रंक आता राव झाले

Submitted by वैभव फाटक on 22 May, 2012 - 11:55

जीत होता नाव झाले
रंक आता राव झाले

कोंबड्याची बांग नाही
आज जागे गाव झाले

जिंकताना हारलो मी
व्यर्थ सारे डाव झाले

आठवांना चाळताना
झोंबणारे घाव झाले

वेध घेण्या काळजाचा
लाजण्याचे आव झाले

चार नोटा वाटता मी
भुंकणारे म्याव झाले

वैभव फाटक ( २६-०२-२०१२)

गुलमोहर: 

रसप जी : अपले तखल्लुस जितू असल्याचे स्मरते
मतल्यात जीत आहे
अक्षर-शः वेगळे शब्द आहेत ना ते ............!

Biggrin Biggrin Biggrin

माझा तखल्लुस "वैभवा" असा आहे तो तसाच ठेवावा लागतो अगदी र्‍ह्स्व-दीर्घासहित !!

त्याला फ्लेक्जिबल करायचे असल्यास काय कारावे लागेल ??

माझा तखल्लुस "वैभवा" असा आहे तो तसाच ठेवावा लागतो अगदी र्‍ह्स्व-दीर्घासहित !!

त्याला फ्लेक्जिबल करायचे असल्यास काय कारावे लागेल ?? >>>>

बराच विचार!! Sad

बराच विचार!! अरेरे>>>>>>>>>>>>

रणजित राव माझा विचार करून झलाय ............. तुम्हाला काही नवीन सुचतय का ते बघत होतो

आपण सुचवलेल्या जुन्याच उपायाबद्दल धन्यवाद !!