क्राईम पॅट्रोल - दस्तक - आरसा

Submitted by बेफ़िकीर on 12 May, 2012 - 02:51

क्राईम पॅट्रोल दस्तक हा भारतीय समाजाचा लखलखीत आरसा आहे. इतर समाजांचा नसेलही किंवा असेलही, पण आपल्या समाजाचा आहे.

निवेदक अनुप सोनी हा रुबाबदार माणूस अत्यंत संवेदनशीलपणे सर्व नाजूक विषयांवर भाष्य करत 'गुन्हा करण्याची मानसिकता कोणत्या क्षणी तयार होते हे लोकांच्या लक्षात यावे' यावर उपयुक्त बोलतो.

या कार्यक्रमात भारतात झालेले विविध प्रकारचे गुन्हे कसे घडले, का घडले, पोलिसांनी तपास कसा घेतला व गुन्हेगारांची, शोषितांची, इतर संबंधितांची मानसिकता काय होती, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक व सांस्कृतीक परिस्थिती काय होती यावर सर्व काही दाखवले जाते. या सत्य घटना असल्याने यात नाट्य रुपांतरापेक्षा अधिक काही नाट्यमय नसते.

या कार्यक्रमाचा मी पंखा आहे

सोनी टेलिव्हिजनवर हा कार्यक्रम बरेचदा रात्री अकरा ते बारा इतका उशीरा असतो तर रिपीट टेलिकास्ट अनेकदा दुपारी साडे तीन ते सायंकाळी सात या कालावधीत असतो

सामान्य जीवन जगणार्‍याच्या डोक्यातही येणार नाहीत असे गुन्हे झालेले दिसतात. त्यात शोषण, चोरी, जातपात, लैंगीकता, नुसताच संताप, व्यसनाधीनतेची व त्यातून घडणार्‍या गुन्ह्यांची परमावधी असे सर्वच प्रकार आढळतात

खरे तर या कार्यक्रमाबाबत केव्हापासूनचे लिहावेसे वाटत होते. आपण कोणी हा कार्यक्रम बघता काय? या कार्यक्रमाबाबत मायबोलीवर आधीच धागा असल्यास क्षमस्व व मी हा धागा अप्रकाशित करेन

माझा असा अंदाज आहे की हा कार्यक्रम बघणार्‍यांपैकी कोणाला तो आवडला नाही असे बहुतेक होणारच नाही

अर्थात, आवडणे म्हणजे सादरीकरण, वास्तवता, कलाकारांचा संयत व नैसर्गीक अभिनय आणि कोणत्याही मोठ्या नावापासून दूर राहून सामान्य नावांकडून दर्जेदार अभिनय करून घेणे

मुळात कथानक (स्क्रिप्ट) इतके पॉवरफुल असते की त्यात काही फारसे करावे लागत नसावे

आपली मते मांडाल काय?

धन्यवाद

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

माझ्या मते, १०.३० ला प्रसारीत होणारे भाग लेटेस्ट हॅपनिंग्ज(डायल १०० नावाने) वरचे असतात आणि दररोज रात्री ११.३० ते सुमारे १.०० पर्यंत चालणारे रीपीट टेलिकास्ट(सतर्क नावाने)

क्राईम पॅट्रोल सतर्क चे काही भाग उगाच लांबवतात का हल्ली?? शनि-रवी एकच स्टोरी असते...ती मुद्दाम मोठी केल्यासारखी वाटते...

सोमवार ते गुरुवार - १०.३० ते ११.३० नवीन भाग! ११.३० ते १२.३० जुने भाग रीपीट

शुक्रवार, शनिवार व रविवार - ११.३० ते १२.३० नवीन भाग व नंतर जुने भाग रीपीट

काही कथा एकाच एपिसोडमध्ये संपवण्यासारख्या असतात खर्‍या. काही वेळा उगाच दोन एपिसोड्स घेतात अश्या कथांसाठी!

मृतावरील अंत्यसंस्कार दाखवणे गरजेचे आहे. दोन कारणे असावीत. मृताच्या धर्माप्रमाणे त्याचे अंत्यविधी झाले की नाही हे दाखवले जाणे आवश्यक असावे. दुसरे म्हणजे, बाळबोध प्रेक्षकांसाठी हे दाखवले जाणे आवश्यक असावे की पोस्ट मॉर्टेम झाल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाते व त्याचे व्यवस्थित अंत्यविधीही केले जातात. नाहीतर एखादी संघटना वगैरे काही भलतेच समजून तिसरेच करायची.

