काहीतरी करावसं वाटतय पण काय ?

Submitted by जादुगर on 26 April, 2012 - 13:22

आपण आपल्या आजुबाजुला बघतो बर्‍याच अशा गोष्टी असतात की त्यांना बघुन आपल्याला खरोखर वाईट वाटतं आणी आपल्या मनात समाजा विषयी ( त्या गोष्टी , व्यक्ती वगैरे विषयी ) मदत म्हणुन काहीतरी करण्याची इच्छा होते पण आपल्याला नेमक काय करायला पाहीजे ते माहीत नसतं ते माहीती कशी मिळवावी आणी आपण त्या विषयी काय चांगलं करु शकतो ते सुचवा .

गुलमोहर: 

एखादी घटना,स्थिती,परिस्थिती, व्यक्ती पाहिल्यावर प्रथम पाहणे होते. जर ते हृदयाला भिडले तर मग त्या बद्दलचा भाव मनात निर्माण होऊन ते अभिव्यक्त होतात. त्यानंतर त्या बद्दल बराच काळ आपल्या डोक्यात विचार चालू राहतात, चिंतन सुरु होते. आपण थोडं मुळात जाऊन विचार करतो. त्या चिंतनातून जीवनाचा अर्थ समजून घेत, वास्तवाला समजून घेण्याचा दृष्टीकोन आपण बनवतो त्याला पण दर्शन म्हणतात. असा अर्थ समजून घेऊन अज्ञान, परंपरावादी व रुढीवादी विचारांना नष्ट करून सार्थ ज्ञान प्राप्त करणे म्हणजे दर्शन.असत्याचे व सत्याचे ज्ञान म्हणजे दर्शन. अविद्या आणि विद्येचे ज्ञान म्हणजे दर्शन. असे दर्शन फक्त बौद्धिक पातळीवर प्रतिसाद देणारे असेल तर आपण बुद्धिजीवी लेखक, कवी, अभ्यासक किवा विचारवंत बनतो. यातून आपल्यामध्ये त्या व्यक्ती, स्थिती,स्थळ,रूप, समूह यांच्याशी आपलेपणा, नाते,परस्परभाव निर्माण झाले तर पवित्र विचारांनी आपण काही प्रतिसादी सेवा करतो व परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करतो.
जाणता व्यक्ती या पुढे जाऊन फक्त प्रतिसाद देत नाही तर स्वतःमध्ये सुद्धा खूप बदल करून घेतो व समग्र दृष्टीने सर्वांकडे पाहू लागतो. त्याचा मोह,भय नष्ट होते.

धन्यवाद प्रसादजी.
तुम्ही सांगितल्या प्रमाणे दर्शन म्हण्जे काय ते चांगल्या प्रकारे कळलं पण मुळ विषय बाजुला राहीला.

तुमच्या आजुबाजुला अशी अनेक मुले असतील ज्यांना खाजगी क्लासेस ला जायला परवडत नसेल. त्यांना तुम्ही तुम्हाला वेळ असेल तेंव्हा अगदी महिण्यातुन तास्भर गणित, सायन्स, भाषा शिकवा. शिकवायचे अवघड वाटत असेल तर त्यांच्या शंका निरसन करा. ते पण अवघड वाटले तर असे करु शकेल अशा मित्राला असे करण्याविषयी सुचवा.

ज्या प्राथमिक शाळेत तुम्ही शिकला (किंवा कोणत्याही जवळच्या) तेथे कधीतरी जाउन मुलांशी तुम्हाला माहित असलेल्या आणि त्यांना उपयोगी पडेल अश्या गोष्टींची चर्चा करा. त्यांना पडणारे गहन (?) प्रश्न (पाठ्यपुस्तका बाहेरचे, दैनंदिन जीवनातले) समजुन घ्या, त्यांचे समाधान होइपर्यंत प्रयत्न करा. तुम्हाला उत्तर माहित नसेल तर ते शोधुन पुढच्या भेटीत त्यांना समजावुन सांगा. मजा येइल, त्यांना पण आणि तुम्हाला पण Happy

निवांत सर आधी तुम्ही दिलेल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद '' शिक्षण क्षेत्र माझ खुप आवडत क्षेत्र आहे तुम्ही सांगितल्या प्रमाणे कामाला लागलो आहे.