ्यापासुन मीच हरवलो होतो
डोळ्यामध्ये तुझ्या पाहता पुन्हा गवसलो होतो
आस तुझी सोडून दिली मी सर्व संपले होते
वळून तू बघता जातांना मी मोहरलो होतो
आज अचानक कबरीवरती दिवा लावला तू अन्
प्रेम कळाले मरणानंतर तरी बहरलो होतो
एक कवडसा जगण्यासाठी मला पुरेसा होता
तो मावळता अंधारी मी मुकाट निजलो होतो
असंख्य कोल्हे, नभी गिधाडे, आप्त भोवती असता
जगणार्याने कसे जगावे? मी गांगरलो होतो
देव म्हणे "कैदेत राहिलो धूर्त पुजार्यांच्या,
सोडुन गेलो मंदिर जेथे मी गुदमरलो होतो"
किती फाटका प्रपंच माझा! लोक सुदामा म्हणती
कधी न झाली कृष्णकृपा, पण मी सावरलो होतो
कयास होता उगारलेले हात गारद्यांचे पण
तेच हात पाठीवर फिरता मी गहिवरलो होतो
भूक लागली "निशिकांता"ला आपुलकीची इतकी
अपुल्यांच्या शोधात तिरंतर मी वणवणलो होतो
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
गुलमोहर:
शेअर करा
एकंदर गझल ओके आहे पण यावेळी
एकंदर गझल ओके आहे पण यावेळी (कबर वगैरे) किंचित खटकले
छान!
छान!
आवड्ली
आवड्ली
आभार सर्वांचे प्रतिसादाबद्दल.
आभार सर्वांचे प्रतिसादाबद्दल.
गझल आवडली. पण - देव म्हणे
गझल आवडली.
पण -
देव म्हणे "कैदेत राहिलो धूर्त पुजार्यांच्या,
ह्या मिसर्यात २ मात्रा कमी वाटत आहेत.
तसेच, मक्त्यात 'निरंतर' हवे आहे का? की 'तिरंतर' चाही तोच अर्थ होतो?