काही व्यक्तींमध्ये दुष्ट शक्ती असतात का?

Submitted by सिंथेटीक जिनिअस on 13 May, 2012 - 08:37

जगात आपला अनेक व्यक्तींशी संपर्क येतो. काही व्यक्तींचा सहवास अगदी आनंददायी असतो तर काही व्यक्तींच्या संपर्कात आले तरी अस्वस्थ वाटते. असे का होत असावे ? काही व्यक्तींकडे दृष्ट ताकद असावी ईतके ते वाईट असतात. खरेच अश्या वाईट शक्ती असलेली माणसे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्तात. मला एका बाईचा अनुभव आहे. साक्षात डीमेंटरच आहे ती. आली मी मनातील सर्व सकारात्मक भावना लोप पावतात ती गेल्यावर किंवा तिच्या साध्या आठवणींने ही माझे मनःस्वास्थ्य गायब होउ शकते. महत्प्रयासाने मी तिच्या प्रभावातून मुक्त झाले आहे. ओएमजी नको बाई त्या आठवणी. नेगेटिव ऑरा अस्तो काही लोकांना किंवा जागांना.

अश्या लोकांपासून किंवा जागी स्वतःचे मानसिक आरोग्य कसे जपावे? नामस्मरण करून? गुरूचे स्मरण करून?

डॉ. आणी बेफिकीरजींची चर्चा आवडली. खूप छान चाललीय.
बेफिकीरजी, यात अजून भर घालायची आहे ती खालीलप्रमाणे.

भाऊबंदकी
सासु- सुनांचा वाद
माणसा-माणसात चाललेली तुलना ( मग ती आर्थिक, शारिरीक असो वा बौद्धिक किंवा बाह्य रुपाची पण )

अहंपणा, इगो दुखावला जाणे इ.

मला तरी वाटते की वाईट इच्छा करणारी माणसे असु शकतील आणि अशी माणसे एखाद्याचे नुकसान करु शकतील असे कृत्य करुन वाईट घडवुन आणु शकतील पण ....
कोणाचे वाईट "चिंतुन" वाईट घडवुन आणु शकण्याची शक्ती असलेली माणसे असणे कठीण आहे.

माणसाला घडलेल्या चांगल्या वाईट घटनांचे कारण जाणुन घ्यायची इच्छा असते आणि त्यातुन आपण घडलेल्या घटनांचे स्पष्टीकरण शोधायला लागतो. विशेषतः वाईट घटनांचे. उदा. आपल्या आयुष्यात ओळीने काही चांगल्या घटना घडत असताना एखादी वाईट घटना झाली कि लगेच "नक्कीच कोणाची तरी नजर लागली", "माझे चांगले झालेले कोणाला पाहवत नाही" असे म्हणतो आणि कोणाला तरी दोष द्यायला लागतो.
मुलाना काही व्हायला लागले की "अमकी अमकीची नजर लागली" असे म्हणतो.
आता आपल्या आयुष्यात पौर्णिमा, अमावस्यांप्रमाणे चांगले होणार, वाईट होणार परत चांगले होणार हे चक्र सुरुच असणार. एकदा हे लक्षात घेतले की अशा माणसांबद्द्ल असलेली भिती कमी होत जाईल.

अशी जळु प्रवृत्ती असलेले लोक जेव्हा टाटा, बिर्ला, अंबानी आपले साम्राज्य उभे करत होते तेव्हा असले असतीलच की आणि किती वाईट चिंतले गेले असेल त्यांचे? किती नजर लावली असेल त्याना, किती मुठी मारल्या असतील.. काय बिघडले त्यांचे?

अशा लोकांबद्दल गंड ठेवुन ते लोक नाहीत तर आपणच आपले नुकसान करतो.

मनस्मि,

तुमचे म्हणणे अर्थातच पटण्यासारखेच

पण टाटा बिर्ला वगैरेंच्या बाबतीत सकारात्मक वातावरण इतके अधिक आणि प्रबळ असते की त्यांच्या दैवात हा त्रास येत नाही Happy

साध्या आठवणींने ही माझे मनःस्वास्थ्य गायब होउ शकते. महत्प्रयासाने मी तिच्या प्रभावातून मुक्त झाले आहे. >> मामी - आडुन आडुन तुम्हाला तुमच्या सा.बा. कडे निर्देश करायचा नाहीये ना Happy

>>>> काही व्यक्तींमध्ये दुष्ट शक्ती असतात का? <<<<<
हिन्दू धर्मशास्त्राप्रमाणे, सत् अन असत् / सुष्ट वा दूष्ट असे गुणविशेष (शक्ति) प्रत्येकातच असतात. त्या अनुरुप क्रियाकरण्याची साधने/विचार/युक्त्या/प्रयुक्त्याही प्रत्येकातच उपजतच असतात. प्रश्न असतो तो ती ती व्यक्ति यातिल काय केव्हा कसे स्वतःमधे जागवुन वापरेल.
उदाहरणादाखल लक्षात घ्या की क्रौर्य ही एक भावना/गुणविशेष आहे, तर तो कोम्बडीबकरि कापताना दिसून येईल, वा एखादा ढेकूण चिरडताना दिसून येईल, वा एखाद्या माणसाचा/बायकोपोरान्चा खून करतानाही दिसू शकेल, तद्वतच, युद्धात शत्रुसैन्याला मारतानाही क्रौर्य असणे अत्यावश्यक ठरेल. शत्रूला मारणे हा क्रौर्याचा सद्बुणविशेष ठरेल तर आप्तस्वकियान्ना विनाकारण वा स्वार्थाकरता मारणे हे अश्लाघ्य ठरेल. आता हे विविध गुणविशेष, व्यक्तिनुरुप बदलत्या प्रमाणात उद्रेकित होताना का दिसतात असे बघता मात्र मला ग्रहनक्षत्रान्चा प्रभाव, पूर्वकर्मफल/संचित याचा विचार करावा लागतो. कुन्डलित जर गुरु बलिष्ठ असेल, चंद्रही सुस्थापित असेल, तर कोणत्याही प्रकारच्या क्रौर्यापासून व्यक्ति सहसा मुक्त असते, तेच जर गुरुसोबत इतर काही ग्रह सहकार्य करीत असतील, तर अशी व्यक्ति क्रौर्याचे खेळ जसे की कराटे वगैरे शिकवितही असेल, पण याचे ऐवजी, मन्गळ वा तत्सम ग्रह वाईट स्वरुपात बलिष्ठ असेल, तर अशी व्यक्ति विधिनिषेध न बाळगता क्रूर कर्मे करण्यास सहज धजावेल.
अर्थात तुमचा प्रश्न, प्रत्यक्ष स्पर्ष न करता परिणाम करणार्‍या वाईट शक्तिंबाबत आहे असे धरले तरी वरील विवेचनच उपयोगी पडते. एखाद्याबद्दल राग द्वेष असूया चीड संताप इत्यादि विविध भावना सकारण मनात निर्माण झाल्याने जे तळतळाट/जळफळाट/धुसफुस/शापवाणी वाचेद्वारे बाहेर पडते, तेव्हा "वाचा" व त्याद्वारे उच्चारित "शब्द" (आवाज/ध्वनि या अर्थी) हेच् शस्त्र म्हणून कार्य करतात. वाचा जोमदार नसेल, मात्र दृष्टी जोमदार असेल, तर नजर लागणे वगैरे बाबितुन परिणाम होऊ शकतो.
मात्र काही विशिष्ट व्यक्ति कारण नसतानाही वरील शक्ति जाणता/अजाणता वापरू शकतात. सत्च्छिल व्यक्तिस अशा व्यक्तिन्चा सहवास वगैरे लाम्बचे, केवळ अस्तित्व देखिल अस्वस्थ करू शकते.
माझे मते सूष्ट शक्तिबरोबरच, दुष्ट शक्तिही प्रत्येकातच असतात.

>>>> जगात आपला अनेक व्यक्तींशी संपर्क येतो. काही व्यक्तींचा सहवास अगदी आनंददायी असतो तर काही व्यक्तींच्या संपर्कात आले तरी अस्वस्थ वाटते. असे का होत असावे ? <<<<
प्रत्येक व्यक्ति एक विविधान्गी शक्तिन्चा स्त्रोत असते, व ज्या शक्ति त्या व्यक्तिच्या विचार/आचारानुरुप प्रक्षेपित होत असतात, त्या आवडू शकणार्‍यान्ना ती ती व्यक्ति आनन्ददायी वाटू शक्ते तर न आवडणार्‍यान्ना/धोका जाणवणार्‍यान्ना संपर्कात आले तरी अस्वस्थ वाटते.
या शिवाय, कुंडली शास्त्राप्रमाणे जे ग्रह एकमेकान्चे शत्रू ग्रह मानले आहेत, अशा विरुद्ध ग्रहान्चे अधिपत्याखालिल व्यक्ति आमनेसामने आल्यास "मनाचे आतून" त्यान्चे तितकेसे जमत नाही हा सार्वत्रिक अनुभव आहे. [व्यावहारिकदृष्ट्या वरकरणी जमवुन घेतल्याचे दाखविले जाते, ते वेगळे, पण आंतरिक भावनेत अप्रियता दाटलेली असतेच असते, फक्त हे सत्य सान्गण्याचे धाडस फार कमी जणान्कडे असू शकते]

>>>> काही व्यक्तींकडे दृष्ट ताकद असावी ईतके ते वाईट असतात. खरेच अश्या वाईट शक्ती असलेली माणसे असतात का? <<<<<<
वर आधीच सान्गितले आहे की सुष्ट व दुष्ट शक्ती प्रत्येकाकडेच (सुप्तावस्थेत वा अर्धजागृता/पूर्णजागृतावस्थेत) असतात. व केवळ त्या शक्ति आहेत म्हणुन एखादी व्यक्ति वाईट ठरत नाही. वाईट तेव्हा ठरेल, जेव्हा त्या शक्तिन्चा वापर जाणता/अजाणता वाईट उद्देशाने व दुसर्‍याचे अहीत चिन्तुन अहीताकरताच होईल.

क्रियेला प्रतिक्रिया होणारच, पण भौतिक बाबितील क्रियेवरची भौतिक प्रतिक्रिया व एखाद्या माण्साच्या वर्तनामुळे/असण्यामुळे दुसर्‍या माणसाच्या भावनिक अन्तर्मनातील प्रतिक्रिया या वेगळ्या मापदण्डाने ओळखाव्या/मोजाव्या लागतील, त्याचे परिणामही दृष्य स्वरुपात तत्काळ दिसायलाच हवेत असा आग्रह धरता येणार नाही. मात्र दुसर्‍यान्चेमधिल दुष्ट शक्ती असतात की नाही याचा बोध घेण्या आधी, स्वतःचे वर्तन/कृती/विचार/आचार याक्रियान्मुळे अन्य व्यक्तिन्च्या प्रतिक्रिया ज्या जशा असतील, त्यान्चा प्रतिहार/शमन करणेची आन्तरिक ताकद माझ्यात नसेल, तर जगातील प्रत्येक बाब मला उपद्रवी भासायला लागेल. व्हाईसवर्सा, आन्तरीक ताकद माझ्या अपरिमित असेल, तर मी जगातील कोणत्याच सजीवनिर्जिवाची, चान्गल्या वा वाईट अर्थाने फिकीर करणार नाही.
या सर्वच, स्वतःचे मनातील वा दुसर्‍याचे विचारातुन प्रक्षेपित होणार्‍या क्रियाप्रतिक्रियान्चे परिणाम न होता परस्पर परिशिलन व्हावे म्हणुन तर कायमस्वरुपी इश्वराचे नामस्मरण अनेक संतांनी असंख्यवेळेस सांगितले आहे. किम्बहुना मी आता तर असेही म्हणू शकतो की "पाप" पाप असे जे म्हणतात, ते अशाच क्रियाप्रतिक्रियान्च्या जन्जाळात अडकणे होय.

