मग नुसती फडफड पंखांची

Submitted by जयदीप. on 26 April, 2012 - 00:16

ओरबाडे द्वेषाचे, उजळणी रागाची
दुधाला सुखाच्या, साय दु:खाची
मग नुसती फडफड, पंखांची
कुणा नाही, मलाच सलणारी

हक्क दिशांचे, चढाओढ नात्यांची
उन्हात दुखाच्या, सावली कुणाची?
मग येते एखादी सर, अश्रूंची
कुणा नाही, मलाच भिजवणारी

ओल्याच पंखांचे, असे नाते उन्हाशी
झळी कुणाच्या, पडझड पिसांची
मग सांगती कहाणी, वार्‍यात विरलेली
कुणा नाही, मलाच कळलेली

मग नुसती फडफड पंखांची
कुणा नाही, मलाच सलणारी..

गुलमोहर: 

ओरबाडे द्वेशाचे, उजळणी रागाची
दुधाला सुखाच्या, साय दु:खाची
मग नुसती फडफड पंखांची
>>

कल्पना फार आवडली