Submitted by अज्ञात on 27 April, 2012 - 10:22
काटे फुलांच्या सन्मानास्तव
हृदयी 'स्व'त नटलेले बारव
कुणीही यावे गूज करावे
अविरत रत मनभर गुंजारव
भेट कधी अस्पर्श आभामय
कधी मेघछायेचे अंबर
आलिंगन चुंबनासवे कधि
सयभारित असते कधि संगर
कोषातिल मधुपराग संचित
भृंगमदन अधिराज्य तयावर
झुळुकेचे अंदोल स्वरांकित
ठाय हाय लय खर्ज तळावर
....................अज्ञात
गुलमोहर:
शेअर करा
कोषातिल मधुपराग संचित भृंगमदन
कोषातिल मधुपराग संचित
भृंगमदन अधिराज्य तयावर
झुळुकेचे अंदोल स्वरांकित
ठाय हाय लय खर्ज तळावर >>> हे विशेष उल्लेखनीय जाणवलं.
नेहमीप्रमाणे श्रीमंत कविता
नेहमीप्रमाणे श्रीमंत कविता
नेहमीप्रमाणेच कळली नाही पण
नेहमीप्रमाणेच कळली नाही पण एवढे नादमय शब्द जमवता कुठून आणि रचता तरी कसे ?
काय गारूड आहे कळत नाही. वाचली आणि वाईट म्हणण्यासारखं काहीच सापडलं नाही म्हणून चांगली आहे म्हणतो !
कुणीही यावे गूज करावे
हे मात्र चुकीचं आहे. तसं असतं तर...
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सर्वांचे मनःपूर्वक आभार !!
टवाळ एकमेव.........
<<कुणीही यावे गूज करावे
हे मात्र चुकीचं आहे. तसं असतं तर...:)....................>>
........काटे फुलांच्या सन्मानास्तव ....................
.........फुलांना न छेडण्यासाठी; त्यांना कुणी त्रास देऊ नये म्हणून बहिर्मुखी काटे असतात........ पण......
.........हृदयी 'स्व'त नटलेले बारव .................. असल्यावर त्यांचा त्या काट्यांचा प्रभाव चालत नाही. आणि म्हणून........
..........कुणीही यावे गूज करावे............ ही अवस्था येते करण ..........
............अविरत रत मनभर गुंजारव.............. यावर कुणाचेच नियंत्रण असत नाही.........
बाकी गारूड माझ्यावरच झालेलं असावं.....................
नेहमीप्रमाणेच सुंदर कविता.
नेहमीप्रमाणेच सुंदर कविता.
सुरेख.........
सुरेख.........:)
गुरुजी : तुमचा फॉर्म आता एकदम
गुरुजी : तुमचा फॉर्म आता एकदम जालीम होत चाललाय
गूढ... पण आवडली.
गूढ... पण आवडली.
<<सयभारित असते कधि संगर>>
<<सयभारित असते कधि संगर>> सुंदर.
कविता दूसर्यांदा वाचताना आवडली.
खरंच गूढ आहे... मला नाही कळली
खरंच गूढ आहे... मला नाही कळली नीट
शब्द श्रीमंती मात्र अफाट आहे !!!!!!!!!
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार