Submitted by आनंदयात्री on 17 May, 2012 - 02:18
तुझे नि माझे नको तेवढे करार झाले
बुडलो आपण, अन् नाते सावकार झाले
इतकी अडचण झाली प्रेमापायी त्यांची
कितीक होकारही शेवटी नकार झाले!
तुला नकोसा आहे हे माहीत असुनही
खुळ्या मनाशी हवेहवेसे विचार झाले
करून झाले मनासारखे हरेक वेळी
वरवर नंतर फक्त खुलासे चिकार झाले
वेडा झालो तिच्याचसाठी, तिला समजले!
तिचे बहाणे हळूहळू मग हुशार झाले
बरेच झाले, मजला केवळ दु:ख मिळाले!
तिच्या बिचार्या सुखात वाटे हजार झाले
हिशेब माझ्या शब्दांचा एवढाच आला -
रूतले, चुकले अन् काही आरपार झाले
जगण्याला आयुष्यभराची कैद! तरी ते -
बघता बघता श्वासांसोबत पसार झाले
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/05/blog-post.html)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वेडा झालो तिच्याचसाठी, तिला
वेडा झालो तिच्याचसाठी, तिला समजले!
तिचे बहाणे हळूहळू मग हुशार झाले
जगण्याला आयुष्यभराची कैद! तरी ते -
बघता बघता श्वासांसोबत पसार झाले
व्वा!
वाह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह
वाह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह अप्रतिम............
हिशेब माझ्या शब्दांचा एवढाच आला -
रूतले, चुकले अन् काही आरपार झाले
जगण्याला आयुष्यभराची कैद! तरी ते -
बघता बघता श्वासांसोबत पसार झाले
हे म्हनजे अत्यंत सुंदर..........
जगण्याला आयुष्यभराची कैद! तरी
जगण्याला आयुष्यभराची कैद! तरी ते -
बघता बघता श्वासांसोबत पसार झाले.............क्या ब्बात है!!!
आवडली गझल.
(No subject)
जगण्याला आयुष्यभराची कैद! तरी
जगण्याला आयुष्यभराची कैद! तरी ते -
बघता बघता श्वासांसोबत पसार झाले
व्वा.......
बढ़िया गझल... नेहमीप्रमाणे...
बढ़िया गझल...
नेहमीप्रमाणे...
गझल मस्तच आहे.. चिकार शब्द
गझल मस्तच आहे..
चिकार शब्द खटकला....तो 'चिक्कार' असा आहे माझ्या मते.
तुझे नि माझे नको तेवढे करार झाले
बुडलो आपण, अन् नाते सावकार झाले
हिशेब माझ्या शब्दांचा एवढाच आला -
रूतले, चुकले अन् काही आरपार झाले
वरील दोन शेरात काफिये चार अक्षरी असल्याने पहिले अक्षर यती साठी फोडावे लागत आहे..त्या यती मुळे थोडीसी मजा कमी होतेय गुणगुणताना..
बाकी रचना सुरेख...
वेडा झालो तिच्याचसाठी, तिला समजले!
तिचे बहाणे हळूहळू मग हुशार झाले.....हा शेर अप्रतिम झाला आहे...
गझल आवडली
गझल आवडली
तुला नकोसा आहे हे माहीत
तुला नकोसा आहे हे माहीत असुनही
खुळ्या मनाशी हवेहवेसे विचार झाले
करून झाले मनासारखे हरेक वेळी
वरवर नंतर फक्त खुलासे चिकार झाले
वेडा झालो तिच्याचसाठी, तिला समजले!
तिचे बहाणे हळूहळू मग हुशार झाले >>
शेर आवडले
(खुळ्या मनाशी हवे हवे ते विचार झाले - असे एक मनात आले)
नाते सावकार होणे ही कल्पना फार आवडली. पण पहिल्या ओळीतून तिथवर कसे जायचे हे नीट लक्षात आले नाही
दुसरा शेर नीट समजला नाही
धन्यवाद
-'बेफिकीर'!
>>तुझे नि माझे नको तेवढे करार
>>तुझे नि माझे नको तेवढे करार झाले

बुडलो आपण, अन् नाते सावकार झाले
सिक्सर!
तिचे हुशार बहाणे, शब्दांचे खर्चिक हिशोब झकास. बाकीच्यांनी रकाने चांगलेच भरलेत
सह्हीच!!!!!!!!!!
सह्हीच!!!!!!!!!!
नात्यांची सावकारी, जबरी
नात्यांची सावकारी, जबरी मतला!!
सुख, दु:खाचा तर निव्वळ खास!!
अप्रतिम रे मित्रा........
अप्रतिम रे मित्रा........
जगण्याला आयुष्यभराची कैद! तरी
जगण्याला आयुष्यभराची कैद! तरी ते -
बघता बघता श्वासांसोबत पसार झाले>>>>>>> मस्तच......
जगण्याला आयुष्यभराची कैद! तरी
जगण्याला आयुष्यभराची कैद! तरी ते -
बघता बघता श्वासांसोबत पसार झाले>>>>>>> मस्तच......
अख्खी गझल छान आहे एखादाच शेर
अख्खी गझल छान आहे
एखादाच शेर आवडला असे म्हण्वत नाहीय !!
बेफीजिन्चे मतही पटते आहे.........
इतकी अडचण झाली प्रेमापायी
इतकी अडचण झाली प्रेमापायी त्यांची
कितीक होकारही शेवटी नकार झाले! >>> व्वा!! क्या बात!
जगण्याला आयुष्यभराची कैद! तरी ते -
बघता बघता श्वासांसोबत पसार झाले >>> क्लास अपार्ट!
उभं राहुन टाळ्या!
जियो
जियो
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
१ला, चौथा आणि ५वा शेर आवडला.
१ला, चौथा आणि ५वा शेर आवडला.
६वा कळला नाही.
(No subject)
नतमस्तक!!!
नतमस्तक!!!
क्लास!
क्लास!
अप्रतिम गझल, नचिकेत ....
अप्रतिम गझल, नचिकेत ....
जबरदस्त !
जबरदस्त !
हिशेब माझ्या शब्दांचा एवढाच
हिशेब माझ्या शब्दांचा एवढाच आला -
रूतले, चुकले अन् काही आरपार झाले............. आफाट शेर...!
धन्यवाद दोस्तहो! वैभव, चार
धन्यवाद दोस्तहो!
वैभव, चार अक्षरी काफियाच्या मुद्द्याशी सहमत. चिकार असाच शब्द आहे. चिक्कार बोलीभाषेतला आहे.
हेल्लो चिन्नु! कित्ती दिवसांनी!
बढीया है
बढीया है
आवडली गझल
आवडली गझल
नेहमीप्रमाणेच अप्रतिम सुंदर !
नेहमीप्रमाणेच अप्रतिम सुंदर !
तुझे नि माझे नको तेवढे करार झाले
बुडलो आपण, अन् नाते सावकार झाले >>> जियो ! विशेषच सुंदर !
Pages