याव्यतिरिक्त, व्यक्तिच्या स्वतःच्या मनात असलेल्या काल्पनिक / वा सत्य , सूप्त भिती देखिल "त्रास करवुन" घेण्यास कारणीभूत असतात. (बिघडलेल्या) चंद्राच्या अधिपत्याखालील हा स्वतंत्र विषय आहे.

माझे डोके या विषयामुळे भणभणल्यामुळे "पापी" बनल्यामुळे मी आता थोडावेळ इश्वरचिंतन करतो व पापरहित होतो. Happy Proud

खाली सांगितलेले सिध्धांत आमचे सदगुरु वामनराव पै यांच्याकडुन मला मिळाले आहेत अर्थात त्याचे श्रेय ते संत परंपरेला देत असत.

संचित म्हणजे नशिब नव्हे. संचित म्हणजे संचय झालेले पुण्य/पाप याचे अकाउंट .
संचित आपल्याला नक्कीच अनेकदा वाचवते किंवा खड्ड्यात घालते. याचा अर्थ संचित नशिब निर्माण करते.
पुर्वी लोकांना हे कळत नसे की एकाच वेळी जन्मलेली २ मुले, एक राजा आणि एक रंक कसा यासाठी त्यांनी पुनर्जन्म ही संकल्पना द्रुढ केली. त्याकाळात लोकांना पालक स्वतःचे जीन्स कसे मुलांना पास करतात माहित नसावे.
माझ्या मते पालक फक्त स्वतःचे जीन्स नव्हे तर संचितही मुलांना देतात. यामुळेच काही सम्रुद्ध असतात तर काही दु:ख्खी.
१) ज्ञानेश्वरांचा छळ
हे समजण्यासाठी आपल्याला परमेश्वर, आणि समाजाचे संचित या गोष्टी समजुन घ्याव्या लागतील.
सदगुरुंनी ही परमेश्वर संकल्पना विषद करताना म्हणतात की परमेश्वर म्हणजे "निसर्गनियमांसहित चालणारी स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, सर्वव्यापी यंत्रणा". हा परमेश्वर दयाळु नाही आणि क्रुरही नाही.
सदगुरु असे पण सांगतात की समाजाचे आणि राष्ट्राचे आणि विश्वाचे संचित असते त्याचा परिणाम देखिल
समाज, राष्ट्र आणि विश्वाला भोगायला लागतो आणि म्हणुनच सदगुरुंची विश्वप्रार्थना वा ज्ञानेश्वरांच्या पसायदानात सर्वांना हा महत्वाचा शब्द आहे.
जेंव्हा समाजाची सुधारणा होत असते तेंव्हा या वाइट संचिताची किंमत चुकवावी लागते आणि संतांचे
महत्व असे की यातिल सर्वात जास्त किंमत ते चुकवतात.
निव्रुत्ती नाथांनी, ज्ञानेश्वरांनी व त्यांच्या वडिलांनी जर हे परमेश्वराचे खरे स्वरुप लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला नसता तर धर्मपीठाचा रोष त्यांनी ओढवलाच नसता. एखाद्या धर्ममार्तंडाचा आश्रय घेउन ते आपल्या कुशाग्र बुध्धीने स्वतःचे नक्कीच भले करु शकले असते. जेंव्हा जग आग बनुन जळत होते तेंव्हा
ज्ञानेश्वर आरामात घर बंद करुन बसु शकले असते आणि काही प्रमाणात स्वतःला वाचवु शकले असते पण
मुक्ताइ म्हणते त्याप्रमाणे त्यांनी 'जग झालिया वन्हि, संते सुखे व्हावे पाणी' हा मार्ग स्विकारला.
यामुळेच निसर्गनियमानुसार त्यांना दु:ख्ख भोगावेच लागले. पण शेवटी ते जिंकलेच, जगजेत्या चंगीझखानापेक्षा कोट्यावधी लोकांना सुखाच्या मार्गावर नेणारा हा हरीपाठ ८०० वर्षानी जास्त श्रेष्ठ आहे.

