बाहुली

Submitted by विनार्च on 10 May, 2012 - 08:00

हा माझ्या लेकीचा वॉटर कलर मध्ये चित्र रंगवण्याचा पहिलाच प्रयत्न आहे कसा वाटतोय ते जरुर लिहा.
(घरात बरेच दिवस तिच्यासाठी पोस्टर कलर्स व ब्रश आणुन ठेवले होते पण तिला रंग व ब्रश कसे वापरायचे ते दाखवायला मला वेळच मिळत नव्हता. 'उद्या दाखवेन' या माझ्या रोजच्या उत्तराला कंटाळून तिने एकदा स्वतःच ते कलर घेतले व हे चित्र काढले.) अगं कस जमल तुला?? या माझ्या प्रश्नाला तिने पुंडलिक वझे यांच "रंग लेपन तंत्र व मंत्र" पुस्तक दाखवलं. याआधी सुट्टीतल्या उद्योगातले प्राणी बनवताना एकदाच तिने हे कलर वापरले होते पण तिथे जास्त कौशल्याची गरज नव्हती
लेकीच वय- आठ वर्ष
माध्यम- पोस्टर कलर्स व क्रेऑन्स.

2012-05-006.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कित्ती गोड आहे..... चेहर्‍यावरचे मिश्किल भाव तर खासच ... डोळे किती रेखिव काढलेत.. आणि रंगही कुठेही पसरले नाहीयेत...

फारच छान !!!

शेड्स क्रेयॉन च्या रंगांनी दाखवल्यात का?>>> होय.
दिनेशदा नक्की सांगा तिला तिचा आयडी "मी अनन्या" आहे.
ईनमीन तीन,निंबुडा धन्यवाद!

किती गोड काढलीये बाहुली........ Happy
खूप खूप आवडेश .
तिची आणखी चित्रंही आवडतील बघायला Happy

चित्रा,कंसराज,मनिमाऊ,आर्,लोला,निलमपरी,बस्के,लाजो,श्री,आर्च,बित्तुबंगा,जयवी खूप खूप धन्यवाद!
माझ्या लेकीची चित्रकला इथे मिळणार्‍या प्रोत्साहनामुळे तसेच इथल्या चित्रकारांची चित्र पाहुन दिवसेंदिवस बहरत आहे त्याबद्द्ल मायबोलीचे व मायबोलीकरांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत _/\_ Happy