विस्मरणात गेलेले शब्द...

Submitted by मीरा जोशी on 20 May, 2012 - 00:40

विस्मरणात गेलेले शब्द...
विसण = आंघोळीसाठी तापवलेल्या अति गरम पाण्यात गार पाणी घालून ते भाजणार नाही इतपत ठेवतात. त्या गार पाण्याला विसण म्हणतात.
ताटली = जेवणाच्या ताटापेक्षा थोडी लहान
सांडशी = चिमटा.. गरम भांडे धरण्यासाठी वापरतात
कुंचला = चित्रकाराचा रंगवायचा ब्रश
हाळी = हाक मारणे / आवाज देणे
रांजण = आकाराने मोठा असलेला पाण्याचा माठ
गंठण = मंगळसूत्र (बहुतेक )
वरवंटा = ओला मसाला वाटण्याचे साधन
पारोसा = आंघो़ळ न करता ..(आज पारोशानेच बाहेर जावे लागले)
टपाल = पत्र
दिवेलागणी = संध्याकाळची वेळ ..देवासमोर दिवा लावण्याची
आमोशा पोटी = काहीही न खाता , उपाशी
आवंढा = ?
तोबरा भरणे = तोंडात मोठा घास घेणे
वामकुक्षी = दुपारची झोप, दुपारचे जेवण झाल्यानंतर काढलेली डुलकी
पायताण = पादत्राण = चपला
बारदाण = गोणपाट = पोते
लुगड = साडी = पातळ (नेसायचे)
फोक = लवचीक काठी (हा साधारण चिन्चेचा आसतो, २-३ पिढ्यामागे शिक्शा करण्यसाठी घरी वडिल व शाळेत गुरुजी याचा वापर करीत असत)
परस = घराची मागची बाजू इतिहासजमा झाल्यने परसाकडला जायची सोय राहिली नाही.

तम्बाखू पुडीतून मिळायला लागल्यापासून चन्ची सुध्धा इतिहास जमा होत आहे
संदूक = छोटी पेटी ज्यात मौल्यवान वस्तू वगैरे ठेवतात. उदा. दागिने, ठेवणीतले उंची कपडे, अत्तरे इ.
हडपा = मोठा पेटारा ज्यात साठवणूकीच्या वस्तू किंवा मोठ्या कार्यक्रमाच्या दिवशी लागणार्‍या वस्तू ठेवतात. देवाची पालखी, मोठी पा
वदतोव्याघात...म्हणजे.. प्रतिपादनातील स्पष्ट विसंगती

कडी-कोयंडा
वाघिण = मालगाडीचा डब्बा (इंग्रजी वॅगन वरुन)
शिस्त = systematics (शिस्त मॅटिक चा अपभ्रंश)
अपभ्रंश = चूकीचा उच्चार
यच्च्यावत = सर्व (पूर्ण समूह)
एकसमयावच्छेद = एकाचवेळी
व्यतिरीक्त = ...च्या शिवाय (...ला सोडुन)
उपरोक्त, उपरोल्लेखित, उपरनिर्दीष्ट = वर लिहिलेले, आधी सांगितलेले
पेला = पाण्याचे भांडे
लोटी = पाण्याचे पात्र
घंगाळ = पाणिसाठवण्याचे मोठे भांडे (पात्र)
माठ = पाणी साठवण्याचे मातीचे पात्र.
जरत्कारू चा शब्दकोशातील अर्थ आहे....अशक्त व हडकुळा(मनुष्य)
जाजम = सतरंजी
छबिना = देवाचा छबिना असतो......त्याची पालखीत मिरवणुक कढतात
चंबू = लहान मुलांचे विशिष्ट आकाराचे पाण्याचे भांडे.
त्याला गडु हाही शब्द आहे.
घडवंची(स्त्री): चार पायांची व वर फळी असलेली लाकडी वस्तू
छकडा = बैलगाड्यांच्या शर्यतीत वापरला जाणारी हलकी बैलगाडी
मॅनिला = सदरा = शर्ट
विजार = पँट
श्मश्रू = केस कापणे
जाजम = गालिचा = कार्पेट
ओगराळं = आमटी वाढण्याचं पात्र
डोया = माठातून पाणी काढण्याचा डाव किंवा दांडी असलेलं भांडं
परस = घराची मागची बाजू
घडवंची = तिवई = तीनपायी (ज्यावर माठ, छोटे पिंप ठेवतात)
छबिना = आरसा (?)
चंची = कमरेला अडकवायची पानाची कापडी पिशवी.
कसा = कमरेला अडकवायची पैशाची कापडी पिशवी.
चंबू = लहान मुलांचे विशिष्ट आकाराचे पाण्याचे भांडे.
गुडदाणी = गुळ आणि दाण्याची चिक्की (?).
छकडा = अच्छादित बैलगाडी.
पांगुळगाडा = लहान मुलांस चालायला शिकण्यास मदत करणारा गाडा
अवजारं = व्यावसायिक हत्यारं (शेतीची, सुताराची, नाव्ह्याची इ.)
चुलीच्या बाजूला आहे तीला वैल म्हणतात.
सध्या
किल्ली या ऐवजी चावी आणि कुंचा या शब्दा ऐवजी झाडू हे शब्द प्रचलित आहेत
माळवद म्हणजे काय?
माळवद = गच्ची (हा शब्द अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक इ. भागात प्रचलित आहे)

