Submitted by sarode_vaishnavi on 26 April, 2012 - 06:26
अंधुक अंधुक - रागातच
घर बांधता बांधता,
धूसर धूसर -रडतच
घर बांधता बांधता
रात्र संपली रे..!!
असं बोलशील
तसं बोलशील
हीच वाट पाहता पाहता
आता बोलशील
नंतर बोलशील
हीच वाट पाहता पाहता
रात्र संपली रे..!!
निराशेत हतबल खिडकीत
डोळे घट्ट मिटून
झोपता झोपता
रात्र संपली रे..!!
आतुरतेने
थोडं थोडं
जागता जागता
जगता जगता
रात्र संपली रे..!!
मनात पक्क
नाही म्हणता म्हणता
रात्र संपली रे..!!
मीच एकटी
सर्व सावरणार आता
या तावातावात
रात्र संपली रे..!!
उशिरा का होईना
एकदम शांततेत येऊन
अवरलास माझा आवेग,
हाच सुखद विचार
करता करता
रात्र संपली रे..!!
गुलमोहर:
शेअर करा
छानै
छानै
मस्त
मस्त
धन्यवाद मित्रांनो..
धन्यवाद मित्रांनो..:-)