तो दक्षिणाला आवडणारा इन्स्पेक्टर (संजय त्यागी असे नांव वरच कोणीतरी लिहिले आहे, आधी माहीत नव्हते) आजकाल ओठ डावीकडे मुडपण्याची अ‍ॅक्शन जवळपास प्रत्येक डायलॉगला करू लागला आहे. पण तो आहे रुबाबदार हे नक्कीच! एकुण ४ इन्स्पेक्टर्स पहिल्यापासून आहेत. आता जे सोमवार ते गुरुवार एपिसोड्स असतात त्यासाठी काही नवीन इन्स्पेक्टर्स घेतले आहेत ते काही एवढे खास नाहीत. खरे तर हे सोमवार ते गुरुवारवाले एपिसोड्स म्हणजे लाईफ ओके वरील सावधान इन्डियाशी स्पर्धा म्हणून आखल्यासारखे वाटत आहेत. पण त्यातही एखादा जबरदस्त एपिसोड होऊन जातोच.

अनुप सोनीच्या जागी दुसर्‍या कोणाची कल्पनाच करता येत नाही.

आजकाल मोबाईल फोन रेकॉर्ड्सवरून गुन्हे शोधण्याचे एपिसोड्स जरा कमी करण्यात आलेले दिसत आहेत. त्या ऐवजी विविध इतर मार्गांनी गुन्हेगाराला शोधल्याचे दाखवणारे भाग येऊ लागले आहेत. ह्याच्यामागे बहुधा असे कारण असावे की फोन रेकॉर्ड्सवरूनच सगळा तपास होतो अशी प्रतिमा होऊ नये.

पण एकंदर क्राईम पॅट्रोल लाजवाब कार्यक्रम आहे असे माझे मत!

-'बेफिकीर'!

प्रत्येक पात्राचा अभिनय भूमिकेसाठी अतिशय अचूक असतो ही खासियत आहे. अतिरिक्त भडक अभिनय किंवा फालतू अभिनय कुठेच दिसत नाही.

प्रत्येक पात्राचा अभिनय भूमिकेसाठी अतिशय अचूक असतो ही खासियत आहे. अतिरिक्त भडक अभिनय किंवा फालतू अभिनय कुठेच दिसत नाही.>>>+१

संजय त्यागी चे प्रोमोशन झालय वाटतं- क्राईम ब्रांच ऑफिसर असतो अलिकडच्या सगळ्या भागात...

रोज असते ते क्राईम पॅट्रोल १००. त्याचा दर्जा एवढा खास नसतो.

शुक्र-शनि-रवी असते ते क्राईम पॅट्रोल सतर्क>>>अनुमोदन

आता जे सोमवार ते गुरुवार एपिसोड्स असतात त्यासाठी काही नवीन इन्स्पेक्टर्स घेतले आहेत ते काही एवढे खास नाहीत. खरे तर हे सोमवार ते गुरुवारवाले एपिसोड्स म्हणजे लाईफ ओके वरील सावधान इन्डियाशी स्पर्धा म्हणून आखल्यासारखे वाटत आहेत. +१११

पण एकंदर क्राईम पॅट्रोल लाजवाब कार्यक्रम आहे असे माझे मत! >>>>माझेही

अनुप सोनीच्या जागी दुसर्‍या कोणाची कल्पनाच करता येत नाही. +१२३४५६७८९

त्याचा दर्जा एवढा खास नसतो.
>> Uhoh म्हणजे नक्की काय?
कथेत दम नसतो? अभिनय कमकुवत असतो की सादरीकरण?
सत्यघटनाच आहेत त्या शेवटी त्यातून गुन्हेगारीवर आधारलेल्या, त्यात कसला दर्जाच्या अपेक्षा?

बहुधा आपल्याला रक्तरंजित कथा पाहून पाहून सवय झाल्याने चोरी मारी, अपहरण असल्या केसेस पाहताना त्याचा दर्जा खालावल्यासारखा वाटतो. असो..

पण बेफींना अनुमोदन, कार्यक्रम लाजवाब आहे.

सावधान ईंडिया पण आवडतो मला. पण त्यात नेहमी सगळे एपिसोडस हे मध्यम वर्गिय किंवा उच्चभ्रू लोकांचेच (त्या वर्तुळातले गुन्हे)दाखवतात. मला नक्की नाही सांगता येत पण काहीतरी विसंगत आहे असे नक्की वाटते. बर्‍याचदा घरच्याच कुणालातरी सहजपण गुन्ह्याची उकल होऊन जाते, मग नाटक यशस्वी होणे, घरी सहज कॅमेरे बसवणे असं काहीतरी आतर्क्य (मध्यमवर्गिय लोकांसाठी हायफाय फंडे) दाखवतात.

