स्मरण

Submitted by रमा नाम़जोशी on 22 May, 2012 - 02:25

तुला आता ते सगळं जुनं आठवेल की नाही कुणास ठाऊक.......
पण तरीही बघ प्रयत्न करुन स्मरतंय का काही किंचित अंधुक......

रानोमाळ भटकत रहायचो आपण अनवाणी पायांनी
लाल लाल गुंजा आणायचो धुळीभरल्या हातांनी
एकसमान वाटणी व्हायची पायरीवर आनंदानी
आजही आहे माझ्याकडे ती गुंजाभरली संदुक
तुला आता ते सगळं जुनं आठवेल की नाही कुणास ठाऊक......

संध्याकाळी पहायचो आपण नदीकाठाचं पाणी
मासे पकडत रहायचो गळाला अलगद ठेऊन निशाणी
आपल्या कोलाहलाने मासे पळत मिळ्त नसे कुणी
त्याच गळाची आजही मी करुन ठेवलीये जपणुक
तुला आता ते सग्ळं जुनं आठवेल की नाही कुणास ठाऊक........

मी खुप रागवायचे कधी कधी तुझ्यावर
हळुच गोंजारून मला तु न्यायचास त्या झुल्यावर
बकुळीची फुलं परडीभर तु आणुन दयायचास मला
त्या गंधाने परमाळतोय अजुनही हा देह नाजुक
तुला आता ते सगळं जुनं आठवेल की नही कुणास ठाऊक.......

आज अनेक वर्षानी तू भेटला होतास असा
तुझ्या पत्नी-मुलाबाळात सुखावलेला जसा
पुसटशी चौकशी करशील ही वेडी होती आशा
आत्ता कळतंय मला माझा सहवास ही निव्वळ तुझी करमणुक
तुला आता ते सगळं जुनं आठवेल की नाही कुणास ठाऊक.........

गुलमोहर: 
शब्दखुणा: