कर्ज
लाडक्या लेकी ,
सुखसागराकडे निघालेली
तुझी मेंदीभरली पाउले
माझ्या अश्रूंची ठेच लागून
अडखळू नयेत म्हणून
तुला निरोप देताना
निग्रहाने कोरडे ठेवलेले डोळे
आता रोजच बंड करताहेत
निर्वाणीच्या क्षणी दिलेल्या
इवल्याश्या कर्जाचं व्याज
चक्रवाढ गतीन वसूल करताहेत
मी एकटीच असहाय
निःशब्द आहे उभी
सावकाराच्या शिव्या
निमूटपणे ऐकणाऱ्या
रिकाम्या खिशाच्या
कर्जदारासारखी !!!
कर्ज
Submitted by shilpa mahajan on 29 April, 2012 - 07:17
गुलमोहर:
शेअर करा
सुरेख कविता
सुरेख कविता
व्वाह !!!
व्वाह !!!
क्लास ... !!
क्लास ... !!
खुपच छान. आवडली.
खुपच छान. आवडली.