Submitted by pradyumnasantu on 26 April, 2012 - 13:58
"मलाही व्हायचंय अजरामर"
तो सांगत होता
स्वत: असून उत्तुंग
आपल्याला खुजा समजत होता
त्याच्या डोळ्यांतले अश्रू
पडताक्षणी वाफ होत होते
वैफल्याने भावना
पेटून राख होत होत्या
"त्यांच्याकडे जो जातो
उगाळून आणतो गंध
जो मजजवळ येऊ पाहे
होऊन जातो अंध
फुकटचे श्रेय घेतो मी
म्हणे शक्तीचा सागर
कसला शक्तीसागर
मी तर केवळ प्रलयंकर
'त्यांचं' तेज शीतल
माझी आग भयंकर
जाउद्या मलाही पृथ्वीवर
बनूद्या मलाही
दीपस्तंभ, दयासागर, करुणाकर
दु:खाचा शब्दप्रभू
ग्रेस, कुसुमाग्रज, सुर्वे, किंवा माडगुळकर"
इंद्रासमोर उभा राहून सूर्य बोलत होता
पृथ्वीवरील कवीशी आपली तुलना करत होता
त्याच्या डोळ्यांतले अश्रू
पडताक्षणी वाफ होत होते
मनातले वैफल्य साफ दिसत होते
गुलमोहर:
शेअर करा
अप्रतिम लिहिलंत अशी कविता
अप्रतिम लिहिलंत
अशी कविता जमावी
इंद्रासमोर उभा राहून सूर्य
इंद्रासमोर उभा राहून सूर्य बोलत होता
पृथ्वीवरील कवीशी आपली तुलना करत होता
त्याच्या डोळ्यांतले अश्रू
पडताक्षणी वाफ होत होते
मनातले वैफल्य साफ दिसत होते
.... जबरदस्त ..........
जे ना दिसे रवि ते पाही कवि.......असच कहीतरी.
सुंदर कल्पना
सुंदर कल्पना
बेफिकीरजी: कवितेचा सन्मान
बेफिकीरजी:
कवितेचा सन्मान केलात. आभारी आहे.
जादुगरजी: ऋणी आहे पाषाणभेदजी:
जादुगरजी: ऋणी आहे
पाषाणभेदजी: ऋणी आहे
अप्रतिम...
अप्रतिम...
़जय, आभारी आहे.
़जय, आभारी आहे.
सूर्याने कवी होण्याची इच्छा
सूर्याने कवी होण्याची इच्छा प्रकट करणे ही संकल्पना वेगळीच आणि छान आहे.
उल्हासजी: मनःपूर्वक आभार.
उल्हासजी: मनःपूर्वक आभार.
जाउद्या मलाही
जाउद्या मलाही पृथ्वीवर
बनूद्या मलाही
दीपस्तंभ, दयासागर, करुणाकर
दु:खाचा शब्दप्रभू
ग्रेस, कुसुमाग्रज, सुर्वे, माडगुळकर
किंवा प्रद्युम्नसंतु"
जो देखे ना रवि तो देखे कवि.
खुप छान.
खुप छान.
छान लिहिअवाआवडले इंद्रासमोर
छान लिहिअवाआवडले
इंद्रासमोर उभा राहून सूर्य बोलत होता
पृथ्वीवरील कवीशी आपली तुलना करत होता