आता लक्ष्य सागरमाथा..

Submitted by सेनापती... on 25 April, 2012 - 19:50

पुण्याच्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेची एव्हरेस्ट मोहीम आता प्रत्यक्ष चढाईला सुरुवात करत आहे. देशातील ही पाचवी नागरी मोहीम!

http://epaper.loksatta.com/34801/loksatta-pune/25-04-2012#page/16/2

"या साऱ्या तंबूंच्या मधोमध आमचा राष्ट्रध्वज तिरंगाही मानाने फडकतो आहे. ‘गिरिप्रेमी’तर्फे नुकतेच या बेसकॅम्पच्याच खाली असलेल्या गोरक्षेप या एकमेव गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. जगातील हा सर्वात उंचीवरचा शिवपुतळा!

छत्रपती शिवरायांचा इतिहास हा असाच दऱ्याखोऱ्यातला! तो इथल्या शेर्पा बांधवांना समजताच ते स्वत:च या पुतळ्याच्या उभारणीत पुढे आले. या पुतळ्याची भविष्यातील सर्व देखभाल हे शेर्पा बांधवच घेणार आहेत.

‘छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक प्रकल्प’ नावाने राबवल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत या दुर्गम भागात राहणाऱ्या शेर्पा बांधवांच्या घरातील अंधार दूर करण्यासाठी ‘गिरिप्रेमी’च्या वतीने सौर कंदील वाटण्यात आले आहेत. गिर्यारोहण हा फक्त छांदिष्ट, हौसे-मौजेचा खेळ नाहीतर त्यातही सामाजिक जाणिवेचा धागा आहे, हे दाखवणारे हे काम!"

हा धागा सर्व गिर्यारोहकांना शुभेच्छा देण्यासाठी सुरु करत आहे.. Happy

आपल्या शुभेच्छा प्रत्यक्ष बेस कॅम्प पर्यंत काही मध्यस्थांमार्फत (थेट माझ्याकडुन नाही) पोच्तील याची व्यवस्था करत आहे.. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेनापती, नाही, मी कोणाला व्यक्तिश: ओळखत नाही. पण गोष्टी ऐकल्या होत्या. अधिकृत कथा प्रत्यक्ष कथेतून थोडी वेगळी आहे असंही ऐकलं होतं. ख.खो.दे.जा. Sad
आ.न.,
-गा.पै.

मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
असे अधिकाधीक प्रेरणादायी आदर्श निर्माण होणं खरंच अत्यावश्यक आहे.

बित्तुबंगा,

>> इंग्रजी वर्तमानपत्रांना या घटनेची दखल पहिल्या पानावर का बरे घ्यावी वाटली नाही?

खाणे, खाजवणे, झोप आणि भांडण सोडल्यास भारतातल्या इंग्रजी वृत्तपत्रांत काय असते? शूरवीरांच्या गोष्टी छापायला ते काय राष्ट्राभिमानी माध्यम आहे? Angry

आ.न.,
-गा.पै.

महाराष्ट्राची आणि पुण्याची पताका एव्हरेस्टवर फडकवल्याबद्दल सर्व गिर्यारोहकांचे मनापासून अभिनंदन !!

आता परतीची वाट पाहतोय..

Pages