'हा भारत माझा'च्या शुभारंभाच्या खेळाची तिकिटं उपलब्ध आहेत

Submitted by माध्यम_प्रायोजक on 30 April, 2012 - 02:32

'हा भारत माझा' या चित्रपटाचा शुभारंभाचा खेळ गुरुवार दि. ४ मे, २०१२ रोजी पुण्याच्या सिटीकोथरुड,कोथरुड,, चित्रपटगृहात संध्याकाळी साडेसहा वाजता आयोजित केला आहे.

चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवर या खेळाला उपस्थित राहणार आहेत.

मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या चित्रपटांच्या शुभारंभाच्या खेळांना मायबोलीकर उपस्थित असतात. त्याप्रमाणे 'हा भारत माझा'च्या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. या खेळाची तीन तिकिटं आपल्याकडे आहेत.

या खेळास उपस्थित राहू इच्छिणार्‍यांनी कृपया माध्यम प्रायोजकांना मायबोलीच्या संपर्कसुविधेतून इमेल पाठवावी. इमेलीत कृपया आपला दूरध्वनी क्रमांकही कळवावा.

या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहून नेहमीप्रमाणेच मायबोलीकर या खेळाबद्दल व चित्रपटाबद्दल भरभरून लिहितील, ही खात्री आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users