इशकजादे.

Submitted by उदयन. on 12 May, 2012 - 01:19

इशकजादे..
अर्जुन कपुर (बोनी कपुर चा मुलगा) परिनिती चोप्रा (प्रियांका चोप्राची मावसबहीन)
दिग्दर्शक : हबिब फैजल ( दो दुने चार फेम)
निर्माता: अदित्य चोप्रा
संगीतः अमित त्रिवेदी
.
यशराज चित्रपटांच्या विरुध्द चित्रपट आहे हा.. हिंसा, दगा, दे मारामारी ने भरपुर, अभिनेत्री नुसते नाचगाणे करत नाही तर बंदुका सुध्दा चालवते.. एकुणच यशराज च्या संपुर्ण इतिहासाच्या विरुध्द हा चित्रपट आहे..
चित्रपट चालु होतो ते एक लहान मुलगा आणि एक लहान मुलगी एकमेकांना सभ्य भाषेत शिव्या देत असतात...( यावरुनच पुढील चित्रपटात काय धेंड आहे याची पुसटशी नाही लख्ख कल्पना येते)
उत्तर प्रदेशातील एका गावात दोन राजकारण करणार्या कुटुंबाची ही कथा आहे..पर्मा (अर्जुन) चौहान हा अत्यंत वाया गेलेला प्रचंड माज उद्धट असणारा आपल्या दादा ला निवडणुकीत जिंकवण्यासाठी सर्व काही नैतिक अनैतिक कामे करत असतो... क्षणाक्षणाला गोळ्या झाडत गावात फिरणारा (हे बिल्कुल पटत नाही.. पोलिस नावाला सुध्दा दाखवत नाहीत. एक मधे कलेक्टर दाखवला आहे फक्त २ मिनिटांसाठी) तर झोया (परिनिती) कुरेशी ही आपल्या आमदार वडिलांच्या पावलावर पाउल ठेवुन राजकारणात उतरण्याची तयारी करणारी महत्वाकांक्षी मुलगी. घरात लाडात वाढलेली. स्वतःचे दागिने विकुन हौसे खातिर बंदुक विकत घेणारी बिंधास्त.
एका कार्यक्रमात नाचणारी वरुन दोघां घरामधे परत भांडणे होतात. पर्मा झोयाच्या घरातुन भर सभारंभामधुन नाचनारीला उचलुन घेउन जातो.. याचा बदला झोया पर्माला कॉलेज कॅम्पस मधे सगळ्यांच्या समोर कानाखाली लावुन देते. इथुन चित्रपट गती घेतो..पर्मा बदला घेण्याच्या वृत्तीने झोयाला आपल्या जाळ्यात अडकवतो लग्न करतो आणि तिला दगा देतो. हे इतके जलदगती ने होते ..की नेमके काय चालु आहे हेच कळत नाही. मध्यंतर पर्यंत इतकया सार्‍या घटना घडतात की असे वाटते की संपुर्ण एक चित्रपट इथेच संपला की काय...
मध्यंतरा नंतर नाट्यमय घडामोडी घडतात. पर्मा तिच्या लग्नाचे फोटो गावभर करतो. त्यामुळे आ. कुरेशीनां निवडणुकीत पराभव पत्करावा लागतो. झोया लपुन पर्माच्या घरी पर्माचा खुन करण्यासाठी येते पर्माची आई तिला रोखुन धरते. माझ्या मुलाला तुच सुधारु शकतेस इत्यादी वाक्य तिच्या तोंडावर फेकुन मारते ( टिपिकल हिंदी चित्रपट) . झोयाला शोधत तिचे वडिल चौहानांच्या घरी येतात.तिला ठार मारण्यासाठी त्यामुळे झोया ना इकडची होते नाही तिकडची... पर्मा त्याच्या दादांना आई मुळे खोटे सांगतो झोया नाही म्हणुन.. अचानक दादांना झोयाचा पत्ता लागतो आणि झालेल्या झटापटीत पर्माच्या आई ला त्याचा दादा गोळी मारुन ठार करतो. आई मरताना पर्माला आपल्या चुकांचे प्रायश्चित करण्याचे वचन घेते.. आपल्या आईवर प्रचंड प्रेम असणार्या पर्मा आई चे वचन पाळण्यासाठी झोयाला घेउन पळतो आणि क्षणाक्षणाला तिचे रक्षन करतो.. या घडामोडीत झोया परत एकदा पर्माच्या प्रेमात पडते आणि त्याचा स्विकार करते..
पुढे काय घडते या साठी चित्रपट पाहावा... पुढे सस्पेन्स आहे अजुन फार...
संपुर्ण चित्रपट हा ऑनर किलिंग वर आधारित आहे.. परंतु मध्यंतरा पर्यंत पुसटशी देखील वाटत नाही.. दिग्दशकाने कथेचा बाज उत्तम पकडलेला आहे.. ही प्रसंग अफलातुन आहेत. तर काही प्रसंग अत्यंत बालिश सादर केले आहेत.. उदा. आईचे अग्निसंस्कार करतानाचा प्रसंग बालिश झालेला आहे. दिग्दर्शकानेच संवाद लिहिल्याने ..एक उत्तम मेळ जमुन आलेला आहे...संवाद चुरचुरीत आश्लिल आणि मधे मधे कानाला खटकणारे आहेत.
संगिताच्या बाबतीत यथा तथाच आहे.. इशकजादे, आणि मै परेशान हे दोन अप्रतिम गाणी आहेत बाकी चे गाणे आयटम साँग्स स्वरुपातच आहे.. त्यांचे बोल देखील डबल मिनिंग मोड मधे आहेत..बाकी गाण्यांचे काहीच रोल या चित्रपटात नाही आहे..
अभिनय उत्तम जमलेला आहे.. संपुर्ण चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेम मधे अर्जुन आणि परिनिती आहेत.. दोघांनी ही स्वतःच्या कॅरेक्टर ला साजेशा अभिनय केलेला आहे.. विशेषतः परिनिती चोप्राने तर कमालच केलेली आहे .. फक्त दुसराच चित्रपट आहे तिचा हे वाटतच नाही. प्रत्येक प्रसंगात उठुन दिसलेली आहे.. अवखळ अल्लड सुरुवातीची मुलगी बिंधास्त बंदुक चालवणारी नंतर आपल्याच शत्रुच्या प्रेमात पडणारी.. त्याला सर्वस्व अर्पण करणारी. अतिशय गोड मस्त भुमिका केली आहे.. पर्मा च्या भुमिकेत अर्जुन फिट बसलेला आहे. पहिल्याच चित्रपटात मस्त काम केलेले आहे.. काही काही ठिकाणी त्याचा नवखापणा प्रकर्षाने दिसुन येतो..त्याच्या रांगड्यापणात अनिल कपुर ची छटा दिसुन येते. चेहर्‍यावरचे हावभावमधे लगेच बदल घडवुन आणण्यात जमले आहे.. एकुनच लंबी रेस का घोडा...छोट्याश्याच पण अप्रतिम भुमिके मधे गौहार खान चटका लावुन जाते
नाचनारी वेश्या ते एकतर्फी पर्मावर प्रेम करणारी प्रेयसी. सुंदर केली आहे ... ति जेवढी मेकअप फासुन सुंदर दिसते त्यापेक्षा १०० पट साध्या कपड्यात सुंदर दिसते.. तिघांनीही संवाद फेक योग्य टयमिंग वर केली आहे..

