फुलपाखराच्या लेखणीतून_१

Submitted by sarode_vaishnavi on 8 May, 2012 - 09:55

कुणी तरी म्हटलं आहे जेव्हा शब्द सुचत नाही तेव्हा आपण काही तरी action करून
बोलायचा प्रयत्न करतो..आता तसा अनुभव होत आहे, बोलायचं आहे पण सुरवात कशी करू
सुचत नाही आहे..जे वाटते ते बोलायचं हा प्रयत्न आहे ..

मी खरोखरच २ role play करत आहे ,पण हे सर्व करताना तू किती matter करतो
हे नेहमीच बोलायचं प्रयत्न करते, जमत नाही पण तरीही आज पुन्हा एक प्रयत्न..
माया म्हणजे काय असते..? हे खरच तर तुझ्याशी बोलल्यावरच कळाल, तुम्ही
लोक ज्याला आईचं प्रेम म्हणता न..? ते कदाचित असच असेल हा विचार करून मी
खूप सुखी असते..तेही असच खूप निर्मळ असते का रे..??
तुम्ही ज्याला बाबांचं मार्गदर्शन म्हणता न..? ते मला तू दिलस नेहमीच काय चुकीचं,काय बरोबर,
काय आणि कसा करायचं हे सर्व तसच काही सांगितलं नाही का..?
मोठ्या भावाची एक कमी खुपत होती समजायला लागल्या पासून ..ती तर पूर्णच झाली..

न खूप खूप महत्वाच एक दोस्त म्हणून जे केलस त्याला तर फ़क़्त ऋणी केलस
तू..!! जेव्हा कुणी ऐकत नाही तेव्हा माहित असते,तू ऐकशील,समजावशील.
खूप त्रास देते न मी ..पण काय करू आता त्रासली उसनं हसून..आणखी थोडा
मोठा व्हायचं आहे अन त्यासाठी तुझ्या सावलीची गरज आहे या फुलपाखराला..
पक्षी मोठा झाला कि घरट सोडून जातो मी हि उडून जाईल,नाही देणार नेहमी
त्रास पण आणखी काही दिवस पंखात बळ साठवण्यासाठी, हरवलेली स्वप्न
सापडेपर्यंत राहशील न रे नेहमी सोबत ..??
"एक मित्र"," एक जिवलग दोस्त","एक भाऊ","एक शांत सावली" होऊन..
खरच आता पर्यंत मदत केलीस आणखी काही दिवस..???

बस आता नाही बोलू शकत.. शब्द थांबले आणि डोळ्यातील पाण्यानी घर मांडलय..

गुलमोहर: 

मला सापडलेली हि तिची एक डायरी आहे..

जरा जुनीच,मळलेली,फाटलेली,जळलेली,धूळ खात पडलेली..

तिच्यातले हे काही अनुभव,काही भावना तुमच्यासमोर आणण्याचा माझा छोटा प्रयत्न..

ती कोण हे शोधण्याचा प्रयत्न करू नका..!!

तिच्यात कुठेतरी मला मी सापडली कदाचित तुम्हालाही तुमच्यातील हरवलेली 'ती' सापडेल.. !!