पाऊस

Submitted by Rekha. on 27 April, 2012 - 07:58

पाऊस पहिला
घेउन येतो गंध मातीचा
धुंद सुगंध आठवणींचा
अन ओलावतात पापण्या
त्या भिजल्या आठवणींनी
पाउस पहिला.....
लहानपणी घेउन बाबांनी कडेवरती
नेले पावसात घालवली भिती
आणि मग प्रत्येक पावसात केली मस्ती...

अंगणात पडलेला गारांचा सडा
वेचता वेचता जीव झाला थोडा थोडा
दिवस बदलतात आपण बदलतो
पाऊस मात्र तोच राह्तो
पहिल्या पावसाचा गंध दरवळत रहातो
गंधित पाउस मग आणखी सुगंघी होतो
एकाच छ्त्रीतुन जाताना आनंदही द्विगुणीत होतो
ढगांच्या गड्गडाटाने जीव घाबरतो
नकळत मिठीत शिरता स्वर्ग धरती अवतरतो

बरसती धारा, भिजलेली धरती
भजलेली मने अन भिजलेली मिठी
भिजलेल्या मिठीत झुकली नजर
कोण कानाशी कुजबुतय पावसाने रोजच रहावे हजर......

गुलमोहर: