Submitted by suneha on 11 May, 2012 - 03:13
नमस्कार, मी अमुक अमुक,
व्यावहारिक जगात येतेय,
प्रामाणिक प्रयत्न करतेय.....
पण, हा प्रामाणिकपणाच आड येतोय.
खूप ताकदीनं, शक्तीनं त्याला दूर ठेवून येतेय.
चाणाक्षपणा, चतुराई, कावेबाजपणा
विकत आणलेत,
वेगवेगळ्या भावनांचे मुखवटे
काय महाग झालेत! पण आणलेत.
पण, डोळे? ते गोंधळलेत
पाणी न येण्याचं - आनंदाचं असो वा दुःखाचं,
औषध घेऊन यायला सांगतायत.
बेफिकिरी, निर्विकारपणाचे कोट, अन
निर्लज्जपणाचा सदरा सेलमधून आणलेत.
चांगले जाड अस्तराचे बघून.
पण, त्यातूनही टोचणारया, सलणाऱ्या जाणीवा....?
बोथट होण्याचा इलाज मागतायत.
पण मी येतेय, येण्याचा प्रयत्न करतेय .....
पक्षांची किलबिल, प्राजक्ताचे सडे,
पाखरांची पिल्लांसाठी धडपड, फुललेली झाडे,
तान्हुल्यांची निरागसता, सगळं सगळं
न जुमानता, येतेय.
पण ...........
रस्त्यावरच्या कुत्रीला नुकतीच पिल्लं झालीयेत.....
नेहा.
गुलमोहर:
शेअर करा