.
काही काही प्रसंग अतिरंजित आहेत... विद्याबालन नजरेत दिसत असताना अचानक मल्लिकाशेरावत चे सिन्स पडद्यावर येतात.. अर्जुन आणि परिनिती ने अंतरंग दृश्ये समतोल दिली आहेत..
.
.
आवर्जुन बघावा असा ही नाही आणि उगाच नाही बघावा असा ही नाही.....
,,
,त.टी.
.
( डोके घरी ठेवुन जाणे.)
.
.
उगाच मला नंतर बोलु नये.. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

..

एकूण एकदा बघायला हरकत नाही, किमान परिणतीसाठी तरी असे दिसते. लेडीज व्हर्सेस... मधला तिचा रोल जबरी होता. छान परीक्षण!

गुहार खान चटका लावुन जाते>>>ते गौहर खान आहे माझ्या मते..छान लिहल आहेस उदय Happy
त्याच्या रांगड्यापणात अनिल कपुर ची छटा दिसुन येते. चेहर्‍यावरचे हावभावमधे लगेच बदल घडवुन आणण्यात जमले आहे. >?>>>>>> +१

परिणिती साठी तर नक्कीच बघावा..................तिचा.निरागसपणा आणि अर्जुन चा रांगडेपणाचा मेळ साठी बघा.....शेवट सुध्दा वेगळाच आहे Happy

मग बघावा कि नाही ?>> Lol

याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करू का?

