करूण रस

Submitted by जाईजुई on 16 May, 2012 - 11:54

मला नवरसांवरील एका कार्यक्रमात करूण रसावर मराठीतून सादरीकरण करायचे आहे.

काही कविता तयार आहेत.. पण गद्यात सानेगुरूजी सोडता दुसरे काही पटकन सापडले/सुचले नाही.

कोणाची कथा/लेखन जे ४-५ मिनिटात सादर करता येईल असे सुचवता येईल काय? सादरीकरणातून करूणरसाची अनुभूती यावी ही अपेक्षा आहे.

माबोवरचे लेखक असतील तर सर्वोत्तम कारण सादरीकरणासाठीची परवानगी घेणे सहज शक्य होईल.

धन्यवाद!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मा बो च्या मुखपृष्ठावर बालभारतीतील अनेक कविता करुण रसपूर्ण आहेत -
श्रावण बाळाची - शर आला तो.... (बहुतेक ग. ह. पाटील)
क्षणोक्षणी उडे - केवढे हे कौर्य - रेव्हरंड टिळक -
पण माझं मत असं की सध्याच्या जीवनातल्या करुण रसातल्या कविता वा कथा निवडल्यास बरे होईल. उदा. - दमलेल्या बाबाची कहाणी......
मा बोवर धुंडाळल्यास इथल्याही काही कवींच्या (बेफिकीर यांची आईवरील कविता, उमेश कोठीकर, क्रांती... अशी अनेक नावे घेता येतील...) कविता वा लेख/ कथा यांचाही उपयोग करता येईल.
स्वप्ना राज यांचे अधुरे पन्ने....
दाद चे कितीतरी लिखाण.....