चिकन सुहाना

Submitted by अवल on 13 May, 2012 - 02:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

चिकन 1/2 किलो
बटर 1 चमचा
तेल 1 चमचा
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
आलं 1/2 इंच
लसूण 10-12 पाकळ्या
बडिशेप 1 चमचा
धणे 1 चमचा
खसखस 1 चमचा
कोथिंबीर 1/2 वाटी
काजू 10
पांढरे व्हिनिगर 2 चमचे

क्रमवार पाककृती: 

चिकन स्वच्छ धुऊन , हळद, तिखट, मीठ, व्हिनिगर लावुन ठेवावे.
कांदे जाडसार चिरावेत.
चिरलेल्या कांद्यातला १/३ कांदा, लसूण, अालं, बडिशेप, खसखस, कोथिंबीर, धणे, काजू सर्व वाटावे. हे वाटण चिकनला लावावे. किमान १/२ तास चिकन मॅरिनेट करावे.
पसरट भांड्यात ( लगडी किंवा फ्राय पॅन ) बटर आणि तेल तापत ठेवावे. त्यात चिरलेला कांदा टाकावा. कांद्याचा रंग बदलु लागला की त्यात चिकन टाकावे. चांगले परतावे. चिकनचा रंग बदलु लागला की २ वाट्या पाणी घालावे. उकळी आली की झाकण ठेऊन चिकन शिजू द्यावे. साधारण २५ मिनिटांनी तयार होईल चिकन सुहाना !

वाढणी/प्रमाण: 
दोघांना पुरावे
अधिक टिपा: 

जितके जासत मॅरिनेट कराल (१/२ तास ते ४ तास) तेव्हढे लवकर शिजेल, अन चवही छान लागेल.

माहितीचा स्रोत: 
माझेच प्रयोग. हे चिकन परतत असताना खुप छान वास येत होता, म्हणून त्याचे नाव ठेवले 'चिकन सुहाना' :-)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1336888985106.jpg (59.01 KB)1336888985106.jpg
आज चिकन संपायच्या आधी चपळाई करून फोटो काढून घेतला Wink
आज माझा फोन मी पूर्णपणे वापरला. सर्व लिखाण अगदी फोटोही फोनवरुनच टाकला Happy

दिनेशदा धन्यवाद Happy
प्राची, माझा लेकाने माझ्यासाठी काही शिल्लक ठेवल का बघते आता जाऊन Wink
हो गं पनीर मस्त लागेल. माझ्या शाकाहारी नवर्‍याला फ्लॉवर सुहाना केलय आज Wink
शैलजा Happy तसे माझे नेहमी प्रयोगच असतात स्वयंपाक घरात Proud
जरा पारंपारिक पदार्थ सांग मला करायला मग कळेल Wink

अवल, मस्तच दिसतय, करायलाही कठीण नाही आहे त्यामुळे नक्कीच करुन बघेन. मी शाकाहारी असल्यामुळे माझ्यासाठी फ्लॉवरच व्हरजन ट्राय करेन. त्यात बटाटा पण जाइल का?

अवल तुझी ही रेसीपी आमच्या घरात एकदम हिट झाली आहे. खाण्याच्या बाबतीत जिभेला धार असणार्‍या माझ्या लेकीनेही "क्या बात, क्या बात, क्या बात" म्हणत मला मुजरा केला. धन्यवाद अवल, इतक्या छान व सोप्प्या रेसीपी बद्द्ल Happy
हे माझ "चिकन सुहाना"
2012-06-15 21.00.06.jpg

चिकन सुहाना मस्त झाल होत.आता पनीर सुहाना करणार आहे पण पनीरला कमी वेळ लागेल शिजायला तर मग पनीर मसाल्यात टाकून परतायचं कि पाणी टाकून मग उकळी आली कि पनीर टाकायचं?

अवलतै , काल बनवलचं दूपारी.एक्दम भारी वाटलं Happy
आम्हाला रस्सा भाताबरोबर पण लागतो , त्यामुळे मी कान्दा भरपूर घेतला .
नवरा म्हणाला , तिखट थोडं कमी झालयं .
साबु म्हणाले , आज चिकन एकदम मस्त झालयं . एकदम टडोपा Wink .

काल चिकन सुहाना आणि धनिच हिरवं चिकनं ....

chicken.JPG

स्वस्ति ताट मस्तच दिसतय गं..
नवरा म्हणतोय ते जाऊदे खड्ड्यात पण सासु तारीफ करते हे जास्त महत्वाच आहे.. छानच..

ही पाकृ आधी वाचली नव्हती त्यामुळे बघायला आलो तर इकडे आमच्या हिरव्या चिकनचा पण फोटो पाहून अगदी टडोपा मोमेंट झाली Lol

स्वस्ति धन्यवाद Happy

सुहाना पण करून बघायला हवं !

टीना , :).
एरवी , मला साबांच्या पद्धतीने , त्या चवीच बनवता येत नाही , म्हणून कपाळाला आठया पडतात.
म्हणूनच माझ्यासाठी टडोपा मोमेंट होती . ऐकून बरं वाटलं.
पण मी त्यांनी केलेलं कौतुकही फार मनावर घेत नाही.

Pages