सन्दर्भ = Avinash G Kulkarni फेसबुक

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ताटली, सांडशी, कुंचला, हाळी, रांजण, गंठन, पाटा, वरवंटा, पारोसा, टपाल, दिवेलागणी, आमोशा पोटी, आवंढा = ?>>आवंढा गिळणे(वाक्यप्रयोग), औंदा=यंदा, तोबरा भरणे, वामकुक्षी, पायताण, बारदाण, लुगडं, फोक, परस, कडी-कोयंडा, घंगाळ, माठ, चंबू, गडु, सदरा, विजार, तिवई, तीनपायी, चंची, गुडदाणी, छकडा, अवजारं, सध्या,
किल्ली
हे शब्द अजुनही सर्रास वापरले जातात, माझ्या ऐकण्यात आहेत(जास्त करुन गावात).

आमोशा पोटी च्या ऐवजी 'अनशा पोटी' असं पाहिजे ना?

यातला डोया, श्मश्रू सारखा एखादा शब्द सोडला तर मला वाटतं सगळेच शब्द अगदी सर्रास वापरात आहेत की!

किल्ली, कुंचा हे शब्दपण वापरतातच. मला वाटतं महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांत थोडे वेगवेगळे समानार्थी शब्द वापरले जातात.

> फोक = लवचीक काठी (हा साधारण चिन्चेचा आसतो, २-३ पिढ्यामागे शिक्शा करण्यसाठी घरी वडिल व शाळेत गुरुजी याचा वापर करीत असत)

बेशरमाची फोक या कामाकरता उत्तम!

अस्चिगा, स्वानुभव का रे? Wink Light 1

रच्याकने, बेशरमाला मराठीत पण बेशरमच म्हणतात का? वेगळं नाव नाही?

हे नाव परभणीचे आहे - मराठीच आहे. जिकडे-तिकडे ही झाडे दिसतात. (निदान दिसायची तरी ३० वर्षांपुर्वी).

ओके, मी हे नाव पहिल्यांदा उत्तरप्रदेशात ऐकलंय. पुण्यात ही झाडं कधी दिसलीच नसल्याने मराठी नाव माहित नव्हतं Proud

छान आहे संग्रह. तरीही वर कित्येकांनी आपापल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे यातील जवळपास ९०% शब्द आजही वापरात आहेत. जरी मुंबई/पुण्यासारख्या मेट्रो सिटीतून हद्दपार झाल्यासारखे वाटत असले तरी उर्वरित महाराष्ट्रात सर्रासपणे प्रचलित आहेत, विशेषतः एकत्रित कुटुंबात, जिथे आजीआजोबा रोजच्या व्यवहारात सहभाग घेतात.

"शिक्शा करण्यसाठी घरी वडिल व शाळेत गुरुजी याचा वापर करीत असत)"

~ त्या चुकार मुलाला 'फोकलून काढला' असेही संबोधन वापरत. शाळेत गुरुजीनी मारले ही तक्रार घरी सांगितली की बाप उलट त्या पोरालाच परत फोकलून काढत असे.

"वैल" नाम फार दिवसानी वाचनात आले. तव्यावरील भाकरी वैलावर टाकली की तिला छानपैकी पापुद्रा/पदर येत असे....त्यातून बाहेर पडणारी वाफही सुखकारक.

चुलीतील त्या लालभडक तप्त कोळशांना "इंगळ" म्हणत.

छबिना = आरसा नव्हे....छोटा तंबू. हत्ती उंटावर बांधण्यात येणारा, ज्यात स्त्रीवर्ग पडद्यात राहून प्रवास करीत असे.

श्मश्रू = "केस कापणे" यासाठी हे सरसकट विधान होत नाही. केस कापणे याला 'कर्तन' हेच नाम असून ज्यावेळी डोक्याचा पूर्ण गोटा (इकडे कोल्हापूर भागात 'चमन' म्हणतात) करायचा असतो त्यावेळी 'श्मश्रू' नाम वापरतात.

असो. वर म्हटल्याप्रमाणे भाषावृद्धीसाठी सुंदर उपयोग होऊ शकतो या विस्मृतीत चाललेल्या शब्दांचा.

अशोक पाटील

अशोक.,

कोकणात (की महाराष्ट्रात सर्वत्र?) विंचवालादेखील इंगळी म्हणतात. उदा : इष्काची इंगळी डसली.:-)

शिंच्या ही शिवी खास कोब्रा ढंगाची गणली जाते (चुभूदेघे). बर्‍यांच वर्षांसांनुनांसिक कोब्रांवांजांत ऐकांयांमिंळालीं नाहीं!

कालवड हा शब्द गावाकडे आजूनही वापरात असावा. बोका, भाटी ही संबोधने शहरांत ऐकू येत नाहीत. त्याऐवजी सरसकट मांजर असे म्हंटले जाते.

आ.न.,
-गा.पै.

अविनाश कुलकर्णी ( इथे अवि अप्पा हा आयडी ) एक वल्ली आहेत. डोक्याला ताप नसणारे धागे हे त्यांचं वैशिष्ट्य. कितीही टीका झाली तरी पुन्हा म्हणून त्या धाग्यावर फिरकत नाहीत. एकदा "मोजा" या नावाचा धागा काढला होता. आत काय असावं म्हणून उघडून वाचलं तर मोजा डाव्या पायात आधी घालावा कि उजव्या हा प्रश्न विचारला होता. दोन तासात शंभरी ओलांडून शेवटी मॉडरेटर्सने धागा उडवला. हे असलं कलेक्शन पण कुठून तरी आणून टाकण्यात त्यांचा हात जालावर कुणी शरू शकणार नाही.

सत्तरीतला अतिउत्साही तरूण Wink

होय गा.मा. ~ 'इंगळी' विंचवाचे स्त्रीलिंग रूप आहे....पण त्या लाल निखार्‍याला 'इंगळ' बहुधा त्याच्या तप्ततेमुळे नाव पडले असावे.

'कालवड' आहेच आहे अजूनी व्यवहारात. 'मांजर' सर्वमान्य नाम असून प्रेमाने 'मनी' म्हणणार्‍यांचीही संख्या लक्षणीय आहे.

तसे पाहिले तर रुढार्थाने 'शिंच्या' ही शिवी होत नसावी, तर ते एक अ‍ॅडिशनल विशेषनाम असून कोकणपट्टीतील शिक्षक आपल्या चुकार विद्यार्थ्यांसाठी नित्यनेमाने वापरत, ज्याचे वैषम्य कुणालाच वाटत नाही. आज मात्र हा प्रकार काहीसा कमी झाल्याचे मला जाणवते तिकडच्या भटकंतीत.

अशोक पाटील

एकदा "मोजा" या नावाचा धागा काढला होता. आत काय असावं म्हणून उघडून वाचलं तर मोजा डाव्या पायात आधी घालावा कि उजव्या हा प्रश्न विचारला होता. >>>>>>>>> Rofl

पश्चातबुद्धी -
मुळात मायबोलीत आपले स्वतःचे लिखाण करणे अपेक्षित आहे ना? दुसर्‍याने लिहिलेला मजकूर इथे नवा बाफ उघडून टाकणं बरोबर आहे का?

आमच्या आजी आजोबांच्या तोंडून ऐकलेला एक शब्द "धगुरडा" याचा नक्की अर्थ काय असावा ?
तसेच "धेडगुजरी" हा पण एक शब्द आहे, पण अलिकडेच असे कळाले की हा शब्द जातीवाचक आहे. खरे का ?

"मोजा" >>> Rofl
हुडकने = शोधणे
घावलं = सापडले
येरवाळी = सकाळी
ऊन करणे = गरम करणे

आजीच्या तोंडी ऐकलेले शब्द....
बाजिंदी = मनाला येईल ते करणारी
चाबरी = लुच्ची/ लबाड
या शब्दांचा काही वेगळा अर्थ असेल तर मला माहित नाही. (सांगा)

मोठा मुलगा बोलायला लागला आणि "चाबरा" हा शब्द आमच्या स्मरणात्/बोलण्यात लगेच आला ...:P

चाबरा म्हणजे थोडं आगाऊपणॅ बोलणे या अर्थी वापरतो आम्ही.. Happy