या उलट क्रापॅ मध्ये सर्व स्तरांतील गुन्हे, झोपडपट्टी, कपडेपट, रंगरंगोटी सर्व काही कथेला मॅच करते.

दक्षिणा, शुक्रवार ते रविवारपेक्षा सोमवार ते गुरुवारच्या एपिसोड्सचा दर्जा खास नसतो असे म्हणालो कारणः

हे एपिसोड्स प्रामुख्याने सावधान इंडियाला टक्कर द्यायला सुरू करण्यात आलेले आहेत. त्यातील पात्रांचा अभिनय किंचित कमकुवत वाटतो. इन्स्पेक्टर म्हणून घेतलेले नवीन अभिनेते नेहमीच्या इन्स्पेक्टर्सपेक्षा अभिनयात कमकुवत वाटतात. तपास प्रक्रिया किंचित गुंडाळल्यासारखी वाटते काही वेळा. मुख्य म्हणजे 'धक्कादायक उलगडा' हा घटक विशेष आढळत नाही. वगैरे वगैरे! पण अर्थातच त्याही सत्य घटना असतातच.

ओवरआॅल मालिकेचा दर्जा चांगला आहे, सोनीटिवीची हिच एक मालिका रेकाॅर्ड करुन बघितली जाते.

तरीहि हल्लीचे काहि एपिसोड्स कायच्याकाय आहेत. आणि कलाकार एव्हढे "ओळखिचे" (युज्वल सस्पेक्ट्स) झाले आहेत कि सुरुवातीला कितीहि साळसुद, निरागस दाखवण्यात आले तरी शेवटि हेच कल्प्रिट असावेत हा अंदाज बांधता येतो... Proud

राज Proud

चैत्राली, हो बहुधा, पण सावधानने रोजच नवीन भागांचा सपाटा सुरू केला. क्रापॅ फक्त विकांताला असायचे. आता आठवडाभर असते.

आजकाल क्रापे मध्ये बरेच मराठी कलाकारही असतात

<<

खरय,
'Kavita Shinde Commits Suicide' ह्या क्राईम पेट्रोलच्या एपिसोड मध्ये संतोष जुवेकरने अत्यंत कमालीचा अभिनय केलाय. अवश्य पाहा.

एकूणच क्राईम स्टोरीज, इनव्हेस्टीगेशन, गुन्ह्याची मानसिकता हे विषय मला फॅसीनेट करत असल्याने मी आवर्जुन पाहते. आणि सध्याच्या हिंदी टीलिव्हीजन क्राईम सीरीयल्स पैकी माझ्या मते तरी हीच मोस्ट रीयलीस्टीक आणि चांगली सीरीयल आहे. रायटर, डीरेक्टरला, एडीटरला फर्फेक्ट जर्म, नस सापडलीये असं वाटतं.

तुम्हाला कोणाला "सावधान इंडीया" आवडत नाही का लाइफ ओके वरचे. ते पण चांगले असते.
==> ह्यातील बर्‍याच भागांना "A" रेटिंग द्यावे इतपत वाह्यातपणा दाखवतात, आधी बघायचो पण आता फक्त क्राईम पॅट्रोल बघतो.

पॅट्रोल म्हणजे गस्त हो. वॉच.

हा मी आधी बघायचे. पण आधीच तो रात्रीचा असायचा. त्यात एकेक भयानक गोष्टी बघितल्या की भिती आणि अस्वस्थता वाढायची. आणि स्वतःला मुलं असताना , ती भिती ज्यास्त वाढते.
असे वाटते, आपण कुठे रहातो आणि काय ह्या गोष्टी घडताहेत? काय होतय आजूबाजूला ... त्या भितीने म्हणून बंद केलं.

ठळक आठवणारी आणि खूप खोल परीणाम करणारी त्यावेळी पेपरात वाचलेली, रुचिका गेहरोत्रा.

अतिशय दु:ख झालेलं. राग इतका आलेला सिस्टमचा. आताच काही वर्षांपुर्वी टीवीवर त्या नराधमाला फक्त सहा महिने शिक्षा झालेली तेव्हा तो दात काढत बाहेर आलेला पोलीस .....

बर्‍याच घटना पाहून वाटलेले की, उत्तरेत पॉवरचा जरा ज्यास्तच माज आहे. लोकं खूपच वसवसलेली आहेत.

ह्याचा अर्थ आपल्याकडे( महाराष्ट्रात) नाही असे नाही पण खूपच भयाण आहे बिहार, हरयाणा, दिल्ली, पंजाब.

मला तर वाटतं, भारतात शिक्षणाचे विषय खूपच चुकीचे आहेत.

आठवी पासून ( साधारण हे वय जरा परीपक्व आहे समजून) मुला/मुलींना हे चार विषय प्रामुख्याने आणि सक्तीचे तरी असावेत....
*मला कल्पना नाही की अजून कुठल्या शाळेत असावेत की नाही*

पण मला कायम सुचत असलेले,

सुरक्षितता- ( कराटे , शारीरेक बळकटीचे खेळ, एखादी परीस्थिती कशी हँडल करावी , कोणी बोलवले तर एकटे जावं की नये वगैरे),

लैंगिक शिक्षण - (ह्यात बेसिक माहिती तसेच कोणाचे हेतु (टच) कसे ओळखावे )

बेसिक कायदे ज्ञान. -( कसे , कोणाकडेच व कुठे तक्रार करायची, रेकॉर्डींग कसे करावे एखादा प्रसंग)

नशा व त्याचे दुष्परीणाम - आजकाल खूपच ओपनली मुलं/मुली नशा करताना दिसतात. अगदी कॉलेजच्या बाहेरच दुकानं असतात बिडीची.

बाकी, समाज कधी बदलेले हे सांगूच शकत नाही.

सुरक्षितता- ( कराटे , शारीरेक बळकटीचे खेळ, एखादी परीस्थिती कशी हँडल करावी , कोणी बोलवले तर एकटे जावं की नये वगैरे),

लैंगिक शिक्षण - (ह्यात बेसिक माहिती तसेच कोणाचे हेतु (टच) कसे ओळखावे )

बेसिक कायदे ज्ञान. -( कसे , कोणाकडेच व कुठे तक्रार करायची, रेकॉर्डींग कसे करावे एखादा प्रसंग)

नशा व त्याचे दुष्परीणाम - आजकाल खूपच ओपनली मुलं/मुली नशा करताना दिसतात. अगदी कॉलेजच्या बाहेरच दुकानं असतात बिडीची.>> ++११

अत्यंत आवडता कार्यक्रम. रोज युतूबवर २-३ कथा पहातो. कथेने शहारे येतात कधीकधी. कुठेही भडक अभिनय नसतो. आवडते पोलीस म्हणजे तो द्रोण झालेला, ओम्पुरी सारखा तोंडावर खड्डे असलेला आणि हल्ली अजुन एक आहे. अनुप सोनी भन्नाट.

त्याचा दर्जा एवढा खास नसतो.
>> अ ओ, आता काय करायचं म्हणजे नक्की काय?
कथेत दम नसतो? अभिनय कमकुवत असतो की सादरीकरण?
सत्यघटनाच आहेत त्या शेवटी त्यातून गुन्हेगारीवर आधारलेल्या, त्यात कसला दर्जाच्या अपेक्षा? >>>>

उत्तम अभिनय + उत्तम सादरीकरण हीच क्राईम पॅट्रोलची खासियत आहे पण आताच्या डायल १०० मध्ये ह्या दोन गोष्टी थोड्याफार गंडलेल्या आहेत (साधारण सावधान इंडियाप्रमाणे पण अर्थातच क्राईम पॅट्रोल उजवंचं आहे.) त्यामुळे आताचा दर्जा खालावला आहे असे वाटते.

सावधान इंडिया मलातरी मुळीच आवडत नाही त्यात पोलिस अगदी शेवटी येतात सिनेमात येतात तसे Proud जे काय शोध लावायचेत ते हिरो-हिरोईनच लावतात. क्राईम पॅट्रोलमध्ये मात्र पोलिस गुन्हा आणि गुन्हेगाराचा शोध ज्या पद्धतीने लावतात ते बघायला एकदम भारी वाटतं.

..

तरीहि हल्लीचे काहि एपिसोड्स कायच्याकाय आहेत. आणि कलाकार एव्हढे "ओळखिचे" (युज्वल सस्पेक्ट्स) झाले आहेत कि सुरुवातीला कितीहि साळसुद, निरागस दाखवण्यात आले तरी शेवटि हेच कल्प्रिट असावेत हा अंदाज बांधता येतो. >>> मलापण Proud

ह्यातले पोलीस ग्लोव्ज न घालता सगळ्या पुराव्यांना हात लावतात., सगळी शोधाशोध करतात.

नाहीतर सीआयडी वाले आधी ग्लोव्ज घालुन मगच एखाद्याच्या घरात घुसतात.

Pages