Submitted by विभाग्रज on 13 May, 2012 - 08:57
बंद डोळ्यांआडून,
ती चोहीकडे पाही
सदा पुढे-मागे असे
तिचे नाव आई!
ठेच बाळा पायी
सल तिच्या ठायी
दुवा जिची दवा तिची
तिचे नाव आई!
बाळ जरी कापे
केसाने तिचा गळा
सुख चिंती बाळा
तिचे नाव आई!
जिवनाचे सार
अक्षर दोन "आई''
ब्रम्हांडाचे सार
तिचे नाव ''आई''!
गुलमोहर:
शेअर करा
'मातृदिना''निमित्त सर्व
'मातृदिना''निमित्त सर्व माताना सादर वंदन._/\_
ठेच बाळा पायी सल तिच्या
ठेच बाळा पायी
सल तिच्या ठायी
दुवा जिची दवा तिची
तिचे नाव आई!
सर्वांगसुंदर.
आईची आठवण करून दिलीत विभाग्रजजी. शतशः आभार.
(No subject)
आवडली. अगदी अगदी.
आवडली. अगदी अगदी.
प्रद्युम्नजी,रियाजी,आर्चजी खु
प्रद्युम्नजी,रियाजी,आर्चजी
खुप खुप आभार.
छानै!!! तुझ्या पावलात
छानै!!!
तुझ्या पावलात रूते
कधी काचा कधी खडा
तिचा कासावीस जीव
जाई काळजाला तडा
...................................शाम
छान आहे !
छान आहे !
बापूजी,धन्यवाद! तुझ्या पावलात
बापूजी,धन्यवाद!
तुझ्या पावलात रूते
कधी काचा कधी खडा
तिचा कासावीस जीव
जाई काळजाला तडा>>>आवडलं, भिडलं मनाला.
मुक्तेश्वरजी खुप खुप आभार.
छान.
छान.
मुटेसाहेब खुप खुप आभार.
मुटेसाहेब खुप खुप आभार.