Submitted by अक्षदा on 27 April, 2012 - 01:16
( इथे लिहण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे... सांभाळून घ्यावे )
पावसाच्या धारांनी घेरले
पावसाच्या धारांनी घेरले
भीड माझ्या मनाला
नभ दाटून आले ||
या ओल्या वाटेवरती
गवताची ओली नक्षी
ओल्या या झाडांवरती
ओले नहालेले पक्षी
ओल डोळ्यात माझ्या
नभ ओलावलेले ||
भिजलेली चोळी माझी
भिजलेले माझे अंग
भिजलेल्या मातीसंगे
भिजला साडीचा रंग
चिंब देहात माझ्या
स्वप्न चिंबचिंब ओले ||
सरसर येती जलधारा
अंगास बिलगतो वारा
थेंबा थेंबाने येई
लाजेला नवा शहारा
साद घालू कुणाला
घर दूर राहिलेले ||
गुलमोहर:
शेअर करा
सरसर येती जलधारा अंगास बिलगतो
सरसर येती जलधारा
अंगास बिलगतो वारा
थेंबा थेंबाने येई
लाजेला नवा शहारा>>
सुंदर
धन्यवाद
खूप छान....
खूप छान....
चिंब देहात माझ्या स्वप्न
चिंब देहात माझ्या
स्वप्न चिंबचिंब ओले >>
व्वा
माफ करा. पण मी जSSSSरा सा बदल करून अशी अष्टाक्षरी जमवली तुमच्या या कवितेतून. आणि मला वाचताना मजा आली.
वर्षाधारांनी घेरले, वर्षाधारांनी घेरले
भीड माझिया मनाला, नभ दाटूनिया आले||
ह्या वाटेवरती ओल्या
गवताची ओली नक्षी
ओल्या या झाडांवरती
ओले नहालेले पक्षी
ओल डोळ्यात माझिया, नभ इथे ओलावले
भीड माझिया मनाला, नभ दाटूनिया आले||
भिजलेली चोळी माझी
भिजलेले माझे अंग
भिजलेल्या मातीसंगे
भिजला साडीचा रंग
चिंब देहात माझिया, स्वप्न चिंबचिंब ओले ||
भीड माझिया मनाला, नभ दाटूनिया आले||
सरसर जलधारा
अंगास बिलगे वारा
थेंबा थेंबानेही येई
लाजेला नवा शहारा
साद घालू मी कुणाला, घर दूर राहिलेले ||
भीड माझिया मनाला, नभ दाटूनिया आले||
व्वा! पहिला प्रयत्न
व्वा! पहिला प्रयत्न प्रॉमिसिंग.
हे काय आहे ?
हे काय आहे ?