ऐकशील?
नाही येत तुझ्यासारखं भडाभडा बोलणं,
आणि आपला मुद्दा, दुसऱ्याला धाप लागेपर्यंत पटवून देणं.
नाही जमत तुझ्यासारखं भरभरून बोलणं
धबधब्यासारखं हसणं अन
सोनचाफ्या सारखं गंधानं गुदमरवून टाकणं.
नाही जमत तुझ्यासारखं -
आपलंसं- अगदी जवळचं करून बोलणं
अन वेळ साजरी झाली कि परकं करून निघून जाणं
नाही आणता येत मला
चेहऱ्यावर हसू लटक अन मधाळ
अन स्थळ/काळ बदलल्यावर
कोरी पाटी अन चेहरा निर्विकार!
नाही व्यक्त करता येत प्रेम
असं सहजतेने जागोजागी
साबणाच्या फेसा सारखं-
रंगीबेरंगी अन अल्पजीवी.
अजिबातच करता येत नाही
इतका रुक्ष अन मख्ख चेहरा
अन विचारपूर्वक,
पुढच्या क्षणी एकदम हसरा.
इतकी वर्ष झाली तरी
नाही आलं शहाणपण मुरब्बी
अन नाहीच होता आलं कधी हजरजबाबी.
नाहीच जमत मला दुसऱ्याला
बोलू न देता असं शब्द भसाभसा ओतण
अन समोरच्याला शब्द-बंबाळ करून
मिटवून टाकणं.
तरीही, माझी काही तक्रार नाही
कारण मला असलेली माझी सोबत
काही अजून सरली नाही.
मस्त , छान आहे.
मस्त , छान आहे.
धन्यवाद!
धन्यवाद!
हेय..आवडली
हेय..आवडली
मस्त खूप आवडली
मस्त

खूप आवडली
खूप छान कारण मला असलेली माझी
खूप छान
कारण मला असलेली माझी सोबत
काही अजून सरली नाही. >>>
शेवटच्या ओळीने हवा तो परीणाम अगदी परफेक्ट साधला जातोय!
धन्यवाद. अनुसया, रीया,
धन्यवाद. अनुसया, रीया, निंबुडा.
फारच छान.
फारच छान.
तरीही, माझी काही तक्रार
तरीही, माझी काही तक्रार नाही
कारण मला असलेली माझी सोबत
काही अजून सरली नाही.>>>>>> हे खुप आवडले
धन्यवाद. मकरन्द, shrushti.
धन्यवाद. मकरन्द, shrushti.