Submitted by खडूसराव on 21 May, 2012 - 03:04
कमजोर माणसाने बाही न सरसवावी
लोकामधे स्वत:ची इज्जत स्वत: जपावी
बाराखडीसही जर ना वाचले कधीही
गझलेवरी कुणाच्या अक्कल न पाजळावी
हर एक भावनेला ना मांडणे जरूरी
जर छंद बोचती तर कविताच का लिहावी ?
टीका पचेल त्याने लोकांसमोर यावे
केवळ स्तुतीकरीता कविता घरी म्हणावी
कविता लिहायची ह्या मुक्तांगणात ज्याला,
त्याला "गुलाम झालो" ही बोच का रहावी '
'मी श्रेष्ठ' दाखवाया करती विरोध कोणी,
ती 'श्रेष्ठता' अशांनी गझलेत दाखवावी
"का माजलास इतका ?" म्हणती तुलाच 'केशव'
प्रतिभाच माजण्याची त्यांच्याकडे नसावी !
- के.गो.
गुलमोहर:
शेअर करा
गमतीजमती फुटकळ नाहीयेत हो,
गमतीजमती फुटकळ नाहीयेत हो, गमतीजमतीच सिरियस झाल्यायत, फुटकळ गझला आहेत
लोकहो, दाद द्यायला सरसावून
लोकहो, दाद द्यायला सरसावून बसा.... बहुधा आज गुलमोहरात माझी एक नवी गझल पडेल
>>>>
येऊ दे ... ये... ये ....ये...
ह्या सर्व प्रकारांनी
ह्या सर्व प्रकारांनी नवोदीतांचे खच्चीकरण झाल्यास मराठी गझलेच्या भवितव्याला जबाबदार कोण?

ह्या सर्व प्रकारांनी
ह्या सर्व प्रकारांनी नवोदीतांचे खच्चीकरण झाल्यास मराठी गझलेच्या भवितव्याला जबाबदार कोण?>>>>
जुनं कोण आहे अजून इथे ?
सगळेच नवोदीत, त्यामुळे खच्चीकरणातून गझल निर्मीती हा नवा पायंडा पडेल
ह्या सर्व प्रकारांनी
ह्या सर्व प्रकारांनी नवोदीतांचे खच्चीकरण झाल्यास मराठी गझलेच्या भवितव्याला जबाबदार कोण?
>>>
अहो नवोदीत म्हणता म्हणता काही लोकं 'नव्वदीत' पोचल्येत!
इर्शाद , बेफीजी
इर्शाद , बेफीजी ..................इर्शाद
वाट बघ्तोय .......................तुमच्या नवीन गझलेची
आपुन का
आपुन का कॉट्रीबुशन:
मुशाफिरीसाठी शहरोशहरी हिंडत असतो
कॉहॉ वरती फारा दिवस झुरते काणे
कविता लिहायची ह्या
कविता लिहायची ह्या मुक्तांगणात ज्याला,
त्याला "गुलाम झालो" ही बोच का रहावी '>>>>>>>>> अगदी बरोबर .स्ट्रोक थेट .
<<< गमतीजमती फुटकळ नाहीयेत
<<< गमतीजमती फुटकळ नाहीयेत हो, गमतीजमतीच सिरियस झाल्यायत, फुटकळ गझला आहेत >>>
प्रचंड सहमत. (गंभीर मुद्रा करून विचारमग्न असलेला बाहूला)
हा पर्यायी शेर आहे का? फार
हा पर्यायी शेर आहे का?
फार उच्छाद मांडला गझलाकारांनी
फोडुन एकेकाची मांडी धारोष्ण प्यावी
बेफिकीर, खच्चीकरणातून
बेफिकीर, खच्चीकरणातून नवनिर्मिती...? कुठल्या पांजरपोळात?

आ.न.,
-गा.पै.
रोज इथे येऊन वाचर्त असतोच. पण
रोज इथे येऊन वाचर्त असतोच. पण मी ही सहजच लिहिलेली रचना वाचायला परत झालेच नव्ह्ते. आज अचानक आठवले.
तसे रचनेवर अभिप्राय कमीच आहेत म्हणा. पण तरी सर्वंचे धन्यवाद.
(No subject)
Pages