मातृदिन...??

Submitted by पुरंदरे शशांक on 16 May, 2012 - 05:50

मातृदिन...??

आई प्लीज थांब ना गं आज तू घरी
रविवारचे कामावर जाते का कुणी

नको रे राजा, जाऊ दे मला
एक मोठ्ठे साहेब येणारेत ऑफिसला

रोज रोज उठून तू जातेस ऑफिसला
एक दिवस माझ्यासाठी काढ की जरा

छान गाणी म्हणू नि रंगवू चित्रही
संध्याकाळी बागेमधे येऊ फिरुनही

पुढच्या आठवड्यात बघ सुट्टी आहे मला
तेव्हा तू म्हणशील ते करीन मी बाळा

आज प्लीज सोनू जाऊ दे रे मला
आधीच उशीर झालाय रागावतील मला

बाळाला सोडवून जाववेना तिला
काम तर खुणावतंय इकडे याचा लळा

लोकलमधे बसल्यावर भरुन आले डोळे
आज आहे "मातृदिन" पेपर वाचून कळे.......

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बाळाला सोडवून जाववेना तिला
काम तर खुणावतंय इकडे याचा लळा

लोकलमधे बसल्यावर भरुन आले डोळे
आज आहे "मातृदिन" पेपर वाचून कळे.......

आजची जीवनशैली अगदी अचुक हेरलेत शशांकजी आवडली कविता.

आजचे जीवनशैली अगदी अचुक हेरलेत शशांकजी आवडली कविता.+१>>> + १
शशांकजी, अगदी तंतोतंत वर्णन केलय तुम्ही. हल्ली नोकरी करणार्‍या आईची हीच अवस्था असते. मुलांना आई अगदी थोडावेळ भेटते, आणि आईला मुलेही. Sad

बाळ मातृदिन साजरा करण्यासाठी मातेला घरी थांबण्याचा आग्रह करीत होता का? लोकलमध्ये बसल्यावर स्वतःच्या अगतिकतेने व बाळाच्या प्रेमाने आईचे डोळे भरून आले व नंतर तिने पेपर उघडला की आधीच्.......अनेक प्रस्ताव, अनेक अंदाज्....भावरम्य कविता. मातृदिनाची शशांकजीनी दिलेली ही अनमोल भेट आभारपूर्वक स्वीकारतो.
एक सामान्य रसिक (प्रद्युम्नसंतु)