काढली त्यांनीच माझ्या आज ओठांची कडी

Submitted by सतीश देवपूरकर on 3 May, 2012 - 12:26

गझल
काढली त्यांनीच माझ्या आज ओठांची कडी;
बोललो मी काय त्यांची पार वळली बोबडी!

दु:ख थोड्याशा सुखाची ऊब मागू लागले;
फेकली आश्वासनांची रेशमी त्यांनी लडी!

लोक ते टीका कराया लागले गझलेवरी;
वाचताही नीट ज्यांना येइना बाराखडी!

ते पुढेमागेच होते माझिया छायेपरी;
ऐन मध्यान्ही परंतू मारली त्यांनी दडी!

संपली नाहीत देणी, श्वास माझे संपले!
नाइलाजाने जगाने बंद केली चोपडी!!

लागले आयुष्य अर्धे ओळखायाला तुला;
जाणण्यासाठी तुला ही जिंदगानी तोकडी!

वाचता आले न मजला माणसांचे चेहरे;
आसवेही बेगडी अन् हासणेही बेगडी!

पोत शब्दांना हवा तो त्याचवेळी लाभला;
ज्याक्षणी केली मनाची पालथी मी पोतडी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

छान.

चूल आणि मूल सोडून ती उडाली स्वामिनी
राघवामागून सीता तशि लालुची राबडी.

जमलं. Happy हे वृत्त कोणते? मायबोली कवींमध्ये फार फेमस आहे. रोज एक तरी कविता या छंदात/ वृत्तात असतेच.

जामोप्या, दुसरी ओळ वृत्तात नाही.

या वृत्तास देवप्रिया म्हणतात.

गालगागा गालगागा गालगागा गालगा..........अशी लगावली आहे.

ते पुढेमागेच होते माझिया छायेपरी;
ऐन मध्यान्ही परंतू मारली त्यांनी दडी!

संपली नाहीत देणी, श्वास माझे संपले!
नाइलाजाने जगाने बंद केली चोपडी!!

लागले आयुष्य अर्धे ओळखायाला तुला;
जाणण्यासाठी तुला ही जिंदगानी तोकडी!
>>

शेर आवडले

धन्यवाद

छान

पहिल्या तीन शेरांमुळे भटसाहेबांची आठवण झाली.

दडी आणि शेवटचा शेर आवडला.

चूल आणि मूल सोडुन ती उडाली स्वामिनी
राघवामागून सीता लालुपाठी राबडी.

धन्यवाद. बदल केला

शुक्रतारा याच वृत्तात आहे. लक्षातच आले नव्हते.. Happy

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%...

सगळे शेर खूप आवडले .............मनापासून ............
काफिये वाचून विशेषतः ' कडी' वाचून माझी "वावडी... "ही गझल आठवली .गझलेचा आशय विषयही मिळताजुळता वाटला .एकूणच पुनःप्रत्यायाचा आनंद मिळाला त्याबद्दल आपले आभार

मला सर्वाधिक आवडला तो शेर .................

<<चूल आणि मूल सोडुन ती उडाली स्वामिनी
राघवामागून सीता लालुपाठी राबडी.>>>>>>>>>>>>> हा होय!!
असे शेर वाचून आपणही काहीतरी लिहावे अशी स्फूर्ती मिळते .त्या़करता जामोप्याचेही आभार !!
Biggrin Biggrin Biggrin

! Happy !

अजून एक : लोक ते टीका कराया लागले गझलेवरी;>>>>>>>>>>>>>>>>

इथे तुम्ही टीका म्हणालात ते बरे केलेत ..................ते खरेच आहे ..............१००%मान्य !!!

टिका आणि टीका यातला फरक आपण जाणता हे पाहून बहु संतोष जाहला ............!!

मतला विशेष आवडला... छान गझल

लागले आयुष्य अर्धे ओळखायाला तुला............. ऐवजी
ओळखायाला तुला आयुष्य अर्धे लागले.... असा शब्दक्रम कसा वाटेल??
........................ Happy

काढली त्यांनीच माझ्या आज ओठांची कडी;
बोललो मी काय त्यांची पार वळली बोबडी!

दु:ख थोड्याशा सुखाची ऊब मागू लागले;
फेकली आश्वासनांची रेशमी त्यांनी लडी!

संपली नाहीत देणी, श्वास माझे संपले!
नाइलाजाने जगाने बंद केली चोपडी!!

लागले आयुष्य अर्धे ओळखायाला तुला;
जाणण्यासाठी तुला ही जिंदगानी तोकडी!

व्वा..! छान आहे गझल..!

वाचता आले न मजला माणसांचे चेहरे;
आसवेही बेगडी अन् हासणेही बेगडी!