जग खरचं खुप छोटय..!!
उग्गीचच मन राखायचं म्हणुन म्हटलं होतं..
पुन्हा भेटु..!!
अन तु नुसतच हसलीस..!!
कदाचित माझ्या त्या निरागस आशेला..!!
... मलाही तेव्हा काही बोलायाला सुचलच नव्हतं.!!
आज कितीक वर्षे गेली (२ -३ च असतील..!!)
तस्सं तुला आठयायचं काही कारणच नव्हतं.
म्हनतात जे दुर जात्तात ना त्यांची आठवण येते!
पण तु अन मी कुठे गं दुर होतो.
बस्स तु एक लुप्त जलधाराच होती,
अन मी खळखळणारा तोच झरा..!!
तुझ्ं ते लुप्त अस्तित्व्त नेहमीच माझ्याबरोबर वाहवत नेणारा!
तुझ्या भेटीची चाहुल लागल्या पासुन मन काही थार्यावर नाही..
कधी वाटत नकोच ती तुझी भेट.. नेहमीच मनात एक सल ठेवणारी..!!
मग आठवतं ते तुझं मला मन लावुन ऐकणं..
माझ्या बाष्कळ बडबडीत आयुष्य शोधण्याची तुझी धडपड..!!
तुला झालेल्या प्रत्येक त्रासाची पै न पै भरपाई द्यायचीय..
पन मग उगीच मनात म्हणतो " त्रास" ?
ह्या त्रासामुळेच तर आपण एव्हढ्या जवळ आलो ना..!!
जगाला नाही कळत मैत्रीची भाषा..!!
मग म्हणुन काय मुकं राहायचं?
पण खरं सांगु जेव्हढ्या बोलण्यातुन आपण संवादायचो ना..
त्याहुन किती तरी पटीन अधिक मैनातुनच समजुन जायचो एकमेंकाना.
माझा आपला उगीच हट्ट असायचा तुला बोलतं करायचा.
अन तुही व्हायचीस.. अगदी भरभरुन..!!!
आत्ता मात्र मीच मुका झालोय..!!
तु नाहीस म्हणुन नाही.. तर तु पुन्हा भेटणारेस म्हणुन..!!
माझ्या त्या निरगसतेला तु खरच खुप जपलसं..!!
बस्सं एकच वाटतं पुन्हा भेटल्यावर तशीच माझ्यावर हक्क दाखवित मला बोलतं कर..!!
अन जाता जाता पुन्हा पहिल्यासारखं मुकं कर..!!
पुन्हा भेटुन बोलतं करयला..!!
कारण जग खरचं खुप छोटयं..!!!
महेश घुले.!!
छानै कविता! समजली नि उमजली
छानै कविता!
समजली नि उमजली पण!
(शुले च्या थोड्या चुका आहेत. त्या सुधारल्यास बरे)
सुंदर unending love !
सुंदर unending love !
निंबुडा,प्रद्युम्न
निंबुडा,प्रद्युम्न प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. आपण दिलेल्या सुचना जरुर लक्षात ठेवेन..!!
शुले च्या चुका अजाणतेपणाने ( लेखणाच्या किंवा त्यतील भावनेच्या ओढीने) घडतात..!!
पण आपण दाखवुन दिल्यास नक्की सुधारणा होइल.
उशीराने दिलेल्या प्रतिसादा बद्दल क्षमस्व..!!
प्रद्युम्न,unending Love पेक्षा unending FRIENDSHIP जास्त योग्य वाटलं मला..!!
असोत आपल्या प्रतिक्रिया नेहमीच नविन लि़खाणास उद्युक्त करणार्या असतात.
अशीच क्रुपाद्रुष्टी असु देत..