ऑल फॉर चॅरिटी बेकिंग चॅलेंज २०१२ -"बेस्ट इन शो"

Submitted by लाजो on 7 May, 2012 - 22:27

ऑल फॉर चॅरिटी बेकिंग चॅलेंज -"बेस्ट इन शो"

दर वर्षी मे महिन्यात आमच्या ऑफिसमधे चॅरिटी साठी बेकिंग चॅलेंज असते. यावर्षीही जास्तीतजास्त लोकांनी या चॅलेंजमधे भाग घ्यावा म्हणून मागच्या तीन एक आठवड्यांपासुन सोशल क्लबच्या रिमाईंडर इमेल्स येत होत्या.

Bake off.png

मागची दोन-तीन वर्ष मी भाग घेइन घेइन म्हणायचे पण जमलं नाही कारणं त्यासुमारासचं माझ्या लेकीचाही वाढदिवस असतो आणि त्याचे केक (किमान २ तरी - एक शाळेसाठी आणि एक घरच्यासाठी) करण्यात माझा सगळा दम निघालेला असतो Proud पण यंदा लेकीचा वाढदिवस आणि हे चॅलेंज यात आठवडाभर वेळ होता त्यामुळे फायनली या चॅलेंज मधे भाग घेतला.....

....आणि त्यात मला चक्क पहिले बक्षिस तसचं 'बेस्ट इन शो' चं अवॉर्ड पण मिळालं Happy

तुमच्या बरोबर माझे हे पहिले वहिले केक बेकिंग - डेकोरेटिंग अवॉर्ड शेअर करत आहे Happy

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बेक ऑफ साठी 'सध्या बातम्यात असलेले इश्युज, मुख्य घटना इ.' अशी सर्वसाधारण थीम होती.

मागच्याच महिन्यात आमच्या लोकल गव्हर्नमेंटने 'सोलर फार्मिंग' करता जागा उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. मग मी हिच थीम घेऊन केक डेकोरेट करायचे ठरवले Happy सस्टेनेबिलिटी / एनर्जी एफिशियन्सी - हा देखिल सर्वात चर्चिला जाणारा मुद्दा आहेच.

solar6.JPG

१. सर्वप्रथम 'चॉक वॅनिला स्वर्ल' केक बनवला. केक मुद्दाम लेव्हल केला नाही कारण फार्मवर थोडे चढ उतार हवेतच ना? फार्मवर गवत म्हणून हिरवे बटर आयसिंग चोपडले... आता फार्म आहे म्हणजे जमिन एकदम गुळगुळीतही नको आणि लॉन पण एकदम मॅनिक्युअर्ड नको... म्हणुन आयसिंग थोडे खडबडीतच केले... Happy

२. सोलर फार्मिंग करायचे मग त्या निर्मीत उर्जेचा कुठेतरी वापर झालेला दाखवायला हवा ना??? म्हणून मग घर बांधायचे ठरवले Happy हे आमचे प्रिकास्ट घर रिसाय्क्लेबल (पुठ्ठ्याचे) आहे बर का Happy घर ठेवायला पाया/प्लिंथ हवी म्हणून फार्मात जागा करुन त्यावर प्लिंथ बांधली.

३. सोलर पॅनल्स ची जागा निश्चित केली आणि फार्मात वायरींग करुन घेतले.

४. घराच्या जागेवर देखिल 'कन्सिल्ड' वायरींग करुन घेतले. त्याचे टेस्टिंग देखिल केले Happy

solar8.jpg

५. घर आणि परीसर सुंदर दिसायला हवा म्हणुन घराभोवती 'लँडस्केपिंग' देखिल केले Happy

solar4.JPG

६. शेवटी सगळी सोलर पॅनल्स बसवली, तयार घर क्रेन ने उचलुन पायावर चिकटवले आणि वायरी कनेक्ट केल्या Happy

solar5.JPG

७. एक बटण दाबताच आमचे घर सौर्य उर्जेच्या प्रकाशाने उजळुन निघाले Happy

solar7.JPG

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

* यंदाची चॅरिटी होती 'लाईफ लाईन'. चॅलेंज मधे केलेले केक्स्/पेस्ट्रीज इ इ ऑक्शन करतात. यंदा ३० एक एंट्रीज होत्या. एकंदर $९०० जमा झाले. मझ्या केकला $९५ देऊन विकत घेतले Happy

'लाईफ लाईन' ही चॅरिटी क्रायसिस सपोर्ट, स्युसाईड प्रिवेन्शन, मेंट्ल हेल्थ सपोर्ट, डिप्रेशन, अँग्झायटी इ इ साठी ऑन लाईन आणि टेलिफोन काऊन्सेलिंग देते. काम करणारे सगळेच वॉलेंटीयर्स असतात. आणि सर्व संभाषण कॉन्फिडेन्शियल असते. बोलणारा आणि ऐकणारा दोघांनाही एकमेकांची ओळख नसते.

'लाईफ लाईन' बद्दल http://www.lifeline.org.au/ इथे अधिक माहिती मिळेल.

*केक व डेकोरेशन यात काय मुख्य घटक आहेत ते लिहीणे बंधनकारक असते कारण इथे बर्‍याच लोकांना डेअरी, नट्स इ इ च्या अ‍ॅलर्जी असतात.

गुलमोहर: 

लाजो, खरचं तुझे कौतुक करायला माझ्याकडे शब्दच नाहीत असे वाटते... Happy
खुपच सुंदर केल आहेस सगळचं... माझ्यामते स्वयंपाकात केकचे प्रकार वगईरे फारच किचकट या
प्रकारात मोडतात. यातच तु ईतकी पारंगत आहेस आणि विविध प्रकार दाखवतेस की खरोखरचं मनापासुन तुला त्रिवार दंडवत घालावासा वाटतो. Happy

खुप गोड Happy
अभिनंदन
तू सुगरण तर आहेसच त्याबद्दल वाद नाही पण अतिशय कल्पकही आहेस Happy
आणि बक्षिस मिळाल त्यात विषेश काही नाही
ते तू आणि फक्त तूच deserve करतेस Happy
रच्याकने मागे तुला उद्देशुन चतुरस्त्र हा शब्द वापरला गेलेला (आठवतय?)
अगदी शिक्कामोर्तब झालं हो त्यावर आता Happy

धन्यवाद! धन्यवाद!! खुप खुप धन्यवाद!!! Happy

एव्हढं कौतुक वाचुन भारावुन गेल्येय अगदी Happy अन ऑकवर्ड पण वाटतय Uhoh

सॉरी, दिवसभरात इतकी अडकले होते कामात की इथे येऊन तुमचे आभार मानता नाही आले आधी ...

बित्तुबंगा<< डोकॅलिटी शब्द आवडला Happy

वर्षूतै<<< छान वाटलं Happy धन्स गं Happy

अश्विनीमामी<< थँक्यु Happy

जागू , कविन << देशात आले की जमलं तर नक्की नैतर क्लासेस साठी तुम्हाला इकडे यावं लागेल Happy

खरोखरचा "करंट" इश्यु आहे त्यात<< मामी Lol

शापित गंधर्व Happy आपल्याकडुन जमेल तशी मदत करावी असं माझं मत. जास्त वेळ द्यायला आवडेल पण सध्या शक्य नाही..

परत एकदा धन्यवाद सगळ्यांचे Happy

आता जमेल तशी सगळ्या प्रश्नांना उत्तरं देते Happy

सोलर पॅनल्सः सोलर पॅनल्स कशाची करावी हा मला पडलेला पहिला प्रश्न.... काळ्या रंगाची पॅनल्स बनवायची तर खायचे वेगवेगळे कृत्रिम रंग एकत्र करावे लागले असते आणि केकची पॅनल्स कडक राहिली नसती. मग सुचलं डार्क चॉकलेट वापरता येइल, पण डार्क चॉकलेट्चे नुसते स्लॅब जास्त वेळ टिकले नसते कारण हॉल मधे थंडीमुळे हिटर चालु असणार होता.. आणि घरुन नेतानाही डॅमेज होण्याची शक्यता... मग ट्युब पेटली आणि डार्क चॉकलेट 'टिम टॅम' बिस्किटे वापरायचे सुचले Happy

@ रूनी<<< बाकीच्यांच्या केकचे फोटो काढलेस की नाही, जमले तर ते पण डकव इकडे.<<< मी काढले नाहियेत पण ऑफिसच्या न्युज लेटर मधे येतिल तेव्हा टाकेन इथे Happy

@दक्षिणा <<< हे सगळं एकटीने केलस? आणि टोटल किती वेळ लागला? स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन कसं गेलिस?
<<< हो, हे मी एकटीनेच केलं... लेकीने केक करताना त्यात दुध ओतणे, फोडलेली अंडी टाकणे आणि मग स्पॅट्युलाला लागलेले बॅटर खाणे अशी मदत केली Happy नवरा, मॉरल सपोर्टर Happy

<< केक आणि बटर आयसिंग बनवायला दीड तास, डेकोरेशनला दीड तास आणि घर बनवायला अर्धा तास Happy रविवारी दुपारी केक, आयसिंग आणि घर बनवले. रात्री लेक झोपल्यावर डेकोरेशन Happy एकदा डोक्यात आयडिया शिरली की चक्र चलु होतात त्यामुळे केक कसा डेकोरेट करायचा हे साधारण पक्के झालेले असते मग ते प्रत्यक्षात उतरवायला वेळ लागत नाही Happy

<<< मी केक बोर्ड अ‍ॅंटीस्लिप मॅटवर ठेऊन मोठ्या बॉक्समधे घालते आणि मग बॉक्स गाडीच्या फ्लोअरवर... गाडी शिस्ती, सावकाश चालवायची Wink

@ सुलेखाताई<<< सोलर पॅनल्स व हिरवे-पांढरे लँड्स्केपिंग साठी केक चाच वापर केला आहे का?

सोलर पॅनल्ससाठी टिम टॅम बिस्किटे आणि झाडं मार्शमेलोज ची आहेत Happy

@शोभा१२३<<अग पण लाजो गेलेय कुठे???<< दिवसभर कामात बिझी Sad

@ वत्सला<< लाजो बजेट ऐकतेय/बघतेय वाटतं!<<< नो नो नो... त्यात अजिब्बात विंटरेस्ट नाही Proud

लै भारी ळाझूभाय...... लगे रहो.

एक भा.प्र. देशात येताना तूझी सगळी स्किल्स तिकडेच ठेवून येतेस कॉय ? Wink

लाजो ,
केक सुरेख झाला आहे ! अभिनंदन ! दिव्यांची आयडीया तर अफलातून!
मुलाला दाखवला तर आपणही असा केक करू या असे मागे लागला आहे! Happy

फारच छान!! अभिनंदन लाजो!!

लायटिंग कसे केलेस ते पण सांग ना!! कुठले लाईट्स् वापरले आणि वायरिंग कसे केले?

लाजो अभिनंदन ग. Happy अप्रतिम कल्पना आणि त्याहीपेक्षा ती प्रत्यक्षात उतरवणं म हा न !!

अमा ++१

Pages