Submitted by पेशवा on 24 April, 2012 - 13:40
हळू हळू थिजलेल्या पानावर
थेंबाचे उजाड उघडेपण
प्रवाशा हा रुतू असाच गहिरा आहे.
पक्षांची थवेराने गेली
त्या दिशेची आठवण जपलेली फांदी
इथेही उरात निष्पर्ण...
रिकाम्या क्षणापाशी हात जोडणाऱ्या
प्रवाशा तुझ्या मागणीतील सखोलता व्यर्थ आहे.
गंधपर्णी ओसरलेली वहिवाट,
एकांताचा कडाका दिवसेंदिवस वाढतो
ह्या मिठीला लागलेली उबेची गळती
प्रवाशा पापण्यांवरील मिटण्याचा हक्क तू गमावला तर नाहीस?
श्लोकोत्सवासाठी अजून किती उरलेत मंत्र?
गात्रातील ही सहस्र बंड गर्जत आहेत
देवदूत भेटणारे रस्ते वेगळे आहेत...
(भयाने) प्रवाशा तुझ्या पाठीवर हे कोवळे पंख कसले आहेत?
--------
शिळ्या कढीला ऊत ! एक जूनी कविता ...
राईटर'स ब्लॉक कसा घालवत येतो? अनुभव असल्यास जरूर शेअर करावेत!
गुलमोहर:
शेअर करा
उबेची गळती, श्लोकोत्सव,
उबेची गळती, श्लोकोत्सव, सहस्त्र बंडे -
आपल्या रचनेतील शब्दश्रीमंती मत्सर जागा करणारी आहे
ओळ कुठे तोडावी याला मात्र काहीही कायदाच दिसत नाही, किंवा मनात काही वाटले असावे असेच वाटत नाही
नेहमीप्रमाणेच अगम्यतेने नटलेली शब्दरचना, जी काहीतरी सांगून जाते पण तेच सांगतीय की नाही याबाबत शंकाही उपस्थित करते आणि ग्रेस होण्याची अभिलाषा दर्शवते
अभिनंदन
-'बेफिकीर'!
सुंदर
सुंदर
व्वाह!!! शब्दयोजना
व्वाह!!! शब्दयोजना बाssssप!!
प्रत्येक ओळ अगम्य गूढतेने खेचून घेतेय स्वतःकडे ...
जी काहीतरी सांगून जाते पण तेच सांगतीय की नाही याबाबत शंकाही उपस्थित करते
अनुमोदन!
(स्वगतः या कवितेचा संपूर्ण, सलग अर्थ नाही लागला तरी चालेल मला.. :))
एक शंका - थवेराने म्हणजे?
राईटर'स ब्लॉक कसा घालवत येतो?
राईटर'स ब्लॉक कसा घालवत येतो? अनुभव असल्यास जरूर शेअर करावेत! >>>>> अगदी अगदी