पाऊस

Submitted by मीन्वा on 9 September, 2008 - 09:09

आज आत्ता मध्यरात्री,
एकटीनंच रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात
पाऊस पाहताना, काय आठवावं?
पत्र्याच्या 'त्या' घरात रात्री, वाजतगाजत यायचा .. पाऊस
अपरात्रीही छप्पर फोडून हक्कानं आत यायचा.. पाऊस
कॉटवर मग आम्ही सगळे.. पावसासकट,
दाटीवाटीने वाट पहात बसायचो, रात्र संपायची..
आत नाही आला तरी अजूनही,
रात्र संपायची वाट पहायला, सोबत करतो.. पाऊस.

गुलमोहर: 

पत्र्याच्या 'त्या' घरात रात्री, वाजतगाजत यायचा .. पाऊस
अपरात्रीही छप्पर फोडून हक्कानं आत यायचा.. पाऊस

कॉटवर मग आम्ही सगळे.. पावसासकट Happy
छाने!

आवडली छान!!!

    ================
    गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया !!

      मीनू...... किती दिवसांनी गं?
      >>>>आत नाही आला तरी अजूनही,
      रात्र संपायची वाट पहायला, सोबत करतो.. पाऊस.
      ये बात!

      आज आत्ता मध्यरात्री,
      एकटीनंच रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात
      पाऊस पाहताना, काय आठवावं?
      पत्र्याच्या 'त्या' घरात रात्री, वाजतगाजत यायचा .. पाऊस
      अपरात्रीही छप्पर फोडून हक्कानं आत यायचा.. पाऊस
      कॉटवर मग आम्ही सगळे.. पावसासकट,
      दाटीवाटीने वाट पहात बसायचो, रात्र संपायची..
      आत नाही आला तरी अजूनही,
      रात्र संपायची वाट पहायला, सोबत करतो.. पाऊस.

      मस्त. आवडलं .

      क्या बात है..!!!
      मीनु.. आवडली कविता..:)

      आत नाही आला तरी अजूनही,
      रात्र संपायची वाट पहायला, सोबत करतो.. पाऊस.

      सुरेख.

      धन्यवाद.. सगळ्यांनाच..
      दाद अगं इकडे येणं न येणं ठरवणारे आपण कोण? 'ती' आल्याशिवाय काय ? कविता वाट चुकली बर्‍याच दिवसांनी ..

      ~~~~~~~~~
      ~~~~~~~~~
      Happy