डोके घरी ठेवायचे असल्याने डोळे व कानही आपोआप घरी राहतील

उदय -

<<<हे इतके जलदगती ने होते ..की नेमके काय चालु आहे हेच कळत नाही.>>>

Lol

बेफी..>>> Happy मध्यंतर पर्यंत इतक्या घडामोडी घडतात असे वाटते की आता मध्यंतराच्या पाटी ऐवजी THE END ची पाटी झळकते की काय Lol

ते गौहर खान आहे >>> ह्म्म बरोबर...अनु Happy

एकदा बघ्ण्यासारखा असेल असं वाट्टय....
बाकी.. मै परेशान... गाणं मस्त आहे यामधलं....

या सिनेमाचे पोस्टर्स पाहून "वेगळ्या" पद्धतीचे मनोरंजन करणारा सिनेमा असेल असं वाटलं होतं (देशप्रेमी सारखा). पण चांगली परीक्षणं वाचून निराशा झाली.

साधना ऑनर किलींग वर आहे...

ओह.. प्रोमोजमध्ये सतत एकमेकांशी भाडणारे, हातात बंदुका घेऊन फिरणारे हिरोहिर्विन पाहुन मुलीचा गैरसमज झाला असावा

इशकजादे आनि अव्हेंजर्स काल लागोपाठ पाहीले...:) अव्हेंजर्स जास्त आवड्ला Happy
अर्जुन आनि परीणीती दोघांनी मस्त काम केल आहे (पण तरी मला ती विशेष नाही आवडली..)
गौहर खान आयटम साँग ही मस्त...
हाणामार्या,,पिस्तुल रोखण,,..यशराज कॅटेगिरी त नाही बसल Wink
मै परेशान गाण्यामधे ति जेव्हा टिकली लावुन अर्जुन कडे पाहत कशी दिसते अस विचारते ते तेव्हा तो भुवया उडवुन छान आहे अस म्ह्ण्तो,,,डिट्टो अनिल कपुर... त्याचे कित्येक हावभाव मला अनिल कपुर सारखे वाटले

पण तरी मला ती विशेष नाही आवडली.. >>>>>>>>. अरे रे रे रे.... Sad
.
.
.
तिच एक छान दिसली ना चित्रपटात ............हो की नाही मुलांनो ... ?? Biggrin

तीन ऑप्शन्स होते काकस्पर्श, विकी डोनर अन् इश्कजादे त्यातला काकस्पर्श विकांताला पहायचा मूड नव्हता अन् विकी डोनरची वेळ आम्ही चुकवल्री म्हणून मग ठरवलं की इश्कजादे पाहूया. [खोटं]

खरं- परिणिती चोप्राचा लेडीज वर्सेस रिकी बेहेल पाहिला आणि हाही पाहायचाच होता म्हणून विकी डोनरची वेळ मुद्दाम चुकवली अन् काकस्पर्श पुन्हा केव्हातरी म्हणून बेत रद्द केला. आता टिपिकल बॉलिवुडी मुव्हीत जे जे काय काय होतं ते ते सगळं इथंही होतं. प्लॉट मध्ये सगळा मसाला आहे - खून खराबा, दंगा फसाद, आयटेम साँग इ.
इतकंच नव्हे तर दारूगोळा (दारू आणि गोळ्या) पाण्यासारख्या वहातो पण खून आय मीन रक्त तेवढं सांडत नसतं! कदाचित, बजेट लो असल्या कारणाने किंवा रक्त वगैरे दाखवून बालमनावर परिणाम करायचा नसावा म्हणून दिग्दर्शकानं ही काळजी घेतली असावी. पिक्चरची सुरूवात शिव्यांच्या लाखोलीने होते अन् एन्ड ***** [udayone सांगितल्यानुसार शेवट एडिटलाय! आणि हो ह्यात टिप्पिकल बॉलिवुडी शेवट नाही वेगळा आहे! ह्यांचं वेगळं आहे! अशी टॅगलाईन लावयला हरकत नाही. Proud ] ह्या एका वाक्यात चित्रपटाबद्दल लिहिणं हे फारच नाईन्साफी केल्यासारखं होईल म्हणून या चार शब्द -