२) द्रौपदीचे पाच जणांशी लग्न/ अपमान.
यात देखिल तिच्या वडिल द्रुपद यांचे संचित आणि त्यावेळच्या समाजाचे संचित हे येतेच. तिच्या वडिलांना
आपली मुलगी सम्राज्ञी हवी होती आणि त्यांचा सुड पुर्ण करणारी हवी होती.

आता इथे थांबवते अथवा काम न केल्याबद्दल माझे संचित निर्माण होइल Happy

संचित आणि कर्मफल हे हिंदु धर्मातच आहे.

मुस्लिम, ख्रिश्चन यात संचित, पुनर्जन्म नाही.... हा जन्म असा का? याला उत्तर नाही. आनंदाने भोगणे व शेवटी न विचार करता खड्ड्यात पडणे... पुनर्जम्न आणि संचित असल्या भाकड गोष्टींपेक्षा हे नक्कीच जास्ती लॉजिकल आहे.

तसेही मुस्लिम, ख्रिश्चन जगात ५५ % आहेत.... निधर्मी लोक १५ % आहेत.... पुनर्जन्म , संचित, मग नारायण नागबळी अशा वाटेने न जाता ७० % लोक जीवन जगताहेत. Proud

मुस्लिम, ख्रिश्चन यात संचित, पुनर्जन्म नाही.... हा जन्म असा का? याला उत्तर नाही. आनंदाने भोगणे व शेवटी न विचार करता खड्ड्यात पडणे... पुनर्जम्न आणि संचित असल्या भाकड गोष्टींपेक्षा हे नक्कीच जास्ती लॉजिकल आहे.

तसेही मुस्लिम, ख्रिश्चन जगात ५५ % आहेत.... निधर्मी लोक १५ % आहेत.... पुनर्जन्म , संचित, मग नारायण नागबळी अशा वाटेने न जाता ७० % लोक जीवन जगताहेत.


जामोप्या मस्त

कांहीं वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरीच्या पसायदानावर एक अतिशय छान, अभ्यासपूर्ण प्रवचन ऐकण्याचा योग आला. 'खळांची व्यंकटी सांडो'चा अर्थ विशद करताना त्या प्रवचनकारानी सर्वसाधारण दुष्टपणा करणारे व माऊलीला अभिप्रेत असणारे 'खळ', यातला फरक उदाहरणं देऊन फार छान स्पष्ट केला होता; राग, असूया, स्वार्थ इत्यादींमुळे दुष्टपणा करणारे / मनात बाळगणारे हा एक वर्ग व फक्त दुष्टपणातच आनंद मानणारा तो ' खळ ' वर्ग. [ कदाचित, इंग्लीशमधील 'Sadist'च्या जवळचा हा 'खळ' असावा]. मला वाटतं अशी 'खळ' व्यक्ती आसपास असेल तर तिचा नकारात्मक प्रभाव जाणवूं शकेल, अस्वस्थही करूं शकेल. अर्थात, छातिठोकपणे याबाबतीत कांहीं सांगणं कठीणच.

लहानपणापासून ऐकत/ वाचत आले की जशी करणी तशी भरणी! प्रत्यक्षात अSनेक उदाहरणे पाहिलीत की ज्यांनी
वाईट कृत्ये / दुष्टपणा केला आहे,त्यांचे काहीही वाईट झाले नाही.(अप-डाउन प्रत्येक ठिकाणी असतो.) उलट ज्यांनी
वाईट कृत्ये / दुष्टपणा केला नाही त्यांना भरपूर भोगायला लागले आहे.मग त्यावर हे पण मत ऐकले की ह्या जन्मी
नसेल भोगायला लागले तर पुढल्या जन्मी किंवा त्यांच्या मुलानातवंडाना भोगावे लागते. पण सज्जनमाणसाचे काय पाप की काही न करता त्रास सहन करावा लागतो.मग ते त्याच्या मागील जन्मातील पाप होय असे इतर म्हणतात.म्हणजेच काय तर ज्या प्रश्नाची उत्तरे मिळत नाहीत तेव्हा मागच्या जन्मीचे कर्म हे होय.
माझ्यामते चालू जन्मात कोणी वाईट वागू नये म्हणून घातलेला हा धाक असावा की जेणेकरून शक्यतो वाईट
वागू नये.

एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला कोणी सांगितले कि या व्यक्तीकडे नेगेटिव वाईब्स आहेत तर आपण त्या व्यक्तीशी न बोलताच किंवा त्याच्याशी आपला काहीही संबध न येताच पूर्वग्रह दुषीत असल्यामुळे वाईट वागतो किंवा उगीच फटकून वागतो.
कदाचित लोक आपल्यावर काही संकट आल्याने स्वतःतच रममाण किंवा थोडेसे स्याडेस्तिक असतात म्हणून ते केवळ आपल्याया आलेल्या अनुभवावरून जगाशी सांभळून वागत असतात तर ते नेगेटिव कसे काय असू शकतात. कालांतराने ती माणसे आपल्यावरील संकटातून सावरून पुढे वाटचाल करू पाहतातच ना.

एखाद्या व्यक्तीकडे दृष्ट शक्ती आहे हे मानून त्या व्यक्तीचा समाजाकडून, नातेवैकांकडून छळ होतो हे बरोबर आहे का? हल्लीच एका आईला, मावशीला व बहिणीला चेटकिणी समजून त्यांच्या मुलांकडून खून झाल्याची बातमी पेपरात आली होती.

वीणा सुरू | 10 January, 2015 - 01:24
असतात असतात. आताशा ठाम मत झाले आहे चैत्रबनात. >>

वीणा तै जास्त आरसा बघत जाउ नका Light 1 Rofl

दृष्ट शक्ती वगैरे असतील असं वाटत नाही पण चांगल्या वाईट स्वभावाची, प्रव्रुत्तीची माणसं सगळीकडे असतात .त्यात त्यांचाही दोष नसतो ,आजुबाजुची परीस्थिती ,बरे वाईट अनुभव हे कटुता निर्माण करत असावेत. त्याहीपेक्षा सगळ्याच व्यक्ती कधीनाकधी चांगले वाईट वागतातच म्हणुन लगेच ते दुष्ट शक्ती वगैरे म्हणु शकत नाही.चेट्कीण समजण्याचा प्रकार वगैरे तर फारच चुकीचा आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा आहे.

<<राग, असूया, स्वार्थ इत्यादींमुळे दुष्टपणा करणारे / मनात बाळगणारे हा एक वर्ग व फक्त दुष्टपणातच आनंद मानणारा तो ' खळ ' वर्ग. [ कदाचित, इंग्लीशमधील 'Sadist'च्या जवळचा हा 'खळ' असावा]. मला वाटतं अशी 'खळ' व्यक्ती आसपास असेल तर तिचा नकारात्मक प्रभाव जाणवूं शकेल, अस्वस्थही करूं शकेल.>>हे वरचं भाउ नमसकर यांनी लिहिलेले उदाहरण त्या त्या परीस्थितीत पटतं. पण जर असं असेल तर सगळ्याच व्यक्ती सकारात्मक आणि नकारत्मक वागताना तशी एनर्जी देत असतील , तर आपल्याला कुठली एनर्जी पाहिजे ते आपण ठरवतोच.

पण आपण 'दुष्ट शक्ती' अतीरेकी आणि आतंकवाद आणि चांगल्या गोष्टीचा विदध्वंस करणारया व्यक्ती किंवा प्रवृतींना म्हणु शकतो.

दुष्ट शक्ती म्हणजे भूत-पिशाच्च यांच्या प्रभावाखाली असलेले अपेक्षित आहेत.
की
गुणसुत्रे आणि केमिकल लोच्यामुळे स्वभावात असलेला दुष्टपणा अपेक्षित आहे.

Pages