हिरॉईन अन् हिरोवर प्रेम करणारी गौहर खान सोडली तर स्टार कास्ट तगडी नाही. तरीही काही फरक पडत नाही कारण इतरांना फार काही संवाद नाहीत.
पिक्चर का पाहू नये -
कथेत काही दम नाही कथा वगैरे बकवास आहे ! हिरो बकवास! हिरोचे आजोबा, कुटूंब, आई (हिरोची) हिरॉईनची आई, बाबा ह्या सगळ्यांना उगीचच एक दोन संवाद म्हणायला दिले आहेत असं वाटतं.

नाही म्हणायला हिरो ला वाव आहे पण [ पण अक्कल नाही! आजोबा सांगेल ते करतो आई सांगते म्हणून माफी मागतो, आई सांगते म्हणून हिरॉईनला वाचवतो, हिरॉईन सांगते म्हणून मारतो... ] तो ज्या स्टाईल ने शिव्या घालतो, डिजल मागतो त्याच स्टाईलने माफी दे म्हणतो त्यात काही दम वाटत नाही!

पिक्चर का पहावा?

परिणिती चोप्रासाठी, तिच्या परेशान गाण्यासाठी [सुंदर गाणं आहे (पण वेस्टेड..)] एकाच गाण्यात एवढे ड्रेसेस वापरल्येत की नंतर ड्रेसच शिल्लक नाहीत असं वाटतं.

शेवटची १०-१५ मिनीटे सोडली तर तोपर्यंत मस्त पिक्चर, शेवट अटर क्रॅप! त्यानंतरचा मेसेज तर चित्रपटाच्या संदर्भात एकदम बकवास. चित्रपट त्याबद्दल वाटलाच नाही. शेवटामुळे ८० च्या दशकातील एका प्रेमपटाच्या वळणावर जातो. स्पॉईलर होईल म्हणून जास्त लिहीत नाही.

हे दोघे काही आंतरजातीय्/धर्मीय विवाह दाखवायला तसे प्रातिनिधिक लोक दाखवलेले नाहीत. उलट एकदम विक्षिप्त व्यक्तिमत्त्व असलेल्या या दोघांच्या एकमेकांवर कुरघोड्या दाखवल्या असत्या आणि ते एक झाल्यावर त्यांच्याविरूद्ध गेलेल्यांवरही ते कशी मात करतात हे दाखवले असते तर जास्त मजा आली असती. हा चित्रपट सुरूवातीला तशी इमेज निर्माण करतो आणि मग गंडवतो.

परिणती चोप्रा भन्नाट! काय मस्त काम केले आहे. दिसतेही छान. इतके प्रसन्न हास्य क्वचितच दिसते. मात्र रीडिफ मधे वाचले होते त्याप्रमाणे तिच्या कॅरेक्टर चा नंतर फारच कचरा केलेला आहे. अर्जुन कपूरही मस्त. पण मला शंका येते की ज्या पद्धतीने झोया चे कॅरेक्टर उभे केले आहे आणि परिणती ने काम केले आहे ते त्याच फ्लो मधे ठेवले असते तर तिनेच पिक्चर खाउन टाकला असता. हा पिक्चर अर्जुन कपूरचे लाँच वेहिकल असल्याने मधे काहीतरी गडबड करून त्याच्या व्यक्तिरेखेला उठाव देण्यासाठी झोयाचे सीन्स तसे केले असावेत. पिक्चरचा फ्लो बिघडलाय त्यामुळे.

परिणतीचे काही काही शॉट्स मधे एक्प्रेशन्स जबरी आहेत - बंदुक घेताना गोळ्या विसरते तेव्हा, पुढे गेलेली पुन्हा मागे जाऊन तो पडदा लाऊन घेते तेव्हा, असे अनेक सीन्स आहेत.

ओके आहे मुव्ही.. अर्जुन आणि परिणीती सही आहेत.
त्या माठ बोनीचा मुलगा चांगला अभिनय करु शकेल असं अजिबात वाटलं नवह्तं, Btw अर्जुन कपुर किती अभिषेक बच्चन सारखा आहे.. एकदम युवाच्या अभिषेक ची